Type Here to Get Search Results !

14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती त्यांचा संपूर्ण इतिहास !

छत्रपति संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास 


छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!
         
        मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."

- ऍबे कँरे (१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवाशी)

लहानपण :-

        संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.                
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.


छत्रपति संभाजी,
एक ज्वलंत व्यक्तिमत्व,
शिवरायांचा छावा,
थोरले छत्रपति,
सईबाई

आणि जिजाउंच्या काळजाचा तुकडा।
येसूबाई दुर्गाबाईंच्या
कपाळी चमकणारा
महातेजस्वी भास्कर,
ज्याला आपल्या ओंजळित घेताना मृत्यु
सुद्धा हळहळला असेल,
प्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले
असतील,
आपल्या देहदानाने
महाराष्ट्राला जीवदान
देणारा आणि
मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर
राज्य करणारा राजा.....

कोणाला प्रश्न पडला त्या इंग्रज लोकांना आम्हाला नाही    प्रश्न पडला .....

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी एक वकील आला होता त्याचे नाव होते हेन्री ओक्सिटन....अणि या हेन्री ओक्सिटन ने एकडायरी लिहली त्यात तो लिहतो की....मी रायगडा वर आलो मी शिवाजी महाराजांच्या राज्यभिशेकाचा सोहळा बघितला अणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवाजी राज्यांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राज्यांशी त्यावेळी माझ्या लक्षात आलेकी....हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो .... उत्तरेतल्या लोकांशी हिंदी मधे बोलतो.... आम्हा इंग्रजांशी इंग्रजी मधे बोलतो......पोर्तुगिजंशी पोर्तुगीज मधे बोलतो ....अरे या शिवाजी राजांनी आपल्या मुलाला भाष्या शिकवाल्यात तरी कीती ????कोणाला प्रश्न पडला त्या इंग्रज लोकांना आम्हाला नाही    प्रश्न पडला त्यानी लिहून ठेवल तेव्हा आम्हाला समजल.....संभाजी राज्यांच १४ भाष्यांवर प्रभुत्व होत..

--हेन्री ओक्सिटन

   छत्रपती :-

        १६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

दगाफटका :-

          १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

अंगावर शहारा येतो..केवढी कठीण साधना..औरंग्याचा पोलादी पिंजरा तोडुन महाराज राजगडावर
परतले तेंव्हा नऊ वर्षाच्या कोवळ्या शंभुराजांना त्यांनी उत्तरेतच ठेवले..आणि शत्रुला हुल देण्यासाठी
अफवा उठवली शंभुराजे गेले..एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजगडावर त्या लेकराचे दिवस सुधा घातले..
काय झालं असेल एका पित्याच्या काळजाचं जेंव्हा जिवंत असलेल्या आपल्या गोजीरवाण्या बाळाच्या
 पिंडाला कावळा शिवताना महाराज बघत असतील..जणु महाराजांना आधीच कळले होते..
या माझ्या रुद्रप्रतापी शंभुराजाच्या नशीबात त्याच्या बलीदानानंतर हे कुठलेच विधी नाहीत..
ही राज्यसाधना..हा त्याग..हा महायोग..काय लिहावे पुढे.?

कासब्या मधील याच ठिकाणी ''छत्रपती संभाजी महाराज''
यांना पकडण्यात आले होते-(कसबा, संगमेश्वर. जिल्हा-रत्नागिरी)

नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी.....राजे मुजरा, मुजरा त्या झुजाँर
पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....तुमच ्या जखमातुन
वाहनारया रक्ताला, रागंड्या तुमच्या सहनशक्तीला..... ..पुन्यवान
समजतो तुम्हाला जखडलेला साखळदड

ं स्वताहला....... तुम्ही शुरवीर, तुम्हीच रनवीर,
तुम्हीच नरवीर,तुम्हीच धर्मवीर.....तुम ्ही होता धर्यवीर, तुम्हीच खरे क्रान्तीवीर,
तुम्हीच या भुमिचा स्वराज्यवीर.... ...अजिक्यं झुजीं दिल्या, गनीमाचीँ वाट लावीली,
फितुराचीँ मान छाटली.......... .कित्येकाची पाठ पाहीली, कित्येकाना आस्माने दाविली,
माय बहिनीचीँ आब्रु राखली........कि तीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला,घाबरुन
तुम्हा आसमतं फाटला.......... .हवेगत चालवीली तलवारीची पाती,
कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती..........ज ्याने
जन्माला घातले त्या श्री छत्रपतीचें काय कौतुक, ईथेच होतोनतमस्तक
मी अपसुक.......... मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, दूरदर्शी, अविस्मरणीय
पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!जय जिजाऊ-जय शिवराय-जय
शंभूराजे!

संभाजीराजांची खरी ओळख
हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे

महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते.

औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे

संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.

संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती

संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.
संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !

संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याही शक्‍तीला नाही. आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला, याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी वर्तमानकाळही त्याला अपवाद नाही. शंभूराजांचे वेळीसुद्धा हेच झाले. येसुबाईचे थोरले बंधू म्हणजे शंंभूराजांचे मेव्हणे गणोेजी शिर्के हिंदवी स्वाराज्याशी बेईमान-फितूर झाले. संभाजीराजे कवी कलशाचे कलाने वागतात म्हणून कलशावर पन्हाळा भागात त्यावर हल्ला चढवला, ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळली, तेव्हा ते लगेच शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून येत असल्याचे कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वीच संभाजीराजांनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबल्लाळ चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली व त्याचा जबरदस्त पराभव केला. तिकडे झुल्पीकार खान रायगडावर चालून येत असल्याची खबर राजांना मिळाल्याने शंभूराजे सातारा-वाई-महाड मार्गे रायगडावर परतणार होते; पण मुकर्रबखान कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर मार्गाने चिपळूण-खेड मार्गे रायगडावर जाण्याचा बेत केला. शंभूराजे स्वत: संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात वार्‍यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वरला ४-५ दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूरवरून मुकर्रबखान निघून चालू येत असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर ९० मैलांचे आणि तेसुद्धा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेले अवघड वाटेचे ! त्यामुळे किमान ८-१० दिवसांच्या अंतराचे; परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानाला जवळच्या आड वाटेने केवळ ४-५ दिवसांतच संगमेश्वरला आणले. संभाजीचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांनी फितुरी केली होती व आपली जहागीरी प्राप्‍त करण्यासाठी त्याने हा उद्योग केला. त्यामुळे १ फेब्रुवारी १६८९ रोजी मुकर्रबखानने त्याच्या ३ हजार सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले.

संभाजीराजांचा वेढा तोडण्याचा  प्रयत्‍न-

संगमेश्वरला ज्या सरदेसाई यांच्या वाड्यात शंभूराजे मुक्कामाला होते, त्यावाड्याला खानाचा वेढा पडला, हे जेव्हा राज्यांच्या लक्षात आले, तेव्हात्यांना आश्चर्यच वाटले; कारण इतक्या कमी दिवसांत खान येणे शक्यच नाही, हेत्यांना माहीत होते; पण ही किमया केवळ फितुरीची होती, हेसुद्धा त्यांच्यालक्षात आले. शंभूराजांनी अगोदरच आपली फौज रायगडकडे रवाना केली होती व केवळ४००-५०० सैन्यच हाताशी ठेवले होते. याच वेळी शंभूराजांकडे कृष्णाजी चिमूलव अर्जोजी यादव हे आपल्या तक्रारी घेऊन आले होते. आता खानाचा वेढा मोडूनरायगडकडे प्रयाण करणे हा एकमेव पर्याय राजांपुढे शिल्लक होता; म्हणूनराजांनी शत्रूवर तुटून पडा, असा आदेश आपल्या सैनिकांना दिला. यापरिस्थितीतही न डगमगता शत्रूचा वेढा तोडून संभाजीराजे, संताजी घोरपडे वखंडोबल्लाळ रायगडच्या दिशेने वेगात निघाले. दुर्दैवाने मालोजी घोरपडे याधुमश्चक्रीत ठार झाले; पण संभाजीराजे व कवी कलश हे मात्र वेढ्यात अडकले.संभाजीराजांनी याही स्थितीत आपला घोडा वेढ्याच्या बाहेर काढला होता; पणमागे असणार्‍या कवी कलशाच्या उजव्या हाताला मुकर्रबखानाचा बाण लागून तेखाली पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी राजे पुन्हा मागे वळले आणि वेढ्यातसापडले.

स्वकियांच्या बेईमानीमुळे राजांचा घात !

यावेळी अनेक सैनिक ठार झाल्यामुळे त्यांचे घोडे इतस्तत: उधळत होते सर्वत्रधुरळा उडाला होता. कोणालाच स्पष्ट दिसत नव्हते. त्याचा फायदा घेऊनशंभूराजे पुन्हा सरदेसाइंर्च्या वाड्यात शिरले. त्यांचा घोडा मात्र तिथेचहोता. धुरळा खाली बसल्यावर गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांचा घोडा ओळखला; कारण राजांच्या घोड्याच्या पायात सोन्याचा तोडा असायचा व हे शिर्क्यांनामाहीत होते; म्हणून त्यांनी खानाच्या सेनेला संभाजींचा शोध जवळपासचघ्यावा, अशी सूचना केली. अखेर मुकर्रबखानच्या मुलाने म्हणजे इरवलासखानानेशंभूराजांना पकडले. फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला.जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धास्वकियांच्या बेईमानीमुळे मोगलांच्या जाळयात अडकला.

औरंगजेबाचे (मोगलशाहीचे) महाराष्ट्रावरील आक्रमण

शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता.१६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला.त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य संखेच्या दहा पट होता.५ लाखांचे सैन्य, १४ कोटी खजिना, ४० हजार हत्ती, ७० हजार घोडे, ३५ हजार उंट. इतका अफाट सैन्यासागर होता कि औरंगजेबाची छावणी ३ मैलांपर्यंत पसरायची.काही दिवसातच महाराष्ट्र आणि दख्खन जिंकून घेणार अशी अशा बाळगून आलेल्या या दिल्लीकराला संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ७ वर्ष जुंझत ठेवला.
जोपर्यंत संभाजी महाराजांना कैद करणार नाही तोपर्यंत डोक्यावर मुकुट (शाही पगडी) घालणार नाही असा प्रणच त्याने केला होता.नाशिक जवळचा रामशेज हा किल्ला तर फक्त ६०० मावळ्यांनी जवळपास ६ वर्ष अजिंक्य ठेवला होता.

सांभार :आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

* १४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.
आणि
* वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा****छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !*

कसे सांगू या शंभूराजेची मृत्यूची झुंज …

४० दिवस हाल हाल करूनमारले औरंगजेबाने,
अंगावर शहारे येतात, रक्त खवळते…

शंभू राजेना एक एक दिवस १०० वर्षाचा वाटत असेल,

कोणी डोळे तर कोणी हाताचे मास, पायाचे मास,......
हातांच्या बोटांची नखे तर कोणी छातीच्या मासाचा तुकडा काढून
न्यायचे, किती वेदना, किती त्रास झाला असेल शंभू राजेना…

पण

जेव्हा जिजाऊची, शिवरायांची,
सईबाईंची आणि स्वराज्याची आठवण येत असेल तेव्हा किती पण
त्रास होउदे पण स्वराज्य ह्या औरंगजेबाच्या पायावर ठेवणार
नाही ….

असेच शंभूराजे म्हणाले असतील....

माझा जीव ओवाळून टाकावा असा ह्या राज्याला नतमस्तक
होऊन मानाचा मुजरा….

जय शंभूराजे……….!
जय महाराणी येसुबाई……….!


शारीरिक छळ व मृत्यू :-

         त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते.
        पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.  कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.         दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!      
         मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली

संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.

२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.

" श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे.

अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते......


त्या दिवशी असाच बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि कुणीतरी म्हणाले कि , ' शिवाजीने जितके केले , ते सगळे संभाजीने फुकट घालवले. ' आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.

पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?

काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई , सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही. शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो.

शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल ? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.

मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज (वय वर्ष ३२) , विश्वासराव पेशवा (वय वर्ष १६) माधवराव पेशवा (वय वर्ष २७) हे मराठ्यांचे पराक्रमी राजकुमार फारच अल्पायुषी होते. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्याि राजा बद्दल जेव्हा सकाळच्या ८:२०ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी , '' शिवाजीने जितके केले , ते सगळे...... '' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते.

इतिहासाचे अभ्यासक मिलिंद कारेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहलेला हा लेख.

खरा संभाजी महाराज ...
.

१.जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा
२.जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा
३.आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला
४.दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजनकरणारा
५.उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
६.इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा
७.धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा
८.बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा
९.शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा
१०.स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
११.देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
१२.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा
१३.सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
१४.आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
१५.स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा खरा संभाजी....
पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.छ “ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली.जहाज बांधणीचे काम सुरु केले.पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.

छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी राजांना म्हणतात .........

“त्या रुद्र-शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळानिळा पडला. पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळमाणसांच्यासाठी तुम्हा-आम्हासहीअसे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केल. तुम्हां-आम्हालाते प्रसंग पडला तर कैकवेळा करावे लागेल.

पंडित शिकवण देतात, ‘राजा हा विष्णूचा अंश आहे’. पण त्यांना ठाव नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच ‘शिवलिंग’ पुजतो.

शंभुराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे .....

रुद्रासारखेच वर्तावे .....”

संदर्भ - छावा (शिवाजी सावंत


जणु महाराजांना आधीच कळले होते..................

अंगावर शहारा येतो..केवढी कठीण साधना..औरंग्याचा पोलादी पिंजरा तोडुन महाराज राजगडावर परतले तेंव्हा नऊ वर्षाच्या कोवळ्या शंभुराजांना त्यांनी उत्तरेतच ठेवले..आणि शत्रुला हुल देण्यासाठी अफवा उठवली शंभुराजे गेले..एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजगडावर त्या लेकराचे दिवस सुधा घातले..काय झालं असेल एका पित्याच्या काळजाचं जेंव्हा जिवंत असलेल्या आपल्या गोजीरवाण्या बाळाच्या पिंडाला कावळा शिवताना महाराज बघत असतील..जणु महाराजांना आधीच कळले होते..या माझ्या रुद्रप्रतापी शंभुराजाच्या नशीबात त्याच्या बलीदानानंतर हे कुठलेच विधी नाहीत..ही राज्यसाधना..हा त्याग..हा महायोग..काय लिहावे पुढे.?


छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।


छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे.तिचे अंकसेवन करणार्यां चा(आधार घेण्यारांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.
Picture
अखेरं! तो औरंग्या म्हणत राहिला........
"सचमुच छावा हैं छावा शेरं का... हमनें
आँखें निकल दीं उसकी, लेकिन
उसकी आँखें
झुकी नहीं हमारें सामने" "हमनें जबान
काँट दी उसकी, लेकिन उस जबान से
उसने मांगे नहीं रेहेम के दो लब्जं" "हमनें
हात तोड़ दिए उसके, लेकिन
नहीं फैलाएं उसने
अपने हात हमारें सामने" "हमनें पांव
काँट दिए उसके, लेकिन नहीं टेंकें उसने
अपने घुटनें हमारें सामने" "हमनें गर्दन
काँट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन
नहीं झुकी हमारें सामने" ""सचमुच
छावा हैं छावा शेरं
का" ......या अल्लाह!!! होंगे कामयाब
कभीं या ऐसेही लौटना पड़ेगा ख़ाली हाथ
देहेल्ली......
पण! दिल्लीला परत जाण्याचं भाग्यं
औरंग्याची वाट्याला आलंच
नाही.
संभाजींच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून
इथं
पुन्हा जन्माला आला..."हजारों,
लाखों"..."संभाजी"
अरे!!! संताजी,,,धनाजीसारखा एक-
एक झुंजत राहिला,
लढत राहिला...राजाशिवाय
चौदा वर्ष महाराष्ट्र
औरंग्याशी टक्करं घेत
राहिला आणि अखेरं इथंच
औरंग्या कबरं बांधून मग शांत
झाला.
हि प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची,
हि प्रेरणा होती संभाजी राजांच्या राष्ट्रप्रेमाची ,
राष्ट्रभक्तीची,
धर्मनिष्ठेची...
मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही...
धर्मवीर संभाजी महाराज की जय
!! हिंदू धर्म की जय !!


छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील महत्वाच्या तारखा
शंभू राजांचा जन्म १४ मे १६५७
सईबाईंचा मृत्यू ५ सप्टेंबर १६५९
अफजलखानाचा वध ११ नोव्हेंबर १६५९
पुरंदरचा तह १३ जून १६६५
शंभू राजे जयसिंगच्या छावणीत १८ जून १६६५
शंभू राजांना मनसबदारी फर्मान २२ सप्टेंबर १६६५
आग्र्या कडे प्रस्थान ५ मार्च १६६६
आग्र्याच्या सीमेवर ११ मे १६६६
आग्र्याचा दरबार १२ मे १६६६
महाराज नजरकैदेत २५ मे १६६६
सुटका १७ ऑगस्ट १६६६
शंभू राजे राजगडावर २० नोव्हेंबर १६६६
शंभूराजे औरंगाबादेस मौअज्जम कडे निघाले ९ ऑक्टोबर १६६७
राजारामाचा जन्म २४ फेब्रुवारी १६७०
शंभू राजांना कारभार सोपवला २६ जानेवारी१६७१
रामनगर जव्हार मोहिमेत १६७२
महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४
जिजाबाईंचे निधन १७ जून १६७४
शंभूराजांचे उपनयन ४ फेब्रुवारी १६७५
महाराजांच्या मृत्यूची अफवा डिसेंबर १६७५
गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर मोहिमा १६७५-१६७६
महाराजांचे दक्षिणेकडे प्रयाण ऑक्टोबर १६७६
शंभूराजांचा कलशाभिषेक २३ मार्च १६७८
रायगडास महाराजांचे पुनरागमन ११ मे १६७८
महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यास १० सप्टेंबर १६७८
शंभूराजे सज्जनगडी २०ऑक्टोबर१६७८
दिलेरखानाकडे प्रयाण १३ डिसेंबर १६७८
भूपाळगडाची लढाई २ एप्रिल १६७९
दिलेरखानाकडून सुटका २२ नोव्हेंबर १६७९
विजापुराहून पन्हाळ्याकडे १ डिसेंबर १६७९
पितापुत्रांची भेट १३ जानेवारी १६८०
राजारामाचा विवाह १५ मार्च १६८०
शिवरायांचे निधन ३ एप्रिल १६८०
राजारामाचे मंचकरोहण २१ एप्रिल १६८०
शंभूराजे रायगडावर १८ जून १६८०
पुतळाबाई सती गेल्या २७ जून १६८०
शंभूराजांचे मंचकरोहण २० जुलै १६८०
मोरोपंतांचा मृत्यू ऑक्टोबर १६८०
शंभूराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१
औरंगाबाद, जालना, मेहेकरवरील हल्ले मे १६८१
अकबराचे आगमन १ जून १६८१
रायगडावरील कठोर शासन ऑगस्ट १६८१
सोयराबाईचे निधन २७ ऑक्टोबर१६८१
अकबराची भेट १३ नोव्हेंबर १६८१
मराठ्यांची फौज अहमदनगरावर नोव्हेंबर १६८१
दंडाराजपुरीस वेढा एप्रिल १६८२
रामसेजचा वेढा एप्रिल १६८२
कल्याण – भिवंडीची लढाई मे १६८२
येसूबाईना पुत्र झाला १८ मे १६८२
म्हैसूरकरांशी युद्ध जून १६८२
बादशहाची प्रतिज्ञा ३० जुलै १६८२
रामसिंगला संस्कृत पत्र १६८३
टीटवाळ्याची लढाई मार्च १६८३
तारापूरावर हल्ला १५ एप्रिल १६८३
चौलला वेढा ऑगस्ट १६८३
रुहुल्लाखान परतला एप्रिल १६८३
मोअज्जमची दक्षिणकोकणात रवानगी १३ सप्टेंबर १६८३
दिलेरखानाची आत्महत्या २० सप्टेंबर १६८३
पोर्तुगीजांचा कोकणातील प्रभाव ऑक्ट-नोव्हें १६८३
फोंड्याची लढाई सुरु १ नोव्हेंबर १६८३
शंभूराजे फोंड्यात घुसले १० नोव्हेंबर १६८३
विजरेई आल्व्हारो पळाला ११ नोव्हेंबर १६८३
जुवे बेत जिंकले २४ नोव्हेंबर १६८३
साष्टबारदेशावर चढाई ११ डिसेंबर १६८३
मोअज्जमची फटफजिती फेब्रुवारी १६८४
रायगडावरील फितुरांना अटक ३० ऑक्टोंबर१६८४
शहाबुद्दीनचा पराभव १४ जानेवारी १६८५
धरणगाव लुटले फेब्रुवारी १६८५
विजापूर मदतीसाठी मराठी फौजा रवाना मार्च १६८५
मोगलांचा विजापूरला वेढा एप्रिल १६८५
मराठ्यांची भडोचकडे मोहीम डिसेंबर १६८५
शहाजाद्याकडून माद्दंना आकान्नाचा खून १६ मार्च १६८६
मोअज्जमला बादशहाने कैद केले २१ फेब्रुवारी १६८७
अकबर इराणकडे गेला फेब्रुवारी १६८७
कुतुबाशाहीचा पाडाव २२ सप्टेंबर १६८७
वाईच्या लढाईत हंबीरराव ठार ऑक्टोंबर १६८७
कवी कलशवर गणोजीचा हल्ला ऑक्टोंबर १६८८
शंभूराजांना संगमेश्वरी अटक ३ फेब्रुवारी १६७९
कैद शंभूराजे बहादुरगडाजवळ १५ फेब्रुवारी १६७९
शंभूराजांची धिंड १५ फेब्रुवारी १६७९
बादशहापुढे हजर १५ फेब्रुवारी १६७९
कवी कलश व शंभूराजे यांच्या जीभ व डोळे काढले १७ फेब्रुवारी १६७९
मोघली छावणी भीमातीरी आली ३ मार्च १६८९
कवी कलश व शंभूराजे यांचा अत्यंत निर्दयी वध ११ मार्च १६८९
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची
Picture
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची :
१. छावा - शिवाजी सावंत - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
२. संभाजी - विश्र्वास पाटील - मेहता पब्लिशिंग हाउस
३. शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
४. छत्रपती संभाजी - वा. सी. बेंद्रे
५. मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले - नरसिंह पब्लिकेशन्स
६. शंभूराजे - प्रा. सु. ग. शेवडे - धर्मसेवा प्रकाशन
७. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे - पद्मगंधा प्रकाशन
८. रौद्र- नितिन बानगुडे पाटील
९. खरा संभाजी :- लेखक प्रा.नामदेवराव जाधव.
१०.आदिव्तीय छत्रपती श्री संभाजी महाराज ...लेखक अनंत दारवटकर. खंड १-५
११. बुधभूषण राजनीती ---लेखक रामकृष्ण कदम
१२. " बुधभूषण" लेखक स्वतः संभाजी महाराज


शेर शिवा का छावा था :-

देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।।
तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।
दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही ।
हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।।
जिव्हा काटी खून बहाया, धरम का सौदा किया नही ।
शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नही ।।
रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।।
गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से डरा नही ।।
वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को ।
कौन जिता कौन हारा, पूछ लो संसार को ।।
मातृभूमी के चरण कमल पर, जीवन पुष्प चढाया था ।
है दूजा दुनिया में कोई, जैसा शंभूराजा राजा था ।।

पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,
कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.
   छत्रपती संभाजीराजे भोसले सामाधी वढू - तुळापुर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.