Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन निबंध, भाषण सूत्रसंचालन (Essay, Speech on Teachers Day in Marathi)

शिक्षक दिन निबंध, भाषण (Essay, Speech on Teachers Day in Marathi) 


आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. यादिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या पाया पडतात. आदरपूर्वक नमस्कार करतात. काही विद्यार्थी गुलाबाचे फुल देऊन तर काही विद्यार्थी एखादी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे. शिक्षक हे आपले सर्वात मोठे आणि महत्वाचे गुरु आहेत. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. सर्वच शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्वाचे कार्य करतात. सर्वच शिष्यांनी आपल्या गुरूंविषयी आदरपूर्वक सन्मान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांमुळे आपण जीवनामध्ये बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकतो. भविष्यातले शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, लेखक आणि काही विचारवंत तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. आणि या सर्व शिक्षकांमुळेच मुले विचार करतात, चांगले शिक्षण घेतात आणि मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतात. आपण जेव्हा पहिल्यांदा बालवाडीमध्ये शाळेत जातो तेव्हा आपल्याला या जगाची काहीच माहिती नसते त्यावेळी हे शिक्षक आपल्याला बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकवतात सर्व वस्तूंची माहिती देतात. तसेच आपण आपल्या आई वडिलांपासून पहिल्यांदा दूर राहतो तेव्हा आपली संपूर्ण जबाबदारी शिक्षक घेतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मते घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. आपल्याला चित्रांवरून वेगवेगळ्या वस्तूंची माहिती करून देतात, जगभराच्या ज्ञान देतात. प्रार्थना म्हणायला शिकवतात आपल्यावर चांगले संस्कार करतात. अशाप्रकारे आपले हे शिक्षक आपल्याला घडवत असतात. या शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, गुरु शिष्यांमधील हे नाते कायम ठेवण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो. यादिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे आपले प्रेम, मनोगत व्यक्त करतात. शाळेकडून सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. तसेच शेवटी शिक्षक सुद्धा आभारप्रदर्शन करतात. काही शाळांमध्ये मुले एक दिवसासाठी शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. डॉ. सर्वपल्ली यांच्याप्रमाणेच महात्मा फुले यांनाही शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले. महात्मा फुले नऊ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. महात्मा फुले यांची बुद्धी अतिशय तल्लख असल्यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आपल्या देशातील अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई यांच्यावर सोपविली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. हे सर्व करत असताना महात्मा फुले यांना अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असे पण सर्व सहन करूनही ते आपल्या मतावर ठाम होते. शाळेच्या मुख्याध्यापकपदी असलेल्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई आणि त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. असे हे थोर समाजसुधारक आपल्या सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे आपले खरंच गुरूच आहेत. शिक्षणाचे महत्व समजून सांगणारे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व समाजसुधारकांना, शिक्षक, शिक्षिकांना आपण या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण मानाचा मुजरा करूयात.

Read more at: https://teenatheart.com


मराठी भाषण -1

सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते[ संदर्भ हवा ]. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.[२].

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते

. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.[३]
१९५४ :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

animated-new-image-0002शिक्षक दिन नमुना सूत्रसंचालन आणि भाषण.pdf

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी भाषण -2


गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

आज ५ सप्टेंबर... शिक्षक दिन... शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते... त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती.... शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...

जगभरातील शिक्षक दिन...
चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरूवात करण्यात आली. चीनी सरकारकडून मात्र १९३२ मध्ये या दिवसाला स्वीकृती मिळाली.

त्यानंतर १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस, २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला... पण त्यानंतर पुन्हा १९५१मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.

©®©®©®©©©®©®भरत वटाणे©®©©©©©®©©★©©®©©©®©©®©/

Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. A professional essay writing services can alleviate your stress in writing a successful paper and take the pressure off you to hand it in on time. Check out, please DigitalEssay.net

    ReplyDelete
  2. I have always found it hard to meet the requirements of being a student. Ever since my years of high school, I really have no idea what professors are looking for to give good grades. After some google searching, I found this service WritePaper.Info who helped me write my research paper. The final result was amazing, and I highly recommend WritePaper.Info to anyone in the same mindset as me.

    ReplyDelete