Type Here to Get Search Results !

शिवजयंती निमित्त भाषण - छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध ,भाषण ,लेख ,

शिवजयंती मराठी भाषण सुत्रसंचालन , निबंध,शिवजयंती निमित्त तयार केलेले भाषण.

shivjaynti bhashan




इथे उपस्थित मान्यवर आणि मित्र मैत्रिणींना शिवजयंतीच्या व कालच झालेल्या मराठी भाषा दिनाच्या, आणि आजच्या ताज्या विज्ञान दिनाबद्दल शुभेच्छा ।

👉 शिवजयंती चे सूत्रसंचालन डाऊनलोड करा 👈


मी अगदी लहान पनापासून शिवाजी च नाव ऐकत आलोय. घरात काही साहित्याची किंवा इतर राजकीय सांस्कृतिक गोष्टींची चव नसल्याने शिवाजी मला तितकासा भावलाच नव्हता, किंबहुना तो खऱ्या रुपात भेटलाच नाही, तो कधी तलवारीच्या घोळक्यात, कधी बाईक रॅलीमध्ये, तर कधी फक्त घोषणांतून भेटायचा. वडील शिक्षक असल्यामुळे त्या शिवाजीपासून दूर राहायची ताकीद त्यांनी मला दिली होती. इयत्ता 3री का 4थी च्या इतिहासाच्या पुस्तकात तो मला पहिल्यांदा वडिलांना आवडेल त्या प्रकारे भेटला, तेव्हा काही समजयच नाही.. नन्तर चक्क 12 वी नंतर, आपल्या कॉलेजात आल्यावर पुन्हा एका मित्रासोबत झालेल्या वादविवादातून तो भेटला. राजेशाही जरी चांगली नसली तरी शिवाजी महारांची धोरणं हि महत्वाची आहेत, हे खरंच असं आहे का हे शेधतांना चमकण डोळे उघडताना दिसला. तर, तो जो मला भेटला, अन भावला असा शिवाजी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, काही चुकीचं बोललो तर मोठ्या मनाने तुम्ही माफ कराल अन बरोबर असलं तर पाठ हि नक्की थोपताल अशी आशा करतो अन तोडके मोडके दोन शब्द तुमच्या समोर मांडतो.




शिवबा लोकांना भावला, किंबहुना रयतेला – गरीब शोषित कष्टकरी जनते ला भावला याच एक महत्वाचं कारण त्यांच्या आर्थिक नितीमध्येहि दडलेलं आहे. हे गरीब कष्टकरी लोकं त्याच्यासाठी का मरायला तयार झाले, याचंही एक सत्य हे आर्थिक नितीमध्ये आहे.
शेती धोरण हे याच अंगाने महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जमीन मोजली, आता तुम्ही म्हणाल कि, राजा आहे – तलवार उपसली खुपसली – युद्ध केले, असं काही तरी असायला हवं होत, हा जमीन मोजल्याचा काय प्रकार आहे ?
आपण आजच्या जगात टॅक्स भरतो कि नाही, आजचं लोकशाही सरकार चालवण्यासाठी ? तसाच हा – लगान, शेतसारा याचा प्रकार.
 आधीची व्यवस्था – पाहिजे तितके ओरबाड्ने
जमीन मोजली याचा अर्थ, जमिनीतून जो काही उत्पन्न येईल, त्यापैकी कही उत्पन्न जमिनीच्या दरात राजाला शेतसारा म्हणून देण्यात येई. 3 वर्षांची सरासरी तिथे काढली जाई. त्यासाठी नेमलेल्या देशमुख हवलंदारांना  देखील एक ताकीद दिली होती, जितकं तुम्हाला ठरवून दिलंय, तितकाच सारा वसूल करयचा, त्यापेक्षा एकही कण जास्त नाही. तुम्हाला असलेला पगार हा तुम्ही तितकं वसूल केलं, तरी दिला जाईल अन नाही झालं तरी दिला जाईल. रयतेस जुलमी करायची नाही!
मागच्या वर्षी अनेक मोर्चे निघाले, दुष्काळ पडला आहे, शेताऱ्यांचं कर्ज माफ करा, कोल्हापुरात हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन निघालं होत, पण मित्र मैत्रिणींनो, शिवबाच्या काळात असं कोणी मोर्चे काढल्याच ऐकण्यात नाही, पण तरी सुद्धा ज्यावर्षी दुष्काळ असेल, त्यावर्षी आपोआपच सारा कमी वसूल केला जायचा किव्वा माफ हि केला जायचा, इतकाच नव्हे, तर कर्जे देखील दिली जायची. तर मग अशा राजाने जगावं असं शेतकऱ्याला वाटलं नसेल ?


उदा. 1676 साली, प्रभंवल्ली, सध्याच्या संगमेश्वर येथील एका ऑफिसर ला एक  पत्र लिहून महाराजांनी स्पष्टपणे सांगितले होते, दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे दान करून मदत करा, कर वसुली कमी करा अन सैनिकांना सांगा, रयतेच्या एकही भाजीच्या देठास देखील हात लावायचा नाही.
पोर्तुगीज व्यापारी स्वराज्यात खूपच स्वस्तात मिठाची विक्री करत, त्यामुळे लोकल व्यापाऱ्यांना नुकसान होई, म्हणून त्यांवरची एक्सीज ड्युटी म्हणजेच आयात कर त्यांनी वाढविला होता.
मागच्या वर्षी बजेट – सोने आयात करण्यावर 80हजार कोटी कर माफी दिली गेली.
स्वराज्याची संपत्ती कमावण्यासाठी शत्रूंच्या संपत्तीवर हल्ला करणे, युद्धातून संपत्ती कमावणे अशा अनेक गोष्टी महाराजननी केल्या, त्याव्यतिरिक्त सर्व सामान्य कर, सारफ कर, तेलपट्टी, वेठबिगारी, इ. करांचा वापर त्यांनी केला. पण हे कर वापरतांना, ते याबद्दल विशेष लक्ष देऊन होते कि, रयतेस जास्त शोषण होऊ नये. हि खूप महत्वाची गोष्ट आहे, आजच्या राज्यकर्त्यांसाठी, आज आपण लोकशाहीत राहतो, म्हणजेच आजचे राज्यकर्ते हे लोकं आहेत. अप्रत्यक्ष कर जो सर्व सामान्य गोष्टींवर लादला जातो, तो आज हळू हळू वाढवला जातोय, सरकारी तिजोरी वर ताण येत असल्याचं कारण देऊन. पण, दुसऱ्या बाजूला अमीर – कॉर्पोरेट प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स कमी केला ? 30 टक्के ते 25 टक्के ?
आजच्या काळात शिवाजी का शिकवा, का अभ्यासावा  याच एक महत्वाचं कारण म्हणजे एक आदर्श समाज किव्वा अर्थनीती डोळ्यासमोर आणण्यासाठी व आजच्या राज्यकर्त्यांना म्हणजेच लोकांना पटवण्यासाठी.
मित्रांनो मी एक शेवटचा मुद्दा मांडून माझं भाषण संपवणार आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, कि, व्यक्ती ची पूजा करणे हे त्याच्या कार्यकर्तृत्वाला लपवण्या आरखं आहे.
शिवाजी महाराजांना देवाचा अवतार मानल्यामुळे आज आपण त्यांच्यासारख होऊ शकत नाही, हि एक मानसिकता आपल्यात रुजत चालली आहे. (शिवाजी कुठं, आपण कुठं ?) त्यांनी काम करायची, मग आपण काय कारायच तर, जय म्हणायचं अन शांत बसायचं. असं होणार नाही, याची काळजी देखील घ्यायची आहे.
एक लोकाभिमुख अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकडे पाहणे, हे नक्कीच महत्वाचं असणार आहे. शिवबाच्या स्वराज्याला ज्यात रयत हि सुखात आहे, अशा राष्ट्राकडे वाटचाल करण्यासाठी आपण हातभार म्हणणार नाही मी, अजून लहान आहे, बोटाचा का होईना आधार देऊ.
– Shubham SHACK
halleshubham@gmail.com
https://parivartak.wordpress.com


शिवजयंती निमित्ताने छोटेसे हे भाषण . . . . .2




महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज व सