Type Here to Get Search Results !

वटपौर्णिमा कविता, व्हाट्सअप्प मॅसेज

विचार आधुनिक जरी ,
श्रध्दा देवावर माझी
होईन सौ जेव्हा मी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..
असेल ऑफिस जरी,
वडपूजा जमणार नाही
डगाळ आणून घरी,
करेल वटपौर्णिमा साजरी..
एवढा आटापिटा ,
फक्त तुझ्या साथीसाठी
होऊन थोडी स्वार्थी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..
विज्ञान म्हणते,
राखेत संपेल सर्वकाही
भोळे मन म्हणते,
तरीही...
एकच ' हा ' जन्म जरी ,
सावित्रीची लेक मी
अनंताच्या वाटेवरही
करेल तुला साथ मी....

कवियेत्री - स्वप्ना

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आली वट वट पौर्णिमा
की लागते मला धडकी भरायला..

अरे यार , सौ माझी भलतीच भारी
माझे ‘ आरक्षण ‘ करते जन्मोजन्मीसाठी..

कॉलेज मधली परी , ऑफिसातली फटाकडी
सिनेमातली नटी , झुरतो सा-यांसाठी..

पण देवा , असा कसा रे तुझा न्याय
दर जन्मी मला ‘ वेगळा ‘ पर्यायच नाय ?

एखाद जन्मी मिळाली असती ‘ विश्वसुंदरी ‘
तर माझीही वट वाढली असती..

पण, ती सुंदरी मनाने सुंदर असेल ?
‘ प्रसंगी ‘ माझी सावित्री ती बनेल ?

दूसरीकडे माझी सौ..

तसं बावळंच आहे हिचं ध्यान
पण कर्तव्यांचे हिला सदा भान..

माझ्या गबाळ अवतारातही मला हिरो म्हणते
माझ्या सुमार कवितांना हमखास दाद देते..

ऑफिस, घर ,पाहुणे तारेवरची कसरत करते
फाटक्या संसाराला माझ्या तीच ठिगळ लावते..

तिच्या सच्च्या प्रेमापुढे मी हरतो
तिची वटपौर्णिमा फळावी हेच मागतो..

कवियेत्री – स्वप्ना

Modern स्त्रीची वटपौर्णिमा

वडाला फेरे मी मारते
round by round
पुढच्या जन्मी हाच पती
should not be found.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.