दिवाळी भाऊबीज मराठी माहिती ,कथा.
दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम - मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.
बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ 'श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।' असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते. यम ही मृत्यूची देवता आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व धनाचा अपव्यच होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगावयाचे की, 'हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत. जागरूक आहोत. त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करत आहोत. त्याचा स्वीकार कर. कारण तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहिती नाही.'या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. बहीण-भावाच्या अमर प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा दिवाळीतील सवरेत्तम सण होय. बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा इतका मंगल आणि उत्कृष्ट सण नाही.
हे पण वाचा 🔜
भाऊबीज कथा :
या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.
भाऊबीज सण साजरा करण्याची पद्धत:
या दिवशी भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.
बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.
एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.
भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.
अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीप दान करावे.
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची खूप छान थोडक्यात आणि मुद्देसूद अशी माहिती दिली मला आवडली.
ReplyDelete