Type Here to Get Search Results !

23 January Netaji Subhash Chandra Bose! २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी !

23 January Netaji Subhash Chandra Bose! २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी ! नेताजी सुभाषचंद्र बोस !


जन्म २३ जानेवारी १८९७ : मृत्यू १८ ऑगष्ट १९४५.



आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतीकारक देश भक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव  देशावर प्रेम म्हणजे कोणत्या प्रकारचे आणि किती.? मना पासून देशावर प्रेम करणे, देश आपलाच मानणे, देशाचा मान तोच माझा मान, देशाचा अपमान तोच माझा अपमान. नेताजी कॉलेज मध्ये शिकत असताना एका इंग्रजी प्राध्यापकाने शिकवताना भारताची टवाळी केली. नेताजींना ते सहन झाले नाही. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी त्या प्राध्यापकाच्या थोबाडीत मारली. परिणाम म्हणून सुभाष बाबूंना कॉलेज मधून काढून टाकले. मग आशुतोष मुख्रर्जीनी मध्यस्थी केली. आणि परत कॉलेज मध्ये घेतले. असे नेताजींचे देशावर अतिशय मनापासून प्रेम होते.
* कटक येथील नामवंत वकील  बोस व प्रभावतीदेवी या सुशिक्षित व सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी रामकृष्ण परमहंस व विवेकानंद त्यांच्या जीवनात आले.व ते सतराव्या वर्षी सदगुरुं च्या शोधासाठी गिरीकंदरांत –हिमालयात वणवण भटकत राहिले. त्यांचे वडील प्रज्ञावान व स्वतंत्र्य विचारांचे व परखड वृत्तीचे होते. तर आई अगदी “श्यामची आई” होती. वडील रायबहाद्दूर होते. पण इंग्रजांचे उर्मट वर्तन पाहून त्यांनी नोकरी व पदवी दोन्ही सोडून दिल्या सुभाषचंद्र वडिलांच्या सामाधानासाठी आय. सी.एस. होण्यासाठी इंग्लंडला गेले व केंब्रीज विद्यापिठाचे पदवीधर होवून परत आले.
* १९२१ सालच्या जालियन हत्याकान्डाने संतप्त होवून त्यांनी आय. सी. एस. होवूनही त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली नाही. मातृभूमी स्वतंत्र करण्याचा विडा उचलला. गांधीजींना भेटले तेव्हा गांधीजींनी असहकाराचे आंदोलन सुरु केले होते. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना डॉ. चित्तरंजनदास यांच्या कडे पाठविले. बंगाली युवकांचा कंठमणी , बॉरिस्टर, फर्डा वक्ता, देशभक्त, विद्वान गुरु, हिमालयात मिळाला नव्हता.तो गांधीजींनी दिला. दोघांची हि कारागृहातच मैत्री जमली. गुरु-शिष्याचे नाते तयार झाले. बंगाली क्रांतीकार्कांणा व युवकांना दोघांचे जबरजस्त आकर्षण. सुभाषचंद्र बोस बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष झाले. एका दहशतवाद्याचा सत्कार केल्याच्या आरोपांवरून इंग्रजांनी सुभाषचंद्र यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविले. त्यांची प्रकृती बिघडल्या वरून १९२७ साली त्यांना मुक्त केले.
* १९३३ ते १९३६ या काळात ते युरोप मध्ये होते. ऑस्ट्रीयात व्हिएन्नाला राहिले. हिटलर, मुसोलिनी, इमोन डी, व्ह्यलेरांना भेटले. युरोपच्या राजकारणाचा अभ्यास केला १९३८ च्या हरिपुरा कॉग्रेसं चे अध्यक्ष निवडले गेले. १९३९ साली हि त्यांनाच अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. गांधीजींना ते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. फ़ौरवर्डब्लाकची लढाऊ आघाडी उघडली. सुभाषचंद्र यांचे व्यक्तिमत्व लढाऊ व वादळी होते. त्यांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांची धास्तीच घेतलेली होती. त्यासाठी त्यांना ते नेहमीच तुरुंगात पाठवीत. १९४१ साली सुभाषचंद्र यांना वेषांतर केले. आणि  “झियाउद्दीन” असे नाव धारण करून ते ब्रिटीश्यांच्या नजर कैदेतून सुटले. त्यांच्या भव्य व बलदंड शरीरावरून ते पठाण वाटत. ते भारत सोडून गेले.ब्रीटीश्यांचे जे जे शत्रू हते त्यांना त्यांना ते भेटले. जर्मनीत हिटलरला, जपान मध्ये टोजोला. त्यांनी भारतातले नौजवान एकत्रित केले. आणि ‘ आझाद हिंद सेना’ स्थापन केली. ब्रिटीश्याबरोबर युद्ध करून भारत स्वाभिमानाने स्वतंत्र करायचा असा सुभाष बाबुञ्चा निश्चय होता.
*   ते तरुणांना म्हणत “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा”  तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र देईन ‘मजल-दर मजल, करीत आझाद हिंद सेना भारताच्या रोखाने येत होती. तिने रंगून पर्यंत धडक मारली. पण इंग्रजांच्या शक्ती पुढे तिचे चालले नाही. मग सुभाषबाबूंनी सेनेच्या सैनिकांना “इंग्रजांच्या हाती सापडू नका आज जरी आपल्याला शस्त्र ठेवावे लागत असले तरी पुन्हा तयारी करून पुन्हा सामर्थ्याने ते आपल्याला उचलायचे आहे”. असे सांगितले. १८ ऑगष्ट १९४५ साली तैवान विमानतळा वरून प्रयाण करीत असताना भडकत्या ज्वालांच्या प्रकाश्यात त्यांची प्राणज्योत विलीन झाली.
“जय हिंद जय भारत”.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.