Type Here to Get Search Results !

विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालन

विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालन



वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभः !निर्विघ्नम् करूमे देव, सर्व कार्येषु सर्वदा !!




➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सुस्वागतम् ! सुस्वागतम् !! सुस्वागतम् !!!
आगतम् ! स्वागतम्  !! सुस्वागतम्  !!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सुंदर जिसके नामसे, पूर्ण हो सभी काम !
उपस्थित सभी अतिथियोंको----- परिवार का कोटी कोटी प्रणाम  !!
----------------------------------------------

     जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ.., ज्या महापुरुषाणं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तो राजा शिव छत्रपती.., ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न खांद्यावर घेतलं-पेललं,  तो राजा शंभू छत्रपती..,आमचं आराध्य दैवत संत भगवान बाबा..., आणि ज्यांच्या प्रेरणेने वंजारी समाजाची ओळख गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली ते लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब... (प्रसंगानुरूप)
          या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करुन (इथे आपल्या देवाचे नाव घ्यावे)--------- च्या वरदहस्ताने,  अक्षतांच्या सुखद वर्षावाने, सनईच्या मंजुळ सुराने,  सप्तपदीच्या प्रदक्षिणेने, मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने,  पार पडणाऱ्या शुभविवाह सोहळ्यास आपण उपस्थित झाले आहात. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..
---------------------------------------------

     श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रणझुंजार महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत...., श्री संतांच्या या पावन भूमित ..., ------------- च्या आशिर्वादाने,  मराठमोळ्या वातावरणात,  सनईच्या सुरेल स्वरात..
पडता पाऊले तुमची, शोभा वाढे मंडपाची  !
माथ्यावरती पडोत अक्षता, तुमच्या आशिर्वादाची  !!
➖➖➖➖➖➖➖➖➖
      काय चमत्कार आहे, कोण कोणाजवळ येतो.
जिथे ज्यांचे भाग्य असते, तिथेच त्यांचा  शुभविवाह होतो...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      मंडळी,
      भारतीय संस्कृतीत संस्काराला खूप महत्त्व  आहे. भारतीय संस्कृतीत जे सोळा संस्कार सांगितले आहेत,  त्यापैकी पंधरावा संस्कार म्हणजे 'विवाह'. मानवी जीवनात 'विवाहसोहळा' हा संस्कार विधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. (गर्भधान, पुसंवन, सिमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण,निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल, उपनयन, मेधजनन, महानाम्नीवृता, महावृत,  उपनिषदवृत, समावर्तन, विवाह, अंत्येष्टी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
 आजी सोनीयाचा दिनू  ! वर्षे अमृताचा घनू  !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         ---------- परिवार म्हणजे --------- येथील (गावाचे नाव) नामांकित परिवार..
सर्वांच्या सुखादुखामध्ये सहभागी होणारा परिवार... सर्वांना वेळोवेळी मदत करणारा परिवार .. आणि ह्या परिवारातील हा विवाहसोहळा संपन्न होत असताना तेवढ्याच आपुलकीने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात..
        तसं पाहायला गेलं तर हा विवाह सोहळा केवळ दोन क्षणांचा आहे. आणि आपली उपस्थितीही दोन क्षणांची आहे. परंतु आपली उपस्थिती, आपले प्रेम, आपले आशिर्वाद आणि शुभेच्छा -------आणि ----- परिवाराला जन्मोंजन्मी पुरेल एवढ्या आनंदरुपी प्रेम देणाऱ्या.....
हा आनंद , हा स्नेह , हे प्रेम, हा सन्मान लाभावा म्हणूनच या दोन्हीही परिवाराच्या वतीने आपणांस आग्रहाचं, आपुलकीचं निमंत्रण देण्यात आलं.... तेवढ्याच आपुलकीने आणि आग्रहाने सर्वचजण सहकुटुंब,  सहपरिवार,  ईष्ट मित्रांसह या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहात. म्हणूनच आपलं मनःपूर्वक स्वागत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

7 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad