Type Here to Get Search Results !

सुविचार संग्रह ३

रोज अवतीभवती घडणा-या गोष्टी आपल्यावर नकळत संस्कार करत राहतात.  पण त्या मेंढ्यीच्या कळपात मेंढी बनून राहायच की चिखलात उमलणा-या कमळाप्रमाणे उमलत राहायच हे आपणच ठरवायच वाडकर
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
सहसा, रात्र सरून गेल्यावर झोपेत आलेली स्वप्नं आठवत नाहीत. आणि काही स्वप्न पाहताना रात्र सरून जाते, पण झोपच लागत नाही. म्हणजेच झोपून राहायचे असेल तर स्वप्न पाहण्यात काय अर्थ आहे? आणि स्वप्न पाहीले तर ते पूर्ण होण्याआधी झोपणे व्यर्थ आहे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
कोणताही माणूस परिपुर्ण नसतो. त्याचे काही गुण काही दोषही असतात. त्या दोषांना बाजुला सारून गुणांचे संगोपण करायला शिकले की दोष आपोआप दुर्लक्षित होतात. म्हणून सत्कर्म करा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
जगात जास्तीत जास्त प्रेमसंबंध हे एकमेकांचे वाद काढण्यामुळे टिकत नाहीत. प्रेमसंबंध तोपर्यंत टिकतात जोपर्यंत दोघेही विश्वास ठेवतात कि "आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा योग्य जोडीदार मिळाला आहे."
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल. दुनिया झुकती है, कोई झुकानेवाला होना चाहीए.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
न दिसणा-या दुःखांपेक्षा, डोळ्यांना दिसणारं सुख जास्त बरं वाटतं. कारण ते मनाच्या समाधानापेक्षा डोळ्यांच समाधान देतं. पण मनाच्या समाधानाची गोडी इतर कशातही नसते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
समोर आलेली प्रत्येक परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण कोणतीही परिस्थिती त्याला सामोरे गेल्याशिवाय बदलणे अशक्य आहे. प्रयत्न करत रहायचे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
आयुष्याची पाने कधी कटु आठवणींनी भरायची असतात, तर कधी सुखाच्या साठवणींनी. पण मोकळी ठेवून पुढे जाता येत नाही. आणि ज्यावेळी ती मोकळी राहतात त्यावेळी आयुष्य नावाच्या त्या पुस्तकाशी आपले नाते तुटलेले असते. प्रत्येक क्षण जगायला शिका.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
घरट्यातून जाणारी पाखरे दिवसात खुप फिरतात. उंच भरारी घेतात. आकाशात बागडतात. पण सांजेची चाहूल लागली कि पुन्हा घरट्याकडे येतात. त्याच उंचीवर, त्याच झाडाच्या फांदीवर. माणसांनी हेच शिकायला हवे. आयुष्याच्या सांजेला आपल्या माणसांची सोबत जास्त महत्वाची.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
झाडांना पाणी द्यावं लागतं, थोडं उन देखिल झेलावं लागतं. थोडी हवा सुद्धा. पण हे प्रमाणातच असावं लागतं. कारण जास्त पाणी, जास्त उन, जास्त हवा त्यांच अस्तित्व टिकू देत नाही. माणसाचं 'मीपण' असच असतं. थोडं स्वार्थी, थोडं धैर्यशील, थोडं कठोर. पण हे थोडंस स्वत्व हरवून जास्तचा अहंकार यायला वेळ लागत नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या नादात प्रश्नामागचा हेतू जाणन्याचा विचार आपण का करत नाही? कदाचित म्हणूनच जगातील फार कमी लोक संशोधक आणि चिकीत्सक असतात. आणि जे असतात त्यांना यशाची गवसणी घालणे सोपे जाते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
सत्य पचवून घ्यायला ऐकण्याची गरज नसते. समजून घेण्याची असते. कारण ऐकलेेल सत्य दुर्लक्षित करता येत. पण समजलले, उमगलेल सत्य हे स्वतःच बरच काही शिकवून जातं. म्हणून समजायला शिका. जेणेकरून आयुष्याचा पुढील प्रवास कठीण वाटणार नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
आयुष्याच्या प्रवासाचा कंटाळा करून चालत नाही. इथे जो मार्ग पुढे घेऊन जातो त्यावरुनच जावे लागते. म्हणून मित्र नावाचा वाटाड्या सोबत असला कि हा मार्ग अवघड राहत नाही. कारण खरी मैत्री संकटातदेखिल एकटे सोडत नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
वाटेत कितीही चिखल असला तरी वाट सोडून चालत नाही. चिखलात उमलणारे कमळ आणण्यासाठीदेखिल चिखलात उतरावे लागतेच.चांगले घडवून आणायला वाईट गोष्टींना दुर्लक्षित करून चालत नाही. फक्त विरोध करता आला पाहीजे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
माणसाचा स्वभाव पाण्यासारखा असायला हवा. ज्या पात्रात ठेवू तसा आकार घेणारा. जिथे वाट मिळेल तिथे जाणारा. ज्या रंगात मिसळल्यावर त्या रंगासारखा दिसणारा. गरज पडेल तेव्हा बर्फासारखा ठाम होणारा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
आयुष्यातील दुःख हे जखमांसारखे असते. जशा जखमा ओल्या असताना खूप त्रास देतात आणि दिवसांमागून दिवस गेल्यावर आठवणींचा व्रण मागे ठेवून जातात. आपण आपण जखमा झाल्याचा त्रागा करत बसत नाही तसेच दुःखावरही हास्याचे मलम लावून पुढे जायचे असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी करणा-या होळीपेक्षा, ते अस्वच्छ होऊ नये अशा सवयी अंगी लावून घ्या. होळी करायचीच असेल तर आपल्यातल्या दुर्गुणांची करावी.
होळीच्या शुभेच्छा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
कमावलेला पैसा हा कष्टाचा असतो तो जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खुप वाईट वाटते. तसेच कष्टाने वाढवलेल्या, तळहाताच्या फोडासारखे जपणा-या आई-वडीलांना दुरावणारी मुले त्यांना किती दुःख देतात याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
मातृभुमीसाठी आयुष्य खर्च केलेल्या महान लोकांच्या आयुष्यात शिकण्यासारखे खुप आहे. थोरपणा अंगी येण्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची गरज असते. घडलेल्या इतिहासातून शिकून इतिहास घडवायला शिका.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
यश/अपयश आणि प्रयत्न एकमेकांशिवाय निर्रथक असतात, जसे नट आणि रंगभुमी असतात.रंगभुमीशिवाय नटाला किंमत नसते अन् नटाशिवाय रंगभुमी रंगभुमीच नसते.प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न अपरिहार्य आहेत.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
कमळाची शेती करणा-यांनी चिखलाची भिती मानून कसे चालेल. हि-याच्या खाणीत काम करणा-यांनी अंधाराची भिती मानून कसं चालेल.तसेच जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करणा-यांनी हरण्याची भिती मानने ही योग्य नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
फुलाफुलांवरचे रंग़ धारण करणारी फुलपाखरे आपल्या छोट्याशा आयुष्यात कितीतरी जणांना हसवायला शिकवतात.  माणसांनी सुद्धा असेच जगायला हवे. स्वैर, स्वच्छंदी  इतरांच्या चेह-यावर हास्य फुलवत. नाहीतर आपले आयुष्य देखिल फार मोठे नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
समोरच्या व्यक्तीच्या मनात घर बनवायला त्याचा विश्वास जिंकावा लागतो. तो विश्वास मिळाल्यावर त्याला टिकवावा लागतो. समजुतदारपणाने जपावा लागतो. आणि आयुष्यभरासाठी मनात ठेवावा लागतो. अशी घरे बनवणाराच सर्वात श्रीमंत होतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
आयुष्याच्या इंद्रधनूत सुखाच्या आणि  दुखाच्या रंगांचे समान महत्व असते. एकाच रंगात रंगलेले आयुष्य मीठ नसलेल्या जेवनासारखे बेचव असते. त्यामुळे आलेल्या सुखाचा उपभोग घ्या, दुखांशी लढत रहा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
प्रेमाचा ओलावा असलेल्या मनाच्या जमिनीवर सुखाचे मळे फुलायला जास्त वेळ लागत नाही. फक्त त्याची निगा राखणं, आणि सोबत देत राहणं शिकलो की असे मळे कायम फुललेले राहतात.
 शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
लोक सुरवंटाच्या प्रेमात कधीच नसतात. ओढ असते फुलपाखराची. पण सुरवंटाच्या रुपातून गेल्याशिवाय फुलपाखरू होता येत नाही. तसेच मोठे होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी कष्ट तर करावेच लागणार.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर.
जगात सर्वात जास्त गतिमान असतो तो म्हणजे काळ. एकदा हातातून निसटला कि आयुष्यभर लक्षात राहतो. विचार करण्याची संधी न देता. म्हणून कोणत्याही गोष्टीचा आधीच विचार करणे उत्तम.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
जोपर्यंत इच्छा आणि गरज यांमधला फरक कळतो तोपर्यंत प्रयत्नांची दिशा योग्य असते. ज्याक्षणी ते विसरलो त्या क्षणी हव्यास सुरू होतो. मग मार्ग चांगला कि वाईट हेदेखिल विसरतो. इच्छा मनात जपायला शिका आणि गरजेसाठी योग्य प्रयत्न करायला शिका.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
आरसा माणसाचं बाह्यरुप दाखवतो. पण अंतर्मनाची जाणीव करून देणारा आरसा अजुन बनलाच नाही. कारण माणसाला स्वतःच्या मनापेक्षा, इतरांच्या मनात काय चाललय हे जाणून घेण्याची हाव असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
कोणत्याही नात्याचे मुळ असते विश्वासावर. विश्वास ठेवण्याचे काम आपण करत रहायचे. जे सोबत राहतात त्यांना जपायचे. आणि दूर जाणा-यांना विसरायचे.
अापल्या चुकांमधून शहाणे व्हायला आपण शिकतो खरे. पण अनुभवातून शिकलेल्यांचा सल्ला घेणे जास्त सोईस्कर असते. त्यामुळे मोठ्या लोकांचे मार्गदर्शन असलेले उत्तम. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे असते त्या सल्ल्याचा उपयोग करून घेणे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
कोणाला किती आयुष्य मिळेल हे जरी आपल्या हातात नसले, तरी मिळालेल्या क्षणभंगूर आयुष्याला घडवण्याचे काम आपणच करायचे असते.२४ वर्षाचे संभाजी असो वा ७० वर्षाचे गांधीजी. आयुष्य कसे घडवायचे हे कळायला हवे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
प्रत्येक दिवस सारखा नसतो.
कधी आनंदी, कधी उदास,
कधी दुखी, कधी झक्कास..
पण दर दिवशी एक गोष्ट नेहमी तशीच असते. ते म्हणजे आई-बाबांचे आशिर्वाद.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
भरलेल्या ओंजळीमधे आणखी काही टाकले, तरी ते व्यर्थच जाते. पण माणसाची हाव कमी होत नाही. म्हणून भरलेल्या ओंजळीला संपवणे कठीण असते. जे मिळाले त्यात खुष रहा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
सोन्याचा खरेपणा पाहुन आपण ते खरेदी करतो. मग माणसांचा का नाही? समोरचा व्यक्ती खरा आहे हे न जाणता विश्वास ठेवतो. आणि मग विश्वासघात झाला असे मानतो. लक्षात ठेवा सोन्याचा खरेपणा पिवळ्या रंगावर नाही तर त्याच्या आतील गुणधर्मांवरुन कळतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
मनातल्या गोष्टी ओठांवर असणा-यांना फक्त शिव्या मिळतात.आणि पोटात एक अन् ओठांवर एक असणा-या, कौतुक करणा-यांना आभार? जो सत्य बोलतो त्याला मित्र बनवा. आणि कौतुक
करणा-यांपासुन सावधान रहा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
माणसाची जडण-घडण ही फक्त शालेय शिक्षणावर अवलंबून नसते. त्याच्या आजूबाजूला घडणा-या गोष्टीही त्यासाठी तितक्याच जबाबदार असतात. सोन्याला फक्त गरम करून फायदा नसतो, घाव सोसल्याशिवाय त्याचाही आकार घडत नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
रोज रात्री अंधारात आपण डोळे बंद करून झोपतो कारण आपल्याला माहित असते कि डोळे उघडल्यावर जग प्रकाशमय असणार. मग तसेच एखाद्या संकटाशी सामना करायचा असतो. कारण कितीही अंधारमय संकट असले तरी आशेचा उजेड दिसायला रात्र पार करावीच लागते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
मन हे आरशासारखे असते. स्वतःचेच प्रतिबिंब स्वतःला दाखवणारे. कितीही तुटलेले असले तरी. मग हे प्रतिबिंब नेहमी चांगले राहील असे वागा. कारण आरसे बदलता येतात पण प्रतिबिंब नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
बोलणा-याला बोलताना जिभेपेक्षा डोक्याचा वापर जास्त करायचा असतो.पण तो अगदी उलटे करतो. जिभेवर ताबा ठेवणा-याला जगाच्या पाठीवर टिकणे जास्त सोपे जाते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
अनोळखी व्यक्तींच्या काही सवयींची आपण किळस करतो. राग करतो. पण तीच समोरची व्यक्ती ओळखीची असेल तर त्याच्या वेगळ्या सवयी देखील आपल्याला कळून येत नाहीत. कारण त्यावेळी मैत्रीच्या नात्यानेच आपण त्याकडे बघतो. दोष सवयी असणा-यांचा स्वभावात नसतो, तर त्याकडे पाहणा-यांचा विचारात असतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
  संकटांशी लढणे अवघड नसते, जोवर मनात आत्मविश्वास आहे, यश मिळवण्याची आस आहे,
पाठ थोपटणारे हात आहेत,  आणि कधी न सुटणारे हात आहेत. संकटेच खरी नाती जोडण्याचे काम करतात.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
आपण नेहमी आपल्याला काय मिळवायचं आहे, हे विचार करत राहतो. कधीतरी, आपल्याला जे मिळालयं त्याचा वापर कसा करायचा हा विचार करून बघा. कारण इच्छा कधीच संपणार नाही.पण मिळालेल्या समाधानाचं मोल जास्त असतं.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
प्रत्येक व्यक्तीला बुद्धी मिळालेली असते. कोणाला जास्त तर कोणाला कमी. पण ती कमी-जास्त असून फायदा नसतो. त्याचा वापर आपण किती योग्य प्रकारे करतो यावर हुशारी कळते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
शिकार करण्यासाठी वाघ दबा धरून बसतो. आणि सावज त्याच्या टप्प्यात आलं कि सर्वशक्तीनिशी झडप घालतो.  माणसांनीदेखिल यश मिळवण्यासाठी धीर धरावा लागतो. आणि यश दृष्टीक्षेपात आले कि सर्वशक्तीनिशी प्रयत्न करायचा असतो.
शेवटी ज्याची त्याची वेळ स्वतःच ठरवायची असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
आयुष्य पेल्यासारखे असते. कधी दुःखाचे पेय तर कधी आनंदाचे. आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काहीच तो टिकू देत नाही. सुखाचे एकच पेय त्यात टिकत नाही. आणि दुःखाचे पेय प्यायल्याशिवाय सुखाचा उपभोग घेता येत नाही. म्हणून जे मिळाले त्याला आनंदाने जगायला शिका.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
जेव्हा दिवसभराचा थकवा हा आईच्या एका हाकेने निघून जातो, कामावरचे व्याप वडीलांसमोर सांगून स्वतः मनमोकळे होतो, काम सोडून भावा-बहिणीबरोबर गप्पा मारण्यात दंग होतो, तेव्हा आपला दिवस सुखाने संपतो. आपल्या माणसांमध्ये मिळणारा सहवास ख-या अर्थाने आयुष्यात सुख भरतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
तुटलेल्या काचा कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच. तशीच नाती असतात, एकदा तुटली की, पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो. म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा. शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जख़मा होतातच.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
आईच्या रुपात जन्म देते, बहीणीच्या रुपात वाढवते, मैत्रीणीच्या रुपात हास्य देते, सहचारीणीच्या रुपात साथ देते, मुलीच्या रुपात आधार देते. स्त्री ही शक्ती असते. आणि मिळालेल्या शक्तीचा आदर सगळ्यांनीच करायला हवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
दुरावलेली मनं ही शत्रुने दिलेल्या जखमांसारखी असतात. शत्रुने स्वतः मायेची फुंकर घातली, त्यावर मलम लावले, तरी त्याचे व्रण कायम तसेच राहतात. म्हणून मने दुरावण्याआधीच समजुतदारी दाखवली तर नातीही टिकतात आणि विश्वासही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
कोणतेही कार्य करताना त्याबद्दल आपलेपणा असू द्या. करायचे म्हणून कसेही करु नका. नकळत ते काम आपल्यावर आणि आपल्या जिवनावर परिणाम करत जाते. लक्षात ठेवा, माणूस धर्माने मोठा होत नाही. केलेल्या कर्माने मोठा होतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
प्रेम हे फक्त द्यायचे असते. निस्वार्थपणे जपायचे असते. परताव्याची अपेक्षा न करता. ती व्यवहाराची गोष्ट नसते. कारण जर तसे असेल तर जगातील प्रत्येक आई सर्वात श्रीमंत असती. म्हणून प्रेम करा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
अपेक्षांचे ओझे घेऊन जगण्याला जगणं म्हणत नाहीत. मागणीप्रमाणे पुरवठा देणारे जिवन जगू नका. जगा कर्णासारखे. दानशूर. परत काही मिळण्याची अपेक्षा न करता..
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
जिंकणे-हरणे हे फक्त मनाचे खेळ आहेत. खरे मुळ तर आत्मविश्वासाचे बळ आहे. जर आत्मविश्वास असेल तर जिंकून मिळालेला आनंद उपभोगता येतो. आणि हरलो तर प्रयत्न केल्याचे समाधान मिळते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. पण पुढे घडणा-या गोष्टींसाठी बदल घडवू शकतो. म्हणून काहीही करण्याआधी त्याबद्दलच्या भविष्याचा विचार करा. नक्कीच त्यामुळे सकारात्मक परिणाम घडतील.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 18/04/2015 08:56 am
सुख आणि दुःख नदीच्या किना-याप्रमाणे असतात. एक किनारा सुखाचा,तर दुसरा दुःखाचा. एकही किनारा सुटला तरी जिवनरुपी नदीचे अस्तित्व मिटते. म्हणून  सुखाच्या भ्रमात वावरताना दुःखाचे वास्तव्य स्विकारायला शिका.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 19/04/2015 06:07 am
त्याने काय वाईट केले, आपण कसे चांगले हे दर वेळी सांगण्यापेक्षा, इतरांनी काय चांगले केले आणि आपण काय सुधारायला हवे हे ओळखणे नेहमीच महत्वाचे.
दुस-यांच्या घराच्या फुटलेल्या कौला मोजण्यापेक्षा स्वतःच्या घराची डागडुजी करा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 20/04/2015 06:48 am
आत्मविश्वास आणि जगण्याची battery कमी झाली की, हास्याच्या Charger लाआयुष्याचा मोबाईल Charge करायचा. दुःखाचा Talk time जास्त असला तरी सुखाच्या Free Roaming मधे फिरायचे असते.
आयुष्य आनंदाने जगायचे असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 21/04/2015 06:52 amरोज रात्री अंधारात आपण डोळे बंद करून झोपतो कारण आपल्याला माहित असते कि डोळे उघडल्यावर जग प्रकाशमय असणार. मग तसेच एखाद्या संकटाशी सामना करायचा असतो. कारण कितीही अंधारमय संकट असले तरी आशेचा उजेड दिसायला रात्र पार करावीच लागते.

विक्रम वाडकर 21/04/2015 06:52 am
माणसाने ठेच लागल्यावर स्वतःला सांभाळायचे असते. कारण त्यासाठी इतर कोणी हात देईल की नाही हे सांगता येत नाही. आणि जर कोणी मदत केली तर त्या मदतीची अपेक्षा करत पुन्हा ठेच लागू द्यायची नसते. कारण प्रत्येक ठेचेला मदत करणारे हात मिळतीलच असे नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर22/04/2015 06:46 am
आजच्या संकटाशी आपण कसा मुकाबला करतो, संघर्ष करतो, यावर आपले भविष्यातील सामर्थ्य अवलंबून असते. आणि आपले सामर्थ्य हे आपण ओळखायचे असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 23/04/2015 08:33 am
दुस-याच्या स्वभावाचे अंदाज आपण तेव्हाच बांधू शकतो जेव्हा आपण स्वतःचा स्वभाव ओळखतो. आणि स्वतःचा स्वभाव ओळखायला अनुभवांची गरज असते. असे अनुभव गोळा करण्यासाठी लागणारी जिद्द सर्वांना मिळो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 24/04/2015 07:40 am
जेव्हा विचारांच्या गर्दीमधे सुखाच्या वाटा अंधुक होतात, तेव्हा इतर सर्व विचार सोडून आनंदाचे क्षण आठवावे. त्या जुन्या आठवणींमधे अशी शक्ती असते की नकळतपणे आपल्या चेह-यावर हास्य फुलवते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 25/04/2015 09:09 am
माणसाच्या राहणीमानावर त्याचा मोठेपणा कळत नाही. तो त्यांच्या पैशाचा मोठेपणा असतो. ज्यांचे विचार, सवयी, स्वभाव उच्च असतात तेच ख-या अर्थाने श्रेष्ठ असतात. त्याच्या मोठेपणाची तुलना करणे शक्य नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 26/04/2015 05:24 am
ओठांवर काही आणि मनात काही अशा स्वभावामुळे माणसे एकमेकांपासुन दुर चालले आहेत. असे दुर होण्यापेक्षा जे मनात आहे ते ओठांवर येऊ द्या. एकतर तो कायमचा दुर होईल किंवा कायमचा खास होईल.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 27/04/2015 09:04 am
शरीराने भक्कम असणा-याला शारीरीक शक्तीने जग जिंकता येत. पण प्रत्येक वेळी ही शक्ती उपयोगी ठरेल असे नाही. मनाने बलशाली असणा-याला मृत्युदेखील
विचार करून शिवते. म्हणून मनाची इच्छाशक्ती प्रबळ राहू द्या,जग स्वतःहून तुमच्या पायाशी येईल.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 30/04/2015 06:57 am
महाराष्ट्राच्या पुण्य भुमीत नामदेव, तुकारामांसारखे साधु-संत घडले, महाराज आणि त्यांच्या मावळ्यांसारखे शुरवीर घडले, सावरकरांसारखे लढवय्ये घडले, आणि सीमेवर बलिदान देणारे सैनिक घडले. अशा पावन मातीमध्ये आपल्याला जन्म मिळाला हे आपले सद्भाग्य आहे. अशा शुरवीरांना मानवंदना. महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 01/05/2015 08:02 am
एखाद्या गोष्टीच्या वारंवार करण्याने सहजता येते. आणि सहजतेमधून सवयी घडतात. म्हणून करायच्याच असतील तर चांगल्या गोष्टी करा. त्यांची सवय लावून घ्या. म्हणजे आपल्या पाप-पुण्याच्या तराजूला पापाकडे कधीच झुकता येणार नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 02/05/2015 08:58 am
जगात सर्वात शक्तिशाली असते माणसाचे मन. क्षणात जवळ येते तर क्षणात दुरवर जाऊ शकते. विचाराने नवीन जग बनवू शकते असे मन. आणि याच स्वतःच्या मनावर ताबा असणा-याला कोणतीही गोष्ट अवघड नसते. स्वतःवर विजय म्हणजेच जगावर विजय.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 03/05/2015 07:13 am
जिवनात कोणती वाट निवडायची हे आपल्यावर असते.
चुकीच्या मार्गावर गेलात आणि त्याची जाणिव झाली तरीसुद्धा तुम्ही परत फिरू शकता. कारण वाट चुकण्याच्या दुःखापेक्षा वाट सापडण्याचा आनंद शतपटीने चांगला असतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 04/05/2015 06:47 am
आपण ज्या समाजात राहतो त्याबद्दल आपली स्वतःचीदेखिल जबाबदारी असते. आजुबाजुला
घडणा-या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग तीच गोष्ट स्वतःसोबत झाली की आरडाओरडा करत बसतो. म्हणून आपल्या समाजाला स्वतःचे कुटुंब समजा मग खरी नाती वाट्याला येतील.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 06/05/2015 06:56 am
ज्ञान दिल्याने वाढते हे खरे आहे, पण ज्ञान आत्मसाद करण्यासाठी आकलनशक्तीची गरज असते. आणि आत्मसाद केलेल्या ज्ञानाचा चांगला वापर करावा. कारण घेतलेल्या गोष्टींचा वापर करायचा असतो, अन्यथा त्या निष्कामी होऊन जातात.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 07/05/2015 06:54 am
यश मिळणे न मिळणे यावरून कोणाच्याही बौद्धिक अथवा मानसिक क्षमतेचा अंदाज लावता येत नाही. पण अपयश हाती आल्यावर त्या अपयशाचा स्विकार करुन पुढे ती व्यक्ती काय विचार करते यावर त्याची क्षमता कळते. अपयशावर मात करून यश तुमच्या वाट्याला येवो हीच सदीच्छा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 08/05/2015 06:10 am
असं म्हणतात कि 'जे होते ते चांगल्यासाठी होते', पण जे घडणार ते चांगलेच व्हावे यासाठीदेखिल प्रयत्न करायचे असतात. कारण बसल्या ठिकाणी जर सगळे मिळू लागले तर त्याची किंमत राहत नाही. कष्ट करून मिळालेल्या फळाची गोडी अप्रतिम असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 09/05/2015 07:17 am
काही जण कष्टाने माणसे कमवतात, तर काही नशीबाने. माझ्या आयुष्यात तुमच्यासारख्या मित्र-मैत्रिणींचे अमुल्य योगदान आहे. ज्यांची साथ सुटली त्यांनी खुप शिकवले. आणि जे माझ्यासोबत आहेत ते अजुनही शिकवत आहेत. तुम्हा सर्वांचे आभार. अशीच साथ असू द्या.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 10/05/2015 09:35 am
आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात. काही राहतात. काही निघुन जातात. जे जातात त्याना जाऊ द्यावे, कारण ते अशी जागा मागेे ठेवून जातात जी जागा त्यांच्याहून योग्य साथीदारांसाठी असते. थोड्या वेळासाठी असो वा कायमसाठी.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 11/05/2015 06:49 am
आयुष्य कसे जगावे हे आपल्याला कोणीच शिकवत नाही. घडलेल्या चुकांमधून सावरून स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचे कौशल्य ज्याच्याकडे आहे तो जगातील कोणत्याही संकटासाठी सज्ज असतो. अशी ताकत, कौशल्य तुम्हाला लाभो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 12/05/2015 06:48 am
जिवनाच्या रस्त्यावरचे धुकेदेखिल तितकेच भयंकर असते. कधी वाट भटकवते, कधी अपघात घडवते.
पण दोन्ही ठिकाणी गरज असते धैर्याची. प्रत्येक धुके हे अनंतकाळचे नसते. योग्य वेळ आली की मार्ग स्वच्छ होतात. महणून धैर्याने काम करा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
एखादी न आवडणारी गोष्ट घडल्यास त्यावर लगेच प्रतिक्रिया देणे ठीक नसते. कारण त्यामुळे वाद होण्याची आणि परिणामी भांडणे होऊ शकतात. म्हणून थोडे धीटाईने वागा. तसेही मौनाची भाषा ही अधिक परिणाम करते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 15/05/2015 06:57 am
प्रत्येकाने काहीतरी छंद जोपासायला हवा. कारण जेव्हा आपण एकटे असतो आणि वेळ जात नसतो तेव्हा छंद आपल्याला नवी वाट दाखवतात. आणि छंदामधे आपण इतके गुंतून जातो कि वेळ कधी संपू नये असे वाटते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 16/05/2015 09:48 am
माणसांचा एक वाईट गुणधर्म आहे, तो हव्या त्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. तो त्याला ज्या हव्यात त्याच गोष्टी लक्षात ठेवतो. म्हणून स्वार्थी होतो. निस्वार्थी माणसे इतरांचादेखिल विचार करतात, म्हणून थोर होतात.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 17/05/2015 08:39 am
मनाची शुद्धता मोजता येत नाही कारण मन हे असले तर अगदी निर्मळ असते अथवा मलिन. निर्मळ मने ही माणुसकीने भरलेली असतात. तळ दिसणा-या पाण्याप्रमाणे स्वच्छ असतात. अशी निर्मळ मनाची माणसे तुम्हाला लाभो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 18/05/2015 07:11 am
केस पांढरे झाले, वय वाढले म्हणजे  ज्ञान वाढले असे होत नाही. आजूबाजूला घडणा-या जिवंत उदाहरणांमुळे, उपभोगलेल्या सुख-दुखामुळे, झगडलेल्या परिस्थितीमुळे जे शहाणपण येते, जे अनुभव मिळतात ते आपल्याला ज्ञान देतात.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 19/05/2015 06:55 am
निर्णय जग बदलू शकतात. होत्याचे न्हवते करू शकतात. अपयशाच्या उंब-यातही यश मिळवू शकतात. रस्त्यावरच्या फकिराला आभाळाची उंची दाखवू शकतात. गर्विष्ठाच्या गर्वाला मोडीत काढू शकतात.
विचार करा, निर्णय घ्या आणि ठाम रहा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 20/05/2015 06:47 am
ध्येयाचा सुर्य नेहमी तळपत ठेवला पाहीजे. कारण जगण्यासाठी आवश्यक गोष्टींमधे ध्येय हि देखिल गरज येते. आयुष्यात ध्येयच नसेल तर त्या आयुष्याला अर्थ राहत नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 21/05/2015 06:58 am
आपल्या आयुष्याला चाफ्याच्या सुगंधासारखे असू द्या. रात्र असो वा दिवस नेहमी आपल्या गुणाने इतरांना मोहक वाटणारे. म्हणूनच लक्षात ठेवा बाह्य सुंदरता ही क्षणभंगूर असते. गुणांमुळेच आयुष्यात सुंदरता येते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 22/05/2015 06:53 am
जिंकण्याची सवय लावून घेऊ नये. कधीतरी इतरांनाही जिंकू द्यावे. कारण स्वतःमधील परिपक्वता ही संयमातून जास्त कळते. आणि त्यासाठी यशाच्या गोडीबरोबर अपयशाचे कडुलिंब चाखावेच लागते. यशापेक्षा अपयश जास्त शिकवते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
ज्या झाडाचे मुळ गोड असते त्याची फळे गोड असतीलच असे नाही. आणि गोड फळे असणारे वृक्षही मुळाशी गोड असतील याची शाश्वती नाही. माणसांचेही तसेच आहे. मिळालेल्या गोष्टींतून चांगले संस्कार निवडता आले, तर परिणाम गोडच होतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 24/05/2015 08:10 am

स्वतः केलेल्या चुकांसाठी शिक्षा भोगण्याची तयारी हवी. कारण त्यावर आपण स्वतःच पांघरूण घातले तर त्या चुका पुढे जाऊन गुन्हा होऊ शकतात. आणि चुका घडणे हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. मग त्या पुन्हा पुन्हा न व्हाव्यात याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आपलीच.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 25/05/2015 07:01 am
डोक्यात विचारांचे वादळ घोंगावत असेल तर थोडा वेळ शांत रहावे. कोणताही विचार न करता. एकदा डोक्यातील गर्दी कमी झाली कि हळूहळू मार्गदेखिल सापडू लागतात. संयमाने विचारशक्ती वाढते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 26/05/2015 06:37 am
माणसाला आरशात दिसणा-या प्रतिबिंबाला पाहून बरे वाटते. पण इतरांच्या मनाच्या आरशात जर आपले प्रतिबिंब खरे असेल, चांगले असेल. तर त्याचे कौतुक जास्त होते. म्हणून चांगले वागण्याचा प्रयत्न करा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 27/05/2015 06:44 am
काही माणसे नकळत आपल्या आयुष्यात येतात, काही वेळ अनोळखी असतात. आणि ओळख झाली की आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक होतात. इतके की त्या नात्याला रक्ताच्या नात्याहून श्रेष्ठ मानू लागतो. मैत्रीच्या नावाने सुरवात होते अन् जिवलग म्हणून आयुष्यभर सोबत राहते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 29/05/2015 06:58 am
मातीचे मडके बनवण्यासाठी ती ओली करून, त्याला आकार देऊन, भट्टीत सुलगावे लागते. सोने, चांदी वा अन्य कोणत्याही धातूचा वापर करण्यासाठी त्या धातूला वितळवून हवा तो आकार दिला पाहीजे. त्याचप्रमाणे पंचधातूने बनलेल्या शरीरावर चांगले संस्कार केल्यावर सुदृढ आकार मिळतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 01/06/2015 06:37 am
आयुष्यात प्रत्येक गोष्ट इच्छेप्रमाणे होईलच असे नाही. कधी कधी तडजोडी करून पुढे वाटचाल करत रहायची असते. कदाचित आयुष्यात तीच तडजोड तुमच्या यशासाठी वा भल्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 30/05/2015 09:11 am
राग, द्वेष, मत्सर हे क्षणिक असतात. पण त्यांचा परिणाम कायमचा असू शकतो.  म्हणून स्वतःवर संयम ठेवण्याचा गुण मनुष्याला दिलेला आहे. पण काहीच जण त्याचा वापर करतात. इतर जण पच्छाताप करतात किंवा दुर्लक्ष करतात. स्वतःवर ताबा ठेवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 02/06/2015 06:56 am
कधी आयुष्यात अशी वेळ आली की २ चांगल्या गोष्टींपैकी एकच निवडायची असेल,तर जी कमी चांगली आहे ती निवडावी. कारण चांगल्यातून चांगले मिळवणे जास्त सोपे असते. कसोटी तर कमीपणा असलेल्या गोष्टींंतून चांगुलपणा शोधून काढण्यात असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 03/06/2015 06:56 am
हक्काच्या ठिकाणी वा व्यक्तीजवळ घेतलेला २ क्षणांचा विसावा आपल़्याला एक नवे चैतन्य, एक नवी उमेद देऊन जातो. म्हणून कधी दुखी असाल अथवा जेव्हा डोक्यात खुप सारे विचार असतील, तेव्हा आपल्या माणसांच्या सानिध्यात रहावे. नवी उमेद मिळते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 04/06/2015 06:57 am
माणुसच माणसाच्या प्रगतीसाठी वा अधोगतीसाठी कारणीभूत असतो. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष. जाणतेपणाने केलेले असो वा अजाणतेपणाने. म्हणूनच माणसानेच माणसांची मदत करून माणुसकी जपायला हवी.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
सतत काहीतरी शिकण्याची जिद्द अंगी असेल, तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. एकाच जागी पडलेला दगड देखिल आपल्याला शिकवतो की ठाम कसे रहायचे, ऊन पावसाची तमा न बाळगता. म्हणून शिकत रहा आणि शिकवत रहा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 07/06/2015 07:47 am
स्वतःच्या जखमा ब-या होण्यासाठी आपण जसे थोड्या दिवसांचा काळ जाऊ देतो, तसेच संकटातून वा दुःखातून सावरणे जास्त अवघड नसते. थोडा वेळ जाऊ दिला की आयुष्याच्या जखमादेखिल भरून निघतात. काळ या जालिम औषधावर विश्वास हवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 08/06/2015 06:45 am
आयुष्यात तुम्ही कोणत्याही माणसाशी वाद घालू शकता, पण आपली सतत काळजी करणारी आई आणि प्रत्येक हट्ट पुरवणारे बाबा, यांच्याशी वाद घालू नका. आईच्या गर्भात असल्यापासून त्याना आपली काळजीच असते आणि त्यांचा निर्णय आपल्या भल्यासाठीच असतो.
या गोष्टीची जाण ठेवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 10/06/2015 06:37 am
एक मुल जन्माला आल्यावर निदान एक वृक्ष जगवा. इतर कोणासाठी न्हवे, तर त्या चिमुकल्याच्या श्वासासाठी. असे करत राहील्यास लहान मुलाना संस्कारांचे बाळकडू मिळते. आणि मोठ्यांना एक चांगला संदेश. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे!!
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 11/06/2015 07:04 am
प्रेम पावसासारखे करावे. पुन्हा काही मिळण्याचा स्वार्थ न ठेवता, सर्वांच्या मनाला तृप्त करण्याची भावना असल्यासारखा. आणि प्रेमाची जाणिव इतरांनाही करून देणारा. पाऊस. यंदाचा पाऊस तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आणि यशाचा वर्षाव करो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 12/06/2015 08:08 am
हास्य,  स्वतःचे असेल तर आनंद, स्वतःवर असेल तर दुखद. दुस-यावर असेल तर मजा, आणि दुस-यासाठी असेल तर समाधान. ठरवा कोणते हास्य श्रेष्ठ. हसत राहा आणि हसवत राहा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 13/06/2015 09:14 am
आयुष्य म्हणजे काहीतरी मिळवणं किंवा कष्ट भोगणं न्हवे, तर आयुष्य म्हणजे जसं आहोत तसं रहाणं,  इतरांच्या चेह-यावर आपल्यामुळे मिळालेल हास्य पहाणं. कधी लहान होऊन खेळणं तर कधी हुशारीने वागणं. आयुष्य म्हणजे आनंदाने जगणं.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 15/06/2015 07:08 am
इतरांवर चिखल फेकणा-याचे हात चिखलानेच माखलेले असतात. आणि इतरांवर फुलांचा वर्षाव करणा-याचे हात सुगंधित झालेले असतात. इतरांना लावलेला बोल आधी स्वतःला सहन करावाच लागतो. म्हणून हातून नेहमी सत्कृत्य घडू द्यात.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 16/06/2015 07:19 am
वस्तु तोडण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही. कौशल्य, कस तर ती वस्तु बनवण्यासाठी लागतात. म्हणूनच कोणतीही गोष्ट करण्यापुर्वी विचार करा. कारण तुटलेली वस्तू जोडणे फार अवघड असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 17/06/2015 07:28 am
माणसाचे मन हे एका चाळणीप्रमाणे असायला हवे. आजुबाजुच्या सर्व चांगल्या, वाईट गोष्टी तिथुनच जायला हव्यात. पण त्या गोष्टींतून फक्त सत्य, चांगल्या आणि हितकारक गोष्टीच गाळुण घ्याव्यात. हे जमवून
घेणा-याला काहीच अशक्य वाटणार नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 19/06/2015 07:02 am
हास्य आणि मदत ही फुलाच्या सुगंधाप्रमाणे आहे.
