Type Here to Get Search Results !

14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन ,मराठी माहिती बाल दिवस मराठी माहिती!

14 नोव्हेंबर - पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन ,मराठी माहिती बाल दिवस मराठी माहिती!


भाषण क्र . 1


   आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद , व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिनींनो . आज आपण सर्वजण "बालदिन" साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. या प्रसंगी मी माझे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही विनंती!
      आज  14 नोव्हेंबर ,आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे, त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते, मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते म्हणायचे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे निर्माता म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा वाढदिवस "बालदिन" म्हणून साजरा केला जातो .


       महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला.       स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुले ते १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. १७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.
देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ” पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखलळा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भाषण क्र .2 
    जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान  व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.

30 वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय राजकारणात असणारे. भारताचे सलग 3 वेळेसचे पंतप्रधान. 17 वर्ष भारताचे पंतप्रधान असलेले एकमेव नेते म्हणजे जवाहरलाल नेहरू पण ह्याच नेहरूंबद्दल काश्मीरचा मुद्दा आणि चीन सोबत झालेला पराभव यामुळे भारतीय समाजात रोष आहे. त्यामुळे समाजातील काही लोक नेहरूंवर खूप टीका पण करतात.

जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तरप्रदेश मध्ये झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू काँग्रेसचे त्या काळातील मवाळ गटातील नेते होते आणि त्याच बरोबर वकील ही होते. आशा प्रकारे एक सधन कुटुंबातील जवाहरलाल नेहरू एकुलते एक मुलगा होते आणि त्यांना ऐकून 3 बहिणी होत्या.

मूळचे काश्मिरी पंडित असणारे नेहरू कुटुंबीय उत्तरप्रदेशातील अलाहाबाद मध्ये स्थायिक झाले होते.

एक सधन कुटुंबातील असल्यामुळे जवाहरलाल यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या घरीच झाले. त्यांचे शिक्षक त्यांना घरीच येऊन शिकवत असत. त्यांनतर जवाहरलाल इंग्लंडला शिक्षणासाठी गेले तिथं त्यांचे शिक्षण “HARROW” या शाळेमध्ये झाले. त्यांनतर त्यांनी “Trinity college, Cambridge ” मधून   Natural Science ही पदवी घेतली 1910 साली.

पुढे त्यांनी “INNER TEMPLE” LONDON मध्ये आपले वकिलिचे शिक्षण चालू केले. 1912 मध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून Practice सुरू केली. अलाहाबाद मध्ये येऊन त्यांनी वकिलीची 2 practice सुरू केली पण आपल्या वडिलांप्रमाणे ते यशस्वी नाही झाले. त्यांचे मन वकिलीत रमत नव्हते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायची त्यांना आवड होती त्यांचे सगळे लक्ष तिकडेच असायचे.

इंग्लंड मध्ये शिकत असताना ते आपल्या वडिलांना पत्र लिहीत तेव्हा सांगत असत की तुम्ही मवाळ गट सोडून जहाल गटात सामील व्हा ” लाल, बाल, पाल” यामध्ये सामील व्हा असे ते त्यांच्या वडिलांना सांगत असत.


1912 मध्ये त्यांनी प्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला. 1916 मध्ये त्यांचा विवाह कमला देवी यांच्या सोबत झाला. 1917 मध्ये कमला देवी यांनी एका मुलीला जन्म दिला जिचे नाव ठेवले “इंदिरा प्रियदर्शनी” त्यांनाच पुढे संपूर्ण जग “इंदिरा गांधी” म्हणून ओळखू लागले.


जेव्हा नेहरू भारतीय राजकारणात आले तेव्हा त्यांना जहाल नेते म्हणून ते सगळीकडे प्रचलित झाले त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मवाळ राजनीतीचा विरोध केला.


नेहरूंनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात “Home Rule League ”  ने केली. जिची स्थापना टिळकांनी केली होती.


“Annie Bescent” यांचा नेहरुंवर खूप प्रभाव पडला. ते “Home Rule League” चे सचिवही झाले.


1916 मध्ये त्यांची भेट गांधींसोबत झाली. गांधीजींनी 1920 मध्ये असहकार आंदोलनाची सुरुवात केली उत्तरप्रदेशातील या आंदोलनाचे नेतृत्व नेहरूंनी केले. चौरी चौरा मध्ये झालेल्या हिंसे नंतर गांधीजींनी आंदोलन स्थगित केले. त्यांनतर काँग्रेस दोन गटात विभागली गेली.


सी.आर.दास आणि मोतीलाल नेहरू यांनी मिळून स्वराज पार्टी तयार केली पण जवाहरलाल हे गांधीजींसोबतच राहिले स्वतःच्या वडिलांना विरोध करून. 1923 मध्ये ते काँग्रेस चे सामान्य सचिव बनले. 1928 साली मोतीलाल नेहरूंनी बनवलेल्या नेहरू अहवालाला जवाहरलाल यांनी विरोध केला त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. नेहरू गांधीजींना गुरु मानत होते. 1927 मध्ये नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली पण काँग्रेसने त्यांना पाठिंबा नाही दिला.


गांधीजी स्वतः 1929 पर्यंत पूर्ण स्वराज्याच्या विरोधात होते. स्वातंत्र्यांनातर नेहरूंनीच गांधींजींच्या स्वप्नातील भारत बनवायचं ठरवलं. 1929 नंतर खऱ्या अर्थाने जवाहरलाल राष्ट्रीय नेत्याच्या रूपाने देशासमोर आले. 1929 च्या लाहोर अधिवेशन जवाहरलाल नेहरूंमुळेच पूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात संमत करण्यात आला.


26 जानेवारी 1930 ला सभेत बोलताना नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तो दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचा ठरवलं.


पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्याच दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.


नेहरू 1929, 1936, 1937, 1951, 1954 या काँग्रेस च्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. नेहरू स्वातंत्र्य संग्रामात 9 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिले. जवाहरलाल नेहरींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. जवाहरलाल नेहरू मानवतावादी नेते होते. 1946 साली स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले.


भारत स्वतंत्र झाला पण गांधीजी आणि नेहरू फाळणी नाही रोखू शकले. काही लोक यासाठी नेहरूंना दोष देतात तर काही लोक नेहरूंचे समर्थन करतात. भारत स्वतंत्र झाला त्या रात्री 12 वाजता नेहरूंनी भाषण दिले.


बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामा प्रसाद मुखर्जी हे नेहरूंचे विरोधक होते त्यांना नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आणि देशाच्या भविष्यासाठी त्यांचे योगदान महत्वपुर्ण ठरले. नेहरुंवर टीका होणाऱ्या 2 घटना म्हणजे काश्मीर आणि चीन मुद्दा.


1952 मध्ये नेहरूंनी शेख अब्दुल्लाला अटक केली त्यांनतर काश्मीरचा प्रश्न अजूनच चिघळला


शेख अब्दुल्ला हा काश्मीरच्या राजा हरी सिंघ याच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढत होता स्वातंत्र्यांनातर अब्दुल्लाला काश्मीरचा पंतप्रधान देखील केलं होतं आणि अजून 1 म्हणजे नेहरूंनी काश्मीरचा मुद्दा UN मध्ये नेला. खर तर काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांमधील वाद होता त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायची गरज नवती पण नेहरूंना रशिया आणि अमेरिका यांच्यातील cold war चा फटका बसला.  कारण त्या दोन राष्ट्रांना वाटतच न्हवते की हा मुद्दा सोडवावा म्हणून आणि तो मुद्दा तसाच अजून पण लटकूनच आहे.


चीनच्या बाबतीत नेहरू सावध नाही राहिले अजिबात जेव्हा 1954 मध्ये जेव्हा “पंचशील” करार झाला तेव्हा नेहरूंना वाटले की चीन आपल्याला काहीच त्रास देणार नाही त्यांनी डोळे झाकून चीन वर विश्वास ठेवला आणि त्याचाच फटका भारताला बसला यात नेहरूंचे मुत्सद्दी राजकारण कमी पडले. चीनला तिबेटवर कब्जा करायचा होता त्याने तो केला आणि आपल्या देशातून रस्ते बनवायला सुरुवात केली त्याकडे नेहरूंनी गंभीरतेने घेतलं नाही आणि 1962 मध्ये चीन ने अचानक भारतावर आक्रमण केले. 1962 साली भारताचा झालेला पराभव हा नेहरूंच्याकडे असणाऱ्या राजकीय दूरदृष्टीचा अभाव असल्याने झाला अशी नेहरूंनवर कायम टीका होते.


नेहरूंनी भारतासाठी समाजवादी आर्थिक धोरण स्वीकारले. ह्या धोरणावर पण खूप टीका करतात की ह्या धोरणामुळे भारताचा आर्थिक विकास सुरुवातीच्या 40 वर्षात कमी झाला म्हणून पण नेहरूंनी जेव्हा हे धोरण स्वीकारले तेव्हा जगात ह्या धोरणाला मान्यता होती.


नेहेरूनच्या काळात बहुउद्देशीय प्रकल्पांवर जास्त भर देण्यात आला होता जसे की धरण त्यामधून वीजनिर्मिती पण होऊ शकते असे प्रकल्प राबवले गेले. “भाक्रा-नांगल” प्रकल्पाच्या वेळी नेहरू बोलले होते हे “आधुनिक भारताचे मंदिर” आहे. नेहरूंनी खूप आधीच हेरलं होती की भारताला प्रगती करायची असेल तर “विज्ञान आणि तंत्रज्ञान” यांवर जास्त भर द्यायलाच पाहिजे. त्यांच्या काळातच “AIIMS, IIT, ‘s,IIM’s, NIT’s, CSIR यांसारख्या संस्थांची स्थापना नेहरूंच्याच काळात झाली.


नेहरूंच्या काळातच होमी जहांगीर भाभा यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जेचा कार्यक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काळात याचा उपयोग फक्त वीज निर्मितीसाठी केला जात असे पण चीन सोबत झालेल्या युद्धात पराभव झाला त्यानंतर त्याचा वापर अण्वस्त्र बनवण्यासाठी करण्यात येऊ लागला.


नेहरूंच्या परराष्ट्र धोरणामुळेच कॅनडा, अमेरिका, रशिया यांसारख्या देशांनी भारताला मदत केली. नेहरूनमुळेच भारतात एकाच वेळी सर्व जनतेला मतदानाचा अधिकार देण्यात आला अस करणारा त्या काळी भारत जगातील एकमेव देश होता.


भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात साक्षरतेचे प्रमाण केवळ 14% इतकेच होते त्यामुळे काही लोकांचं मानणं होत की सगळ्यांना मतदानाचा अधिकार नको पण नेहरूंनी ते नाकारलं त्यांनी 21 वर्ष वयाच्या पुढच्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. पुढे राजीव गांधींच्या काळात ते वय 21 वरून 18 वर आणण्यात आले.


नेहरूंनी पहिल्यांदा देशात एकापेक्षा जास्त पक्ष असावे याचे समर्थन केले काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना वाटत होतं की देशात दोनच पक्ष असावेत पण नेहरूंना ते मान्य नव्हते पण नेहरूंनी त्यांचा विरोध मोडून काढला आणि देश सुरळीत चालवायचा असेल तर चुकीच्या धोरणांवर टीका करायला विरोधक पाहिजे यामुळे त्यांनी दोनपेक्षा जास्त पक्ष देशात पाहिजे यावर भर दिला. नेहरूंनी देशात समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. नेहरू हे पुरोगामी विचारांचे नेते होते त्यांच्या काळातच हिंदू कोड बिल पास झाले.


ज्या बिलाने हिंदूंच्या अनेक चुकीच्या प्रथा बंद केल्या हे बिल पास करायला काँग्रेसच्या खूप नेत्यांचा विरोध होता तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा देखील हे बिल पास करायला विरोध होता तरीही नेहरूंनी हे बिल पास करून घेतले. संसदेत.


नेहरू भारतातील एक त्याकाळी अत्यंत लोकप्रिय असे नेते होते. जो माणूस अशिक्षित आहे त्याला पण नेहरू जवळचे वाटत आणि उच्च लोकांनाही नेहरू आपले वाटत याचे मुख्य कारण म्हणजे नेहरूंचे बोलणे. सामान्य लोक नेहरूंकडे हिरो म्हणून बगायचे हे माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत हे माझ्यासाठी चांगलंच करणार अशी लोकांची त्यांच्या विषयी भावना होती. त्यामुळेच चूका करून पण नेहरू 17 वर्षे पंतप्रधान राहू शकले.


काश्मीरच्या मुद्द्यावर आणि चीन युद्धात अपयश आले तरी देखील देश नेहरूंच्या पाठीमागे होता.


नेहरूंचे ज्ञान प्रचंड होते त्यामुळे लोक त्यांच्यासोबत वार्तालाप करत असत. आंतरराष्ट्रीय स्थरावर पण नेहरूंची ख्याती पसरली होती. इंडोनेशिया सारख्या देशात नेहरू भाषण द्यायला कॉलेज मध्ये गेले असताना तिथल्या सभागृहात पाय ठेवायला जागा नवती इतके तरुण त्यांना ऐकायला उत्सुक होते.


जेव्हा नेहरू UN मध्ये भाषण करायला जात तेव्हा देखील त्यांना ऐकायला दूरवरून लोक येत असत. नेहरूनसोबत घराणेशाहीचा वाद जोडला गेलाय 1950 मध्ये त्यांनी इंदिराजींना कॉंग्रेसच्या अध्यक्षा केलं तेव्हा.


नेहरू स्वतः लोकशाही विषयी बोलतात पण त्यांनी इंदिराजिना अध्यक्ष केलं तेव्हा त्यांच्या नावापुढं घराणेशाहीचा डाग लागला गेला.


इंदिरा गांधींनी काँग्रेस एका तानाशह प्रमाणे चालवली आणि लोकशाही काँग्रेस मधून हद्दपार झाली असच म्हणता येईल.


नेहरू गांधीवादी विचारांचे म्हणजे शांतताप्रिय होते त्यामुळे भारतीय सैन्याकड नेहरूंनी जास्त लक्ष नाही दिले. 1962 च्या युद्धाच्या काळात व्ही. के. मेनन हे संरक्षण मंत्री होते ते नेहरूंच्या खूप जवळचे होते पण त्यांचे आणि सैन्यातल्या अधिकाऱ्यांचे कायमच मतभेद असत आणि त्याचा परिणाम 1962 च्या युद्धात झाला. व्ही. के.मेनन यांना हटवले पण तोपर्यंत भारत युद्ध हरला होता.


नेहरूनवर लागलेला अजून एक डाग म्हणजे 1957 साली केरळ मध्ये लोकांनी निवडून दिलेले डाव्याचे सरकार 1959 ला राष्ट्रपतींनि बरखास्त केले नेहरूंच्या सांगण्या वरून. ज्या नेहरूंनी भविष्यवाणी केली होती की अटलबिहारी हे एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील ते अटलबिहारी वाजपेयी नेहरुईंना बोलले होते तुमचं व्यक्तीत्व विभाजित आहे तुमच्यात “चर्चिल आणि चेंबरलँड” दोन्ही पण आहेत.


27 मे 1964 रोजी नेहरूंचा मृत्यू हृदयविकाराने झाला. नेहरूंबद्दल भारताच्या लोकांत अनेक मतमतांतरे आहेत. काही लोक नेहरूंना हिरो समजतात तर काही लोक टीका करतात पण भारताच्या जडणघडणीमध्ये नेहरूंचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहरूंनी भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली. नेहरूंचे ज्ञान आणि त्यांचे असलेलं परराष्ट्र धोरण यामुळेच सरदार पटेलांना डावलून नेहरूंना गांधीजींनी पंतप्रधान केलं आणि तो निर्णय योग्यच होता हे नेहरूंनी आपल्या कामातून दाखवून दिले. आजपण भारताच्या परिस्थितीला नेहरू कारणीभूत आहेत अशीच टीका होती ती हास्यास्पद आहे पण यावर मला “हार्वी डेंट” याच्या “डार्क नाईट” यामधली एक ओळ आठवते “You either die a hero, or you live long enough to see yourself become a villain”.


भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे नेते म्हणजे नेहरू असे असून पण सर्वात जास्त टीका होणारे नेते म्हणजे पण नेहरु.


-अक्षय जाधव


कडूस राजगुरूनगर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad