Type Here to Get Search Results !

५ जून पर्यावरण दिन चारोळ्या

५ जून पर्यावरण दिन चारोळ्या

*श्वास घेतोय तोवर*
*जगून घ्यावं छान..*
*झाडालाही कळत नाही*
*कोणतं गळेल पान..*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


पर्यावरणाचे रक्षण करा
काळाची गरज ओळखा
झाडे लावा पाणी जिरवा
निसर्गाला नका पोहचवू धोका

निसर्गाची शोभा वाढवा
खुप झाडे लावा
जल वापरा जपून
नद्या कालवे चालले आटून ॥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *पाणी*
पाण्यासाठी वणवण फिरते प्रजा ही सारीे
थेंबाथेंबातूनी वाचवा हो पाणी हो पाणी(धृ)
पाणी आपुले जीवन आहे सांगे जीवनगाथा
वाचवुनि संपवू या आपण पाण्याची व्यथा(१)
दुनिया सांगे व्यथा अपुली पाण्याची न्यारी
बचत पाण्याची करूया आपण प्रजा ही सारी (२)
विहिरीतुनी हे पाणी आणिती दूर दूर जातांना
करू आपण त्यांच्यासाठी पाणी वाचवतांना(३)
 सकलजन वाचवू आपण ही आपली प्रथा
सुटेल तंटा पाण्याचा ही देशाची व्यथा(४)
इथे नाही पाणी आणि तिथे नाही पाणी
पाण्यासाठी येतात हो ओठावर गाणी(५)
पाणी पाणी हा आक्रोश करिती प्रजा ही सारी
पाणी वाचवुनि हो आपण करू दुनियादारी(६)
 डोळ्यातुनि हे पाणी येते रडते दुनिया सारी
पाण्याचा हा फरक कळू दे वाचवू पाणी पाणी(७)
ज्याला पाणी मिळत नाही हो एेका ती कहाणी
त्यांच्यासाठी वाचवूया आपण थेंबथेंब पाणी (८)
सकलजन करिती सारे पाण्याची विनवणी
थेंबाथेंबातूनी बनवू सागर होईल पाणी(९)

   ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पाण्यासाठी वणवण फिरते
माय लेकरांसाठी
अनवाणी फिरते पहा
दोन घोट पाण्यासाठी ॥
पाणी म्हणजे जीवन
वापर करा जपून
न मिळताच थेंब पाण्याचा
जीवन जाते संपून ॥
झाडे लावा झाडे जगवा
सारे व्हा एकत्र
हरिततृणांनी नटवा
सृष्टी सर्वत्र ॥
हजारो गावे ओसाड पडली
पाणी नाही पीक नाही
जनावरांना चारा नाही
जीवाची लाही लाही होई ॥
कधीतरी अशी वेळ येईल
कुणालाच पाणी मिळणार नाही
मग मात्र तहान लागल्यावर
विहीर खोदायला जायी ॥
व्हा आता जागे सारे
पाणी जिरवा पाणी आडवा
जलसाक्षरतेचा प्रश्न
आपण सार्यानी सोडवा ॥
पाण्यावीणा न कोणी
जीव तडफडत जावो
काळजी घ्या पियूषाची
कोणी न तहानलेला राहो ॥
गरजेपुरताच वापर करा
जल बचतीची सवय धरा
जल है तो कल है
वृक्षसंर्वधन करा ॥
थेंब थेंब पाणी वाचवू
नव्या पिढीला देऊ
पाणी हिच संजीवनी
हाच बोध आपण घेऊ ॥

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🖌घोषवाक्य-पाणी

मानवाची करणी।
पाण्याविना मरेल धरणी।

पाणी धन है।
पाणी बचानेवाला ही धनवान है।

पाण्याची करा सर्वांनी साठवण।
एकदाची मिटवा पाण्यासाठी वणवण।

पाणी वाचवा काटकसरीने।
देव देईल सरीसरीने।

थेंबाथेंबाची करुया साठवणूक ।
मुक्या जीवांची करुया जपणूक।

पाणी हेच आरोग्य आणि संपत्ती ।
पाण्याची बचत करुन टाळा आपत्ती ।

पाणी वाचवू सर्वांसाठी।
मंत्र हा सर्वांसाठी।

या पाण्याचा इमान राखून पाणी वाचवा गडे।
भविष्य येईल तुमच्यासाठी वाजवित चौघडे।


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


पर्यावरणाचे मानवास पत्र

प्रिय मानवास,
   स.न.वि.वि.
        पर्यावरण सर्वांची माता,पर्यावरण सर्वांचा पिता,पर्यावरण सर्वांचा गुरू ,पर्यावरण सौख्याचा सागरु.याप्रमाणे मानवा तुझे माझे नाते फारच जवळचे आहे.तुला पत्र लिहण्यास कारणच असे आहे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल.माणसा तू विकिसापोटी वेडा झाला आहेस.भरमसाठ लोकसंख्या पर्यावरण असंतुलित करते.याचा तूला विसर पडला आहे.पर्यावरण रक्षण हेच मूल्यशिक्षण आहे.म्हणून गांडूळ खतनिर्मितीचा नियम पाळण्यासारखा आहे.मानवा तुझ्या आणि पर्यावरणाच्या सहकार्यातूनच संस्कृती निर्माण होते .

  "पर्यावरची धर तू कास
   होईल मानवाचा विकास
  पर्यावरण काळजी कर आता
  मीच खरा रक्षणकर्ता......"

        पर्यावरणाचा मित्र होण्याआधी तूला अस्वच्छता आणि प्रदूषणाचे मित्र व्हावे लागेल.तू स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे.वेद पुराण देती प्रमाण,वृक्षाविना नाही कल्याण .
वनीकरण ही काळाची गरज हे मानवा समजून घे.कारण वनीकरणाची साथ हीच दुष्काळावर मात आहे.पर्यावरण रक्षणासाठी घे धडे आंनद होईल चोहीकडे.पर्यावरण स्वयंचलित यंत्रणा आहे.प्लास्टिक वापर टाळ,पाणीप्रदूषण थांबव.धरणी आईला जप.देशघडविण्यासाठी माझी काळजी घे.अफाट वाहनांचा वापर ,कारखान्यातील निघणारा घातक वायू प्रदूषण वाढवून मानवी आजाराला आमंत्रण देत आहे.

 "प्रदूषणाला लावूया दूर
  पर्यावरणाचा लावा सूर..!
  वाहन वापर टाळूया
  पर्यावरण रक्षण करुया ...!"

     दूष्काळ ,अवकाळी पाऊस आणि असंख्य प्रश्नापासून पर्यावरण वाचविले पाहिजे.एवढेच मला तुला सांगायचे आहे.पर्यावरण राष्टाची संपत्ती आहे.त्याचे जतन कर.पाणी काटसरीने वापर.काळजी स्वतः ची,परिवाराची आणि देशाची.
पत्र पुरे करतो.
       
                तूझाच
                पर्यावरण

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 *जल जीवन पर्यावरण* 🍄🌏

पाण्यासाठी वणवण फिरते
माय लेकरांसाठी
अनवाणी फिरते पहा
दोन घोट पाण्यासाठी ॥
पाणी म्हणजे जीवन
वापर करा जपून
न मिळताच थेंब पाण्याचा
जीवन जाते संपून ॥
झाडे लावा झाडे जगवा
सारे व्हा एकत्र
हरिततृणांनी नटवा
सृष्टी सर्वत्र ॥
हजारो गावे ओसाड पडली
पाणी नाही पीक नाही
जनावरांना चारा नाही
जीवाची होई लाही लाही ॥
कधीतरी अशी वेळ येईल
कुणालाच पाणी मिळणार नाही
मग मात्र तहान लागल्यावर
विहीर खोदायला जायी ॥
व्हा आता जागे सारे
पाणी जिरवा पाणी आडवा
जलसाक्षरतेचा प्रश्न
आपण सार्‍यानी सोडवा ॥
पाण्यावीणा न कोणी
जीव तडफडत जावो
काळजी घ्या पियूषाची
कोणी न तहानलेला राहो ॥
गरजेपुरताच वापर करा
जल बचतीची सवय धरा
जल है तो कल है
वृक्षसंर्वधन करा ॥
थेंब थेंब पाणी वाचवू
नव्या पिढीला देऊ
पाणी हिच संजीवनी
हाच बोध आपण घेऊ ॥

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌏 *५ जून पर्यावरण दिन*🌍

संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वृक्ष-वेली..
🌿🌱🌴🌲🌳🌵🌾

वृक्षवली आम्हा सोयरी वनचरी । पक्षीही सुस्वरे आळविती ।

तेणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ।

कल्पतरू रूया बाभुळा । पुरविता फळा इच्छितीया ।

वनात कोणती झाडे असावीत या बदल 👆

तरुवर बीजापोटी । बीज तरूवरा शेवटी ।

पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे । आपुल्याला दैवे पिके भूमिक ।

बीज पेरी शेती । मग गाडेवरी वाहाती ।
वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्यांचे अंगी वसे ।
पाल्याचे जतन । तरि प्रत्यया येती कण ।

निंबाचिया झाडा साखरेचे आळे । आपुली ती फळे न संडीच ।

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माणसा आता तरी जागा होशील का ?
एक तरी झाड लावशील का ?

आता वाढल्या पाहिजेत वृक्ष-वेली
तुकारामांच्या अभंगातील वृक्षवल्ली
फुलतील वने येतील पक्षी गातील मंजुळ गाणी
चराचरातून फुटतील झरे
*दर्‍याखोर्‍यातून  खळखळेल पाणी*
*दर्‍याखोर्‍यातून खळखळेल पाणी ।।*

ही पोस्ट आजच्या पर्यावरण दिनाचे महत्व सांगताना नक्कीच कामी येईल..
म्हणून शेअर करा..
   
      🔷 *संकलन*🔶

श्री नागरगोजे माणिक सर
ता. गंगाखेड जि. परभणी

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


   🌹 *जागतिक पर्यावरण दिन*🌹

  🌱 🌿  *चारोळ्या* 🌳🍀

         🌹🍀🌹
  हिरव्या रानी, हिरव्या पानी
सरसर घन ओथंबून येती
सुंदर रंगीबेरंगी फुलांवर
फुलपाखरे हर्षाने बागडती
       
      🌹🍀🌹
हिरवा शालू नेसून नटली
अवनी, धरती, वसुंधरा
सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या
पर्यावरण रक्षणाची कास धरा
       
          🌹🍀🌹
मनाला भुरळ पाडणारे सौंदर्य
उंचावरून पडणारे धबधब्याचे पाणी
जपले पर्यावरण जर मनोमनी
अशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी

        🌹🍀🌹
पाणी पिण्यास निरागस फुल
रडत येऊनी बिलगे नळाला
भयाण स्थिती अशीच राहिली
तर स्वतःच आमंत्रण द्याल काळाला

       🌹🍀🌹
निसर्गाशी करा मैत्री
तोच देईल उद्याची खात्री
नटवा सृष्टीचे हिरवे रूप
ती ही दान करेल सत्पात्री

      🌹🍀🌹
झाडे असतील हिरवीगार
वसुंधरा दिसेल बहारदार
पाणी चहूकडे निळेशार
पाने, फुले टवटवीत तजेलदार

        🌹🍀🌹
वृक्षावृक्षांचे करूया जतन
तेच देतात जगण्याला श्वास
पानाफुलांची सुंदर आरास
आनंदाची उधळण दिलखुलास

      🌹🍀🌹
मिळून सारे एकसाथ
वृक्षारोपणास लावू हात
हिरव्या शालूने नटवू धरा
दुष्काळावर करू मात
        🌹🍀🌹
झाडे सुकून वठून गेली
निसर्गाची झाली अवकृपा
प्रत्येकाने एकतरी वृक्ष जतन करू
होईल वरूणराजाची कृपा
          🌹🍀🌹
रखरखत्या वाळवंटात बसूनी
वाट बघतोस पावसाची
झाडे लावून वाढवली असतीस
तर गरज नसती लागली नवसाची
    
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 🌳🌳 *पर्यावरण दिनानिमित्त* 🍄

       🌱🌱 *रक्षण*🌳🌳
खूप झाल्या घोषणा आता
खूप झाले   समाज कारण
 वृक्ष लावा एक तरी
होईल मग पर्यावरण रक्षण

झाडे लावून संवर्धन करणे
हीच आपुली जबाबदारी
झाडे जगली तरच जगेल
पृथ्वीवरचे सृष्टी सारी

 वृक्षासारखा दाता नाही
ऋषितुल्य  कर्मकहानी
का रे ? मानवा तू रे केली
निष्टुरपणे झाडाची छाटणी


जाणून घे जीव त्याचा
दुःख  होते त्यालाही
रीत माणसाची अशी कशी
अंतर्मनात रडत राही

  झाडे, वेली प्राणी पक्षी
निसर्गाचा घटक आहे
स्वार्थासाठी का रे माणसा
  हव्यासापोटी मारत आहे

झाडे लावा झाडे जगवा
मंत्र  जपुया निसर्गाचा
वृक्षांगण खुलेेल धरतीचे
गौरव करू या  धरती मातेचा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


   *विषय - पर्यावरण दिन*

     *तोडलेस मानवा खोड*
         *बघ आमची*
            *एकी*
           *संघटन*
     *उज्ज्वल भविष्यासाठी*
  *विध्वंसक खोड मोड*

 *झाडेच जर नसतील*
       *तर वाढेल*
        *प्रदूषण*
        *विनाश*
  *हिरव्या सृष्टीचा*
*झाल्यावर कसा जगशील?*

*झाडांमुळेच घेतोस श्वास*
      *त्यांनाच तोडशील*
          *घर*
       *कारखाने*
*उभारशील , काॅन्क्रीटमध्येच*
*गमावशील जगण्याची आस*

*झाडांवीना होशील निराधार*
     *त्यांनाच वाढव*
         *घरासमोर*
          *शेतात*
   *उघड्या माळरानावर*
*झाडेच उद्याचा आधार*
       
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌳 *एक झाड लाव...!*🌳
काल  माझ्या   स्वप्नात
एक  झाड  येऊन गेलं
हितगुज थोडं मनातील
माझ्याशी  करून गेलं !

मी  सर्वांनाच देत  गेलो
मागीतलं  काहीच नाही
संपतय माझं  जीवन हे
मला काहीच कळत नाही !

पाखराला  निवारा अन
वाटसरूंना  छाया दिली
भेदभाव नव्हता  मनात
प्रत्येकाला  माया दिली !

पावसाची    वाट   पाहत
मीच  मेघांना   बोलावतो
धो  धो  पडणारा पाऊस
वसुंधरेला चिंब भिजवतो !

उन्हाच्या    झळांपासून
मीच  करतोना संरक्षण?
मग आतातरी करा तुम्ही
वृक्षारोपन अन संवर्धन !

माझे  नसेल   अस्तित्व
तर  होईल सारे ओसाड
हे  टाळण्यासाठी   तरी
माणसा लाव तु एक झाड !
माणसा लाव तु एक झाड!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चारोळी
मी झाड मानवा तुमच्या
किती हो उपयोगी पडतो...!
औषध,इंधन फर्निचर ऑक्सीजन
माझ्या देहावर कुर्हाड चाल तो...!

जगात बुद्धीमान मानव जात
तेच करतात निसर्गाचा र्हास
झाडे लावतात रास...!
पण !! देखभालीचा धरत नाहीत ध्यास ...!!

हातावर मोजणारी माणसे
करतात वृक्ष लागवड..!
सरकारी कर्मचारी लावतात झाडे
काहींची मात्र नुसतीच बडबड..!!

स्वताःचा पेक्षा झाडांवर
करा हो प्रेम भरभरुन...!
देण्यासाठी जन्म त्यांचा
पहा स्वताःला विचारून..!!

जीवापाड जपावे निसर्गाला
देण्यासाठी सदैव तत्पर..!
वृक्षलागवड करूनी उत्तराई होऊ
कार्य करू सार्यांना सत्वर..!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आनंदाचे पक्षी उडाले

खेळांचे मोर थुईथुई नाचू लागले

फुलपाखरे ही बागडू लागली

धुंदीत आनंदाच्या न्हाऊन

निघाली .....

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.