जितके तुम्ही इतरांना वाटता, तितके तुमचेच आयुष्य हास्यमय आणि तितकीच तुम्हाला मदत मिळत राहते.
म्हणून २ सेकंदाचे हास्य आणि काही क्षणांची मदत करायला काय हरकत आहे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 20/06/2015 09:31 am
नवीन कार्याची सुरुवात नेहमी शुद्ध विचारांनी, आत्मविश्वासाने आणि काही अपेक्षा न करता करावी. विचारांमुळे मन शुद्ध राहते, आत्मविश्वासाने चांगली ऊर्जा मिळते, आणि अपेक्षा नसेल तर हरण्याचे भयही नसते वा जिंकलेल्याचा गर्व.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 24/06/2015 06:07 am
आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो, तो जिवनात यशस्वी होतोच.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 25/06/2015 06:14 am
ज्या गोष्टी करून मनाला समाधान मिळते, त्याच गोष्टी कराव्यात. कारण सांगितलेल्या गोष्टी करणा-याला गाढवाप्रमाणे राबवले जाते. आणि प्रगती करणे जास्त अवघड जाते. ऐकावे जनाचे, करावे फक्त मनाचे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 26/06/2015 06:21 am
कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव एका भेटीत ठरवायचा नसतो. त्यांना वेगवेगळ्या वेळी भेटून मग ठरवायचं कि खरचं ती व्यक्ती कशी आहे. जसे सोमवारी कामावरून आलेल्या माणसांचा स्वभाव शुक्रवारी वा शनिवारी आठवडा संपल्यावरच्या स्वभावापेक्षा वेगळा असतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 27/06/2015 09:39 am
जिथे युग २१व्या विज्ञानाने सुधारलेल्या शतकात पोचले आहे, तिथे अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक गोष्टी अजुनही पाय रोवून आहेत. मान्य आहे की त्यापैकी काही वैज्ञानिकांनी बरोबर सिद्ध केल्या, पण त्यांनीच अनेक गोष्टी चुकीच्यादेखिल सिद्ध केल्या आहेत. अजुनही वेळ गेली नाही. डोळे उघडा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 28/06/2015 07:17 am
बालपण, तरूणपण आणि म्हातारपण हेच आयुष्याचे सत्य आहे. म्हणून बालपणी खुप खेळण्याचा आनंद घ्या, तरूणपणी काम करता करता जबाबदा-यांचा अनुभव घ्या, म्हातारपणी आपण केलेल्या संस्कारांचे फळ मिळवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 29/06/2015 06:36 am
समांतर व्यक्तीमत्व असणारे लोक विचाराने समांतर असतीलचं असे नाही. त्यांचा स्वभाव सारखाच असला तरी मने वेगवेगळी असतात. म्हणून माणसांचे विचार, त्याचे मन किती स्वच्छ आहे हे जाणून घ्या. त्यामुळे आपल्या मनाची शुद्धता आपण ठरवत असतो.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 30/06/2015 06:17 am
सत्याचे खरे साक्षीदार असतो आपण स्वतः. कारण इतरांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टींवर आपला विश्वास तोपर्यंत नसतो, जोपर्यंत त्या आपण स्वतः अनुभवत नाही. सत्याची पाठराखण करताना तो स्वतःवरचा विश्वास असाच टिकवून ठेवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 01/07/2015 06:22 am
विश्वासाच्या एका अदृश्य धाग्यावर नात्यांची गुंफण असते. नाते कोणतेही असो. आई-मुलगा, बाबा-मुलगी, भाऊ-बहीण, प्रियकर-प्रेयसी, ई. इतकेच काय स्वतःचे स्वतःशी असलेले नातेसुद्धा. फक्त एका वाक्याने ही नाती टिकून असतात."माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे."
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 02/07/2015 06:34 am
केलेल्या गुन्ह्याची जाणीव नसेल तर मागितलेल्या माफीची किंमत राहत नाही. आणि मिळालेल्या मदतीची जाणीव असेल तर अहंकाराचा दुर्गुण आपल्यात शिरत नाही. म्हणून माफी असो वा मदत घडलेल्या गोष्टींची जाण ठेवा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 03/07/2015 06:41 am
मनात आलेल्या गोष्टी पुर्ण करण्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागते. 'असेल हरि तर देईल खाटल्यावरी' असे म्हणून एकाच जागी बसणा-यांना यशाची गोडी कधीच चाखता येत नाही.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 06/07/2015 06:22 am
काही जणांना 'मी'पणाचा इतका गर्व असतो की जरी इतरांनी मदत केली तरी त्याला किंमत न देता श्रेय स्वतः घेतो. लक्षात असू द्या, यशाचे श्रेय वाटून घ्यावे अन् पराजयाचे स्वतःला द्यावे.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 07/07/2015 06:14 am
सुर्यफुल नेहमी सुर्याच्या दिशेने झुकलेले असते, कारण
तो त्याच्या ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाचा एकतरी स्त्रोत असतो, ज्या व्यक्तीला पाहून क्षीण निघून जातो मन प्रसन्न होते. अशा व्यक्तींना ओळखा आणि त्यांचे सानिध्य कधी सोडू नका.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 09/07/2015 06:32 am
कतृत्व श्रेष्ठ असेल तर यश कितीही हुलकावण्या देत राहीलं तरी प्रयत्नांची कास न सोडण्याची उमेद मिळत राहते. आणि यश स्वतःहूनआपल्याकडे येते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 10/07/2015 07:00 am
कोणी आपल्या पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्यासाठी सगळेच तयार असतात. पण त्यांना पुढे गेलेले पहायचे नसेल तर तुम्ही स्वतः त्याच्या पुढे जा कारण इतरांना मागे आणन्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा स्वतः पुढे जाण्यात खर्ची घालवणे उत्तम.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 11/07/2015 08:28 am
आयुष्यातले काही निर्णय हे घेण्यासाठी अत्यंत कठीण असतात, पण करण्यासाठी सोपे. तर काही निर्णय घेण्यासाठी सोपे, पण करण्यासाठी अतिशय कठीण असतात. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना भविष्यातील परिणामांचा विचार करावा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 12/07/2015 09:39 am
अपेक्षेप्रमाणे गोष्टी मिळत गेल्या तर त्याची इतकी सवय लागते की अपयश पचवणे अवघड जाते. म्हणून स्वप्न पाहा. पण यशाचीच अपेक्षा ठेवू नका. काही वेळा जिंकण्यापेक्षा हरण्यातही सुख असते.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर
काही जणांना जुन्या गोष्टी उगळण्याची सवय असते, अगदी दगड घासून घासून त्याची माती होईपर्यंत त्याचा कस काढतात तसे. पण त्यापेक्षा कितीतरी सोपे असते तो दगड उचलून बाजूला टाकणे. महत्व कशाला द्यायचे याचा निर्णय मात्र ज्याचा त्याने स्वतःच ठरवावा.
शुभ सकाळ
विक्रम वाडकर 14/07/2015 06:44 am
आपल्या दिवसाची सुरूवात चांगल्या विचारांनी व्हावी यासाठी रोज नवीन विचार घेऊन मी तुम्हाला पाठवत असतो. ज्यांना आवडतात ते आवर्जून सांगतात. काहींना आवडतात पण सांगण्यासाठी वेळ मिळत नाही. इतर काही अशीही असतील जे पाहून न पाहील्यासारखे करतात. त्या सर्वांचे मनापासून आभार.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
15/07/2015 12:34 am
प्रत्येक गोष्टीला २ बाजू असतात. एक चांगली तर दुसरी कमी चांगली. कारण वाईट गोष्टी काहीतरी चांगली जाणिव करून देण्यासाठी घडतात. आपण कोणत्या बाजुला प्राधान्य द्यायचे हे  आपण ठरवावे.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
10/08/2015 07:47 am
पक्क्या इमारती बांधण्यासाठी, पाया मजबूत बांधावा लागतो. शेवट गोड करण्यासाठी, सुरुवात देखिल तशीच असावी लागते. तसेच कोणतेही नाते भक्कम करण्याआधी पुर्ण ओळख असणे महत्वाचे असते. आणि पारदर्शी नाते तयार झाले की आयुष्य सुंदर बनते.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
12/08/2015 07:53 am
कष्ट आणि दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. कोणताही मनुष्य परिपुर्ण जन्माला येत नाही.  पण जो व्यक्ती हे सत्य मान्य करूनही आपल्या दुःखावर मात करतो, जो संकटाशी लढण्यासाठी तत्पर असतो, तो एक यशस्वी माणुस होऊ शकतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
13/08/2015 12:14 am
मित्रांची माफी मागायला आणि अनोळख्यांचे आभार मानायला कधीच उशीर करू नका. नाती बनवण्यासाठी आणि नाती टिकवण्यासाठी या दोन गोष्टी खुप महत्वाच्या असतात.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
14/08/2015 07:37 am
विषाची परीक्षादेखील लोक इतरांवर घेतात. स्वतः मात्र अमृताची अपेक्षा करतात. स्वतःबद्दल प्रेम असणे कधीच वाईट नसते, पण दुस-यांचे अनिष्ट व्हावे हा विचार चुकीचा आहे. कारण आपण जे दुस-यांचे इच्छितो ते आपल्यावर उलटते. म्हणून चांगले विचार असू द्या.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
18/04/2016 08:23 am
निसर्ग कधी वारा देतो, कधी वादळ,
कधी नदी देतो, कधी पुर,
कधी पाऊस देतो कधी जलप्रलय,
कधी गरमी देतो, कधी चटके.
जेव्हा प्रमाणात देतो ते ऊत्तम असते, आणि अती केल्यावर घातक. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. निसर्गाचा मान राखा.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
03/12/16 07:26 AM
मोकळ्या रस्त्यावर गाड्या जितक्या सुसाट धावतात, तितकाच अपघाताचा धोका जास्त असतो. म्हणुनच सोपे पर्याय दिसत असतील तर जास्त काळजी घ्यावी, अन्यथा जीवनात अपघात होऊ शकतात.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
चिमुटभर मीठामधे बेचव जेवनाला चविष्ठ करण्याची ताकद असते. त्याच मीठाचा खारटपणा कधीकधी चवदार भोजनाला खारट ही करू शकतो. माणसाचा स्वभाव देखिल असाच हवा.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
08/12/16 07:22 AM
अनुभवी लोकांच्या सानिध्यात राहून आपण नेहमी शिकत जातो. ज्यांच्या चपला झिजलेल्या असतील त्यांच्या सल्ल्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
-विक्रम वाडकर
02/02/17 07:58 AM
समोरच्या व्यक्तीनुसार आपली जीभ सांभाळणारे कधी उद्धट वाटतात तर कधी प्रेमळ. कधी शांत वाटतात तर कधी रागीट. पण सत्य हेच कि त्याचे शब्द कधी खोटे नसतात.
-विक्रम वाडकर
03/02/17 08:48 AM
तुमच्यावर असणारा लोकांचा विश्वास, हा तुमच्यातल्याच आत्मविश्वासाचे प्रतिबिंब असते. म्हणून लोकांच्या अपेक्षांचे ओझे मनावर ठेवून कधीही कोणती गोष्ट करू नये. स्वतःसाठी करावी.
-विक्रम वाडकर
04/02/17 09:29 AM
माणसे चुकीची नसतात. माणसांच्या चुका असतात. आणि चुका करणे वाईट नसते तर त्या करूनही शहाणे न होणे ही चुक आहे.
-विक्रम वाडकर
05/02/17 10:39 AM
दिसणारी वाट कुठे जाते हे जाणने सोपे असते, पण मनाची वाट कुठे पोचेल हे सांगता येत नाही. पण सोबत चांगली असेल तर मनाची वाट चांगल्याच ठिकाणी पोचवते. शुभ सकाळ
-विक्रम वाडकर
06/02/17 08:46 AM
आठवणी जपायच्या असतात त्या आपण आनंदी रहावे म्हणून, आणि आनंदी राहीलो कि चांगलेच विचार सदैव मनात येतात. शुभ सकाळ
-विक्रम वाडकर
07/02/17 07:50 AM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.