मराठी सूत्रसंचालन चाहिये ?हमारा "सूत्रसंचालन आणि भाषण" यह
Android Application डाउनलोड
करे .[ Click Here to Download ]


Saturday, March 31, 2018

1 एप्रिल फुल चा इतिहास ?

आज सगळ्यांना फुल अर्थात मुर्ख बनवण्‍याचा दिवस. या दिवशी कोणीही कोणालाही मुर्ख बनवतो. येथे वयाची अट नसते. फक्त असते निखळ आनंद लुटण्‍याची तयारी. एप्रिल फुलवर हिंदी चित्रपटसृष्‍टीत एक मजेशीर गाणं आहे. ते असे, एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्‍सा आया, इसमें मेरा क्या कसूर, जमाने का कसूर जिसने ये दस्तूर बनाया.

☸️ एप्रिल फुल साजरा करण्‍याचा इतिहास :


 एप्रिल फुल साजरा करण्‍याबाबत काही संदर्भ सांगितले जातात ;

१ एप्रिल म्हणजे लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण ‘एप्रिल फूल’ हा दिवस १ एप्रिललाच का साजरा केला जातो? याबद्दलची माहिती तुम्हाला आहे का ?

⏹️ फ्रान्समधून एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात झाली. १५८२मध्ये प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश पॉप ग्रेगरी १३ यांनी दिले होते. १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे सुरू होते. हे मानण्यास अनेक लोकांनी नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नसल्यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली. आता हा दिवस संपूर्ण जगात एकमेकांना मुर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमधील लोक पूर्ण दिवस प्रॅंक करत असतात. हा दिवस स्कॉटलॅंडमध्ये सलग २ दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला ‘फिश डे’ असे म्हटले जाते. यादिवशी लहान मुल कागदाची मच्छी एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.

⏹️ जोसेफ बास्कीन या इतिहासाच्या प्राध्‍यापकाच्या मतानुसार कॉंस्‍टंटाइन या साम्राज्याच्या राजाच्‍या दरबारातील  काही विदूषकांनी राज्यकारभारावरून डिवचले होते. त्यामुळे राजाने त्यांना एका दिवसाकरिता  राज्यकारभार करण्‍याची संधी दिली. या विदुषकांनी मुर्खपणाचे अनेक आदेश दिले. त्यावेळी दरवर्षी यादिवशी काहीतरी विचित्रपणा करावा असे आदेश राजाने दिले होते. तेव्हापासून ही प्रथा रूढ झाली.

⏹️ काही देशांमध्‍ये मार्च हा महिना आर्थिक घडामोडींची शेवटचा महिना असल्याने अनेक कामे या महिन्यात पूर्ण केली जातात. त्यावेळी कामात गुंतलेले कर्मचारी प्रचंड थकतात.त्यांचा थकवा घालवण्‍यासाठी काहीतरी विरंगुळा करावा यासाठी ही प्रथा रूढी झाली.No comments:

Post a Comment

हमारा "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .[ Click Here to Download ]

Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information!

Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information! पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती ! पतेती, हा प...

Adbox