Type Here to Get Search Results !

जागतिक अपंग दिन - प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती यशोगाथा!

असाध्य ते साध्य

बालमित्रांनो, ३ डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती करून घेऊ या. या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये एक धागा समान आहे. या व्यक्तींनी शारीरिक व्याधींवर मात करून स्वत:चे सामथ्र्य सिद्ध करून दाखवले आहे.
हेलन केलर – १८८० साली जन्मलेल्या हेलन केलर यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या कोसळली. यापकी कोणतेही एक अपंगत्वसुद्धा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते. परंतु या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले उच्चशिक्षण डोंगराएवढय़ा अडचणींना तोंड देत पूर्ण केले. हेलन अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♿  जागतिक अपंग दिन - प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती यशोगाथा!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


लुईस ब्रेल –
 वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.

सुधा चंद्रन –
 एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. आणि नुसतीच उभी न राहता तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.


ऑस्कर पिस्टोरियस –
 पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा दक्षिण अफ्रिकेचा ब्लेड रनर-धावपटू. हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित १००, २०० व ४०० मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहेच, शिवाय २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पध्रेत ४०० मीटर स्पध्रेसाठी पात्र ठरून आपण अव्यंग लोकांपेक्षा कमी नाही, हेही सिद्ध केले.


स्टीफन हॉकिंग –
 या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.


बी. एस. चंद्रशेखर –
 भारतीय क्रिकेटला परदेशात विजयाची चटक लावणारी चंद्रशेखर-बेदी-प्रसन्ना-वेंकटराघवन् ही फिरकी गोलंदाजांची चौकडी सर्वपरिचित आहेच. यातील चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.


मन्सूर अली खान –
 टायगर पतौडी यांनी कार अपघातात आपला उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर कप्तानपदाची धुराही सांभाळली. केवळ एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक आणि भरवशाचा फलंदाज असा लौकिकही मिळवला.

वॉल्ट डिस्ने, ग्रॅहम बेल, एडिसन, आइनस्टाइन यांचे जीवनकार्य बघता यांना dyslexia म्हणजेच स्लो लìनग ही व्याधी होती यावर तुमचा विश्वास बसतो का? पण ध्येय समोर असेल आणि ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपण जे काही करत आहोत त्यावर निष्ठा असेल, तर कुठलेही काम असाध्य नाही.

अपंगत्व म्हणजे अक्षमता नाही - योगेश खंदारेची प्रेरणादायी यशोगाथा


नमस्कार - माझ एक सर्वसामान्य छोटस कुटुंब आहे तुम्हा सर्वान् सारख. माझे वडील हे शेती करतात आणि आई गृहिणी आहे. आम्ही तीन भावण्ड आहोत मोठा भाऊ हा जॉब करतो तर मदवा भाऊ बैंकिंग चे क्लास्सेस करतो आणि मी सर्वात लहान घरातला सर्वांचा लाडका योगेश. सहा वर्षाचा असे पर्यन्त सर्वसामान्यासारखा होतो. लहानपनीचे ते दिवस आठवले की आता ही माझ्या डोळ्यात आश्रु मावत नाहीत. माझ्या जीवनात एक दिवस येऊन जातो आणि दुःखाचा डोगर कोसळून जातो तो दिवस म्हणजे
जुलै ९, २००२ आख आयुष्यभर न विसरणारा तो दिवस होता. माझ्या जीवनतला सर्वात भयंकर आणि दुःखाचा डोगर माझ्यावर कोसळला होता तो याच दिवशी. मी माझ्या संपूर्ण आयुष्याचे स्वप्न रंगवले होते ते सर्व स्वप्न नाहीसे झाले.
माझे दोन्ही हात गेल्याने मी खूप खचलो होतो काय करू शकतो आता मी ?????????????????????? ज्या हाताच्या साह्याने मला आख आयुष्य काड़ायच होत ते हातच माझे नाही राहिले. जे गरीब आहेत ज्यांना मदतीची गरज आहे किव्हा जे अपंग आहेत त्यांना मदतीचा हात मला समोर करायचा होता पण काय आता ते शक्य नाही. आशे खुप सारे स्वप्न मी रंगवले होते. आस वाटत होत की मी आता हात नसताना कस हे सार आयुष्य काढु ????????????? किती लोक मला हसतील???????????????? किती जन मला खुळ्या म्हणून चिडवतील????????????? जिकडे जाव तिकडे माझ्या कड़े वेगल्याच नजरेने पाहतील??????? आता या परिस्थीतीत आणि आश्या समाजात मला संपूर्ण आयुष्य कडायच होत. या सार्यांचा विचार करुण मला आस वाटत होत की हे जीवनच आपन संपूण टाकावे
पण आई आणि वडिलांचा विचार केला की एका आई वडिलांच्या आपल्या मुलांकडून काय काय अपेक्षा आणि किती सारी स्वप्न आसतात. म्हणून मी ठरवल की आता काही पण हो आणि कितीही मोठे संकट यवो त्यांना मी सामोरे जाईल आणि माझ्या आई वडिलांचे स्वप्न मी पूर्ण करील. हा एक माझ्या जीवनातला वेगळा आणि सर्वात मोठा टर्निग पॉइन्ट होता. आता मला माझ्या पायावर ऊभ राहायच आहे मला काही तरी करुण दखवायच आहे. या समाजात मला माझी वेगळी ओळख निर्माण करायची आहे.
त्यासाठी मी पायाच्या बोटाचा साहारा घेऊन पायानी सर्व कामे करायची शिकलो. थोडक्यात जी सर्वसामान्य माणसे जी कामे करतात ती सर्व मी आज पायानी करू शकतो. विशेषता मी पेंटिंग,लिहिने,जेवण बनवने, कार चालवने,चेस खेळणे,नाटक करणे आणि दूसरी ते दहावी पर्यन्त मी सलग आठ वर्ष चित्रकला स्पर्धेत क्रमांक पटकवलेला आहे कोणती पण स्पर्था आसो मी त्यात सहभाग घेतो आणि क्रमांक पटकावतो. अशी बरिच कामे मी पायानी करतो.मी दहावीत आसताना लेखनिक घेतला नाही तर मी स्वतः पेपर लिहिला ते पण 3 तासांच्या आत आणि दहावीत 65% मार्क्स मिळउन पास झालो. त्यानंतर मी बराविला पण लेखनिक न घेता 70% मार्क्स घेऊन पास झालो.कंप्यूटर चे पण मी कॉस्सेस केले आहेत त्यात मला 98% मार्क्स आहेत. पेंटिंग चे क्लास्सेस केले आहेत त्यात B B ग्रेड मिळाला आहे. मला फ़क्त चॅलेंज करा मी ते करुणच दाखवतो. हे सर्व शक्य झाल ते आई आणि वाडिलांमुळे. आज मी सर्व कामे करू शकतो अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही की ती मी करू शकत नाही. फ़क्त आपला आत्मविस्वास पाहिजे की मी ते करणार आणि करुण दाखवनार बस तुमी यशस्वी झालेच म्हणून समजा.आता मी प्रत्येक कॉलेज, शाळा आणि इतर कार्यक्रमात मी माझे आनुभव सांगून प्रत्येकला इंस्पायर करतो. मी आता खुप आनंदात जीवन जगत आहे जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे. या समाजात माझी एक स्वतःची ओळख निर्माण झाली आहे. माझ्या घरच्यांचा माझ्यावर खुप अभिमान आहे.
मला तुम्हाला एकच सागायच आहे की जीवन खुप सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या छोट्या छोट्या संकटाला घाबरुन जाऊ नका.
एका कवितेत कवी म्हणतात की - “जो सुख और दुःख को समान लेखे वही जीवनका सच्या खिलाडी है ! ”
धन्यवाद
आपला लाड़का : योगेश खंदारे [ Mob : 8805909927 ]

लाईफ विदाऊट लिमिटस्?
सोनाली नवांगुळ
आयुष्यात सगळंच मनासारखं कुठं मिळतं असं आपण स्वत:ला समजावतो तेव्हा थोडं तरी मनासारखं मिळतंय हे गृहित असतं ना? - जे मनासारखं आहे त्याबद्दल बोलून खूष होण्यापेक्षा जे मिळालेलं नाही त्याबद्दल कचकच करत का राहातो आपण? - मात्र काही लोक असे असतात ना की जे अपूर्णतेलाच साजरं करतात, देखणं करतात.
त्यांच्यात कुशाग्र बुद्धिमत्ता आहे म्हणूनच ते आय.आय.टी.च्या अभ्यासक्रमासाठी निवडले जातात - पण २००८ ते २०११ या काळात भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या आयआयटी, आयआयएम आणि एनआयटीच्या २८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीय. आकडेवारी असं सांगते की २९ वर्ष किंवा त्याखालचे किमान १२५ तरुण भारतात दररोज आत्महत्या करून मृत्यूला सामोरे जाताहेत. अशा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ५१% तरुण-तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा पदवीधर असतात. हे सगळं काय आहे? जीवनाला हसतमुखानं सामोरं जाण्याच्या वयात, नवनवी स्वप्नं पाहाण्याच्या वयात ही मुलंमुली आत्महत्या का करताहेत? शिक्षण घेतलेली, कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलंमुली आत्महत्या करतात याचाच अर्थ आपलं शिक्षण बाकीची गुणवत्ता देत असेलही, पण भावनिक ताणतणावांना आणि आयुष्यातील पेचप्रसंगांना सामोरं जाण्यासाठी जी भावनिक व वैचारिक परिपक्वता लागते ती देण्यात कमी पडतेय. जगण्याच्या हजार संधी खुणावत असताना त्यांना हसतमुखानं कवेत घेण्याऐवजी या मुलामुलींना स्वत: मृत्यूच्या कवेत जावंसं वाटतं याचं कारण स्वत:च्या जगण्याकडं कसं पाहावं हे योग्य प्रकारे कुणी त्यांना सांगितलंच नाहीये हे आहे. - हो, आणि म्हणूनच निक वुजिसिकचं झोकात जगणं, तरुणांशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं!
आयुष्यात सगळंच मनासारखं कुठं मिळतं असं आपण स्वत:ला समजावतो तेव्हा थोडं तरी मनासारखं मिळतंय हे गृहीत असतं ना? - जे मनासारखं आहे त्याबद्दल बोलून खूश होण्यापेक्षा जे मिळालेलं नाही त्याबद्दल कचकच करत का राहातो आपण? - मात्र काही लोक असे असतात ना की जे अपूर्णतेलाच साजरं करतात, देखणं करतात. वेगवेगळ्या तुकडय़ांनी जोडून रंगलेली गोधडी नाही का सुंदर दिसत? त्या विविधरंगी तुकडय़ांमुळंच तर तिच्यात जान येते. तसंच काही लोक अपूर्णतेला आपल्या दृिष्टकोनानं पूर्णत्व देतात.. असे लोक वेगळेच असतात.. त्यांचं कर्तृत्व आपली नजर बांधून ठेवते.. मन तजेलदार करते.. अशाच निक वुजिसिकविषयी मला तुम्हाला सांगायचंय. निकसमोर जन्मापासूनच आयुष्यानं आव्हान उभं केलं खरं, पण हात नाहीत आणि पायही नाहीत तर जगायचं कसं असं म्हणून निकनं जगणं सोडून दिलं नाही. उलट आपली अपूर्णताच जीवनविषयक दृष्टिकोनानं पूर्णत्वाला नेली.
निकच्या आईबाबांना वाटलं की हे असं बाळ फार जगणार नाही, पण कदाचित देवानीच घेतलेली ही परीक्षा पहिल्या टप्प्यात तरी निक उत्तीर्ण झाला. फक्त हात-पायच तर नव्हते त्याला, बाकी तो निरोगी, आनंदी लहानगा होता.
स्वप्नांची कास धरा...
काहीही झालं तरी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं आपण अजिबात थांबवता कामा नये हे मनावर िबबवण्यासाठी निक एक उदाहरण सांगतो, ‘‘माझ्या बठकीच्या खोलीसाठी मी एक छोटं, छान रोपटं आणलं. ते खरंखुरं जिवंत रोपटं, पण माझे मित्र म्हणू लागले की ते खोटं आहे. मला ठाऊक होतं की ते अस्सल आहे, मी त्यांना उत्तरं वगरे देत बसलो नाही. त्यानंतर जवळपास महिनाभर घाईगडबडीत गेला. मी त्या रोपटय़ाला पाणी घालायचंच विसरलो. तरीही ते रोप ताजं, टवटवीत, हिरवंगार होतं. मित्र पुन्हा म्हणाले, ‘बघ. आम्ही नव्हतं सांगितलं की ते खोटं रोपटं आहे!’ मला जे खरं वाटत होतं ते खोटं ठरलं होतं. त्यानंतर मी परदेश दौऱ्यावर गेलो. दौरा जरा लांबलाच. दमूनभागून मी घरी परतलो तर काय! हॉलमधलं रोपटं पिवळं पडलं होतं, त्यानं मान टाकली होती. माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. म्हणजे माझं म्हणणं खरं होतं . हे रोपटं जिवंत, खरंखुरं रोपटं आहे! तुमची स्वप्नं, आशाआकांक्षा तुम्हाला इतर विश्वास ठेवत नाहीयेत म्हणून खोटय़ा वाटतात का? इतर म्हणतात म्हणून तुम्ही तुमच्या स्वप्नांना रुजवण्यासाठी पाणी देणं थांबवलं तर? - तेव्हा तुमचं मन व बुद्धी यांच्यावर विश्वास ठेवून स्वप्नं पाहा. देव आहेच! एकदा स्वत:वर विश्वास तर ठेवून बघा .. स्वप्नं रुजतील, फुलतील!
निकचा जन्म झाला ४ डिसेंबर १९८२ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं. खरं तर जन्माला येणारं बाळ अशा काही डिफॉर्मिटीज घेऊन या जगात येईल अशी सुतराम कल्पना निकच्या आईबाबांना नव्हती. निकची आई दुश्का नर्स व बाबा बोरीस हे चर्चमधले धर्मोपदेशक. निकच्या आईला डोहाळ्यांचा काही विशेष त्रास नव्हता. सगळं काही नेहमीप्रमाणेच चालू होतं. बरं काही विशेष आजाराची पूर्वपीठिका दोघांच्याही घराण्यात नव्हती. यामुळे मनाची काहीच तयारी नसताना समोर आलेलं दोन्ही हात व दोन्ही पाय नसणारं ते बाळ बघताना दोघांची छातीच दडपली. कसं जगणार हे बाळ या जगात? असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता, घरी-दारी-चर्चमध्ये. चर्चच्या सेवेसाठी इतकं निष्ठेने वाहून घेतलेल्यांवर देव असा कसा अन्याय करू शकतो? निकच्या आईबाबांना वाटलं की हे असं बाळ फार जगणार नाही, पण कदाचित देवानीच घेतलेली ही परीक्षा पहिल्या टप्प्यात तरी निक उत्तीर्ण झाला. फक्त हात-पायच तर नव्हते त्याला, बाकी तो निरोगी, आनंदी लहानगा होता. त्याचं पुढं काय होईल या चिंतेनं निकचे आईबाप पोखरले होते, पण त्यांनी थोडं शांत होणं, परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक होतं.
निक हातापायाविना कसा जन्मला याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा वैद्यकीय जगतातून जी माहिती समोर आली त्यानुसार त्याला टेट्रा अमेलिया सिन्ड्रोम हे निकचा जन्म हातापायांविना होण्याचं कारण होतं. थछढ 3 या नावानं ओळखल्या जाणाऱ्या जनुकामध्ये घडून आलेल्या जीवशास्त्रीय बदलामुळं असे प्रकार घडू शकतात आणि त्याला टेट्रा अमेलिया सिन्ड्रोम असं म्हणतात. अर्थात असे जीवशास्त्रीय बदल जनुकामध्ये होण्याचं प्रमाण अतिशय विरळा. निकला काय झालंय हे समजलं, पण त्याचे हात-पाय पुन्हा विकसित होऊ शकतील, असे उपचार आधुनिक वैद्यकशास्त्राकडेही नव्हते आणि नाहीत.
कित्येक महिने रडून काढल्यावर हळूहळू परिस्थिती निवळली. तोवर निकही शाळेत जाण्याइतका मोठा झाला होता. शाळेत जाऊन निकची घडी बसेल असं त्याच्या आईबाबांना वाटत होतं, पण त्यावेळी ऑस्ट्रेलियात शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेले व नसलेले दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकणे शक्य नव्हते, कायदाच होता तसा. (शारीरिक व्यंगाबरोबरच निकमध्ये मानसिक, बौद्धिक न्यूनत्वही आहे असा उगीचच काही जणांचा अंदाज होता.) निकच्या आईच्या अंगात मात्र कसलंसं बळ संचारलं आणि तिनं याविरोधात पाय रोवून उभं राहायचं ठरवलं व जिंकलीही. मुख्य प्रवाहात शिक्षण घेणारा निक ऑस्ट्रेलियातला पहिला विकलांग मुलगा ठरला.
निकला शाळेत जाणं, सगळ्यांबरोबर राहून शिकणं आवडायचं, पण बरेचदा इतरांबरोबर खूप अवघडल्यासारखे प्रसंग त्याच्या वाटय़ाला यायचे. आपल्या विचित्र दिसण्यामुळं सगळे उगीचच धसका घेतायत आपल्याला पाहून, आपण नकोय सगळ्यांना अशी भावना त्याच्या मनात घर करून राहायची. असे प्रसंग सतत वाटय़ाला आल्यामुळं तो एकलकोंडा व्हायला लागला, त्यातून अधिकाधिक निराश होऊ लागला. आपण जर इतरांसारखे नाहीच आहे तर मग आपण कशासाठी आहोत या जगात असे प्रश्न त्याला वयाच्या फक्त सातव्या वर्षीही पडायचे. एकदा तर त्यानं आत्महत्या करायचाही प्रयत्न केला. इतरांसारखं दिसायला हवं म्हणून त्याच्या हट्टाखातर त्याच्या आईबाबांनी त्याला खास इलेक्ट्रॉनिक तंत्रानं बनवलेले कृत्रिम हात बसवले. निकला वाटलं की आता काम झालं, पण त्याचं इतरांपेक्षा वेगळं असणं यामुळं अधिकच उठून दिसू लागलं. शिवाय ते इतके जड हात लावून त्याची नसíगक हालचाल आणखी मंदावली. निकनं हा उपद्व्याप थांबवला.
निकच्या आईच्या अंगात मात्र कसलंसं बळ संचारलं आणि तिनं याविरोधात पाय रोवून उभं राहायचं ठरवलं व जिंकलीही. मुख्य प्रवाहात शिक्षण घेणारा निक ऑस्ट्रेलियातला पहिला विकलांग मुलगा ठरला.
सुरुवातीची काही वर्ष अशी कठीण गेली. या काळात निकच्या कुटुंबानं त्याला जराही एकटं पडू दिलं नाही. या तणावात जगला, परिस्थितीला दोष देत न बसता कसं वागायचं याची काही तत्त्वं निकनं आईबाबांच्या मदतीनं ठरवली, या सगळ्याकडे पाहण्याची एक कनवाळू नजर तयार करायला सुरुवात केली. निकच्या डाव्या बाजूला छोटीशी फूट आहे त्यालाच तो पाय म्हणतो. त्यावर फुटलेल्या दोन बोटांच्या आधारे त्याचं बरंच काम चालतं व शरीराचा तोलही सांभाळला जातो. याच भागामुळे तो फुटबॉलला किकही मारू शकतो. निक जेव्हा फक्त दीड वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पाण्यात सोडलं, पोहायचं कौशल्य शिकवलं, पाण्याची भीती घालवली. निकचे वडील चर्चच्या जोडीला हिशेबनीस व कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणूनही काम करायचे. त्यामुळं त्यांनी निक सहा वर्षांचा असताना त्याला टायिपग शिकवलं. आज निक मिनिटाला ४३ शब्द या गतीनं संगणकावर लिहू शकतो. पायाच्या दोन बोटांमध्ये निकला पेन व पेन्सिल धरून ठेवता यावेत म्हणून त्याच्या आईनं प्लास्टिकचं एक खास साधन तयार केलं. तेव्हापासून लिहिण्याचं काम सोपं झालं. निकचा दात घासायचा ब्रश िभतीमध्येच फिक्स करण्यात आला होता, जेणेकरून त्याला कुणाची मदत घ्यायला लागू नये. आंघोळीवेळची सोयही अशीच होती.
निकला कळत होतं की दिसायला भले आपण इतरांसारखे नसू पण आतून, मनातून आपण त्यांच्यासारखेच आहोत.. फक्त हे लोकांना समजेपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल. विचारांमध्ये असे बदल करता करता तो दात घासणं, केस िवचरणं, स्वत: पाण्याचा ग्लास उचलून पाणी पिणं, स्वत:चा नाश्ता तयार करणं, फोन पायानं उडवून कान व मान यात दाबून पकडणं, कॅम्प्युटरवर काम करणं, पोहणं, मदानावर खेळणं अशी शक्य तितकी स्वत:ची कामं स्वत:च करू लागला.. विकलांगतेशी जुळवून घ्यायला लागल्यावर खूप गोष्टी सोप्या झाल्या. इतक्या की सातवीत असताना निकला शाळेचा संघनायक व्हायची जबाबदारी मिळाली. शाळेच्या व गावाच्या विविध उपक्रमांकरिता निधी संकलन, विकलांग मुलांसाठींचे काही प्रोग्राम त्यानं स्टुडंट काऊन्सिलबरोबर केले.
वयाच्या २१ व्या वर्षी निक ग्रिफीथ युनिव्हर्सटिीमधून अकाउिन्टग व फायनॅन्शियल मॅनेजमेंटमध्ये द्विपदवीधर झाला. पदवीचं शिक्षण घेत असतानाच निकला स्वत:च्या जगण्याचं उद्दिष्ट सापडलेलं होतं. त्यानं वयाच्या १९ व्या वर्षीच हे काम सुरू केलं. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या वयातली, वेगवेगळ्या क्षेत्रांतली अशी खूपशी माणसं आहेत ज्यांना काही ना काही अडचणी आहेत, अशा माणसांना त्यांच्या जगण्याचा हेतू शोधण्यासाठी मदत करणं, परिस्थितीचं योग्य भान मिळवत स्वत:ची स्वप्नं जोजवायला प्रवृत्त करणं हा उद्देश घेऊन निकची संस्था ‘अ‍ॅटिटय़ूूड इज अल्टिटय़ूड’ काम करते. हे करताना त्याच्या स्वत:च्या आयुष्याविषयी तो लोकांना सांगतो व जगणं किती सुंदर व अर्थपूर्ण असू शकतं याची जाणीव करून देतो. निक जगभरातील वेगवेगळ्या देशांना भेटी द्यायला लागला. एखाद्या लांबरुंद टेबलवर फेऱ्या मारत, कधी विनोद करत, कधी आपल्या स्वावलंबीपणाचं एखादं प्रात्यक्षिक दाखवत. निक बोलायला लागला की तो ऐकणाऱ्यांच्या मनाचा वेध घेतो. त्यांच्या मनामध्ये परिवर्तन घडवतो. प्रत्येकाच्या असण्याचा एक अर्थ आहे, संकटांचाही अर्थ असू शकतो व तो सकारात्मकही असतो हे त्याच्या बोलण्यातून लोकांपर्यंत आपसूक पोहोचू लागलं. आता दरवर्षी त्याला येणारी कार्यक्रमाची निमंत्रणं किती आहेत माहितीए? - जवळपास तीस हजार! इतक्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणं तर शक्य नाही; मग निकनं इतर माध्यमंही हाताळायला सुरुवात केली. लेखन, डी.व्ही.डींची निर्मिती, गाण्यांचं अल्बम असं खूप काही. - हे सगळं एवढय़ासाठीच की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं.
निक प्रत्येकाला सांगतो की मोठी स्वप्नं पाहा व आयुष्यात एखादं ध्येय नक्की असलं पाहिजे, ते ठरवा. ध्येय गाठतानामध्ये आलेले अडथळे म्हणजे संकट असं समजणं बंद करायला हवं.
निकच्या कामांची झलक
www.thebutterflycircus.com या वेबसाइटला भेट दिली की निकनं काम केलेला आणि आपल्याला अचंबित करून सोडणारा लघुपट पाहाता येतो आणि डाऊनलोडही करता येतो. हा लघुपट नक्कीच इतरांना दाखवावा असे आपल्याला वाटल्याशिवाय राहात नाही. याशिवाय यूटय़ूबवर निकचे अनेक व्हीडिओज उपलब्ध आहेत ते वेगळेच!
www.attitudeisaltitude.com व www.lifewithoutlimbs.org या वेबसाइटस्ना भेट दिली की निकच्या संस्थेविषयी व त्याच्या ब्लॉगवरील संवादाविषयी जाणून घेता येते.
ऑस्ट्रेलियातल्या ‘यंग ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर’ या एका मोठय़ा सन्मानाचं कौतुक निकच्या वाटय़ाला आलं, २००५ मध्ये. त्या-त्या तरुणाचं व्यक्तिगत काम, त्यातली त्याची निपुणता व त्याच्या कामाचा समाजाला, देशाला होणारा लाभ याचा विचार करून अत्यंतिक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्त्व या पुरस्कारासाठी निवडलं जातं. केवळ सत्ताविशीत असताना निकनं जे यश मिळवलंय ते कदाचित त्याच्यापेक्षा वयानं दुप्पट असणाऱ्या सर्वसामान्य माणसांनीही मिळवणं कठीण आहे. निक विद्यार्थी, शिक्षक, छोटेमोठे उद्योजक, प्रौढ स्त्री-पुरुष, चर्चमधील प्रार्थनासभा अशा सगळ्या ठिकाणी जाऊन माणसांना एनर्जीचं इंजेक्शन देऊन आला आहे. त्यानं जगाच्या पाठीवरील बहुतेक देश यासाठी पालथे घातलेत. काही नेतेमंडळी, विविध देशांचे पंतप्रधान, मंत्री यांची त्यानं भेट घेतली आहे. आजवर जवळपास पाच खंडांतल्या २४ देशांमध्ये सुमारे ३ कोटी लोकांशी निकनं संवाद साधलाय. लिखाण व टी.व्ही. शोजच्या माध्यमातूनही तो गरजू माणसांपर्यंत पोहोचतो आहे. त्याचं पहिलं पुस्तक ‘लाइफ विदाऊट लिमिटस्’ २०१० मध्ये प्रकाशित झालं (रॅन्डम हाऊस). त्याचं दैनंदिन आयुष्य व त्याची भाषणं यांची ध्वनिचित्रफीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ‘द बटरफ्लाय सर्कस’ या लघुपटामध्ये निकनं अभिनय केला. या लघुपटाला ‘डोअरपोस्ट फिल्मप्रोजेक्ट’, ‘द फील गुड फिल्म फेस्टिवल’मध्ये बक्षिसं मिळाली. ‘मेथडफेस्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तर निकला उत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस देऊन त्याची पाठ थोपटण्यात आली. ‘समिथग मोअर’ या नावानं त्याचा एक म्युझिक अल्बम नुकताच रिलिज झालाय. तो यूटय़ूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
निक प्रत्येकाला सांगतो की मोठी स्वप्नं पाहा व आयुष्यात एखादं ध्येय नक्की असलं पाहिजे, ते ठरवा. ध्येय गाठतानामध्ये आलेले अडथळे म्हणजे संकट असं समजणं बंद करायला हवं. उलट हे अडथळेच कोणापर्यंततरी किंवा कशापर्यंततरी पोहोचण्याचा मार्ग असू शकतात, संधी असू शकते. आपण एखाद्या गोष्टीकडं कसं पाहातो यावर आपलं व आपल्या भोवतालच्या लोकांचं भविष्य अवलंबून असतं. यामुळं दृष्टिकोन निरोगी हवा. आपण अपयशी झालोय किंवा होणार असा सल किंवा भीती मनात ठेवून आपण कशी नवी स्वप्नं पाहू शकणार? एकदा ठरवलं की बस्स ठरवलं असा पक्का इरादा करायचा आणि चिकाटीनं रस्ता चालत राहायचं, मग काहीही होऊदे.. आपण जिंकणारच!
निक श्रद्धाळू आहे. देवाच्या मर्जीशिवाय सृष्टीत काही घडत नाही असं त्याला मनापासून वाटतं आणि आत्ता तो जे काम करतो आहे ते काम म्हणजे ईश्वरानंच त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे असं त्याला वाटतं. तो म्हणतो, कधीकधी वेळ परीक्षेची असते. ती जास्त वेळ टिकते.. पण तो काळही सरतो.. जर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडत नसतील तर तुम्हीच चमत्कार व्हा!
आपल्याकडे छोटय़ामोठय़ा तणावांमुळं आत्महत्या करण्याचं मनात घोळत असणाऱ्यांनी एकदा निकच्या आयुष्याकडं नजर टाकावी.. मग ठरवावं.. काय करावं हे!!!
lokprabha@expressindia.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad