Type Here to Get Search Results !

बाल आनंद मेळावा सूत्रसंचालनासाठी--!

🎯 बाल आनंद मेळावा सूत्रसंचालनासाठी--!


बांधुनी तोरण आनंदाचेहा दिन असा साजरा व्हावाबालकांचा जीव इथे रुळावातयांना आनंद आनंद मिळावा

वैविध्य साधत खाद्य पदार्थांनी
तृप्ततेचा ढेकर इथे मिळावा
पंख लावुनी या आनंदाला
भरवू बालकांचा आनंद मेळावा
गंमत जंमत करुनी सारे
हसतील नाचतील इथे बालक
दौलत राष्ट्राची ही रक्षिण्या
होवुया आपण सुज्ञ पालक

नाचुया खेळुया बागडुया इथे
चित्रातही रंग भरुया इथे
धमाल मजा करुया इथे
नको ती भीती नको ते दडपण
फुलाप्रमाणे डोलुया,फुलुया इथे

☄☄☄☄☄☄☄☄☄☄

बाल आम्ही

गोपाळ आम्ही

आनंद लुटु

 जीवनी आम्ही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌿  शिक्षण, विज्ञान ,तंत्रज्ञान

लूटतो ज्ञान आनंदात

 अन् रंगून ही जातो आम्ही

बाल आनंद मेळाव्यात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आनंदुन गेला

आनंद सारा

बाल आनंद मेळाव्याचा

उत्साह न्यारा ....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डिंजनी चे पाहुणे

शाळेत आले ....

पाहून त्यानां  सारे

आनंदी झाले ......


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
"शाळा नसते केवळ खडू आणि फळा
    शाळा म्हणजे असते विद्यार्थ्यांचा लळा 
जिथे ह्रदये फुलतात, मने बहरतात
ती शाळा म्हणजे संस्कृतीचा मळा 
वेगवेगळ्या कलागुणांचा जमला आहे मेळा  
तो पाहण्यासाठी आपण झालो आहोत गोळा 
हा तर खरा बालआनंद मेळा ,
बालआनंद मेळा "          

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

साऱ्याचिंच आमची

गट्टी जमली

बाल आनंद मेळाव्याला

धम्माल आली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बाल आनंद मेळाव्यातचं

आमचा आनंद सारा

अभ्यासाच्या ओझ्या खाली

दडपू नका आमचा आनंद सारा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळा नसते केवळ खडू आणि फळा 
 शाळा म्हणजे असते विद्यार्थ्यांचा लळा   
जिथे ह्रदये फुलतात, मने बहरतात  
ती शाळा म्हणजे संस्कृतीचा मळा
वेगवेगळ्या कलागुणांचा जमला आहे मेळा 
तो पाहण्यासाठी आपण झालो आहोत गोळा 
हा तर खरा बालआनंद मेळा ,बालआनंद मेळा "
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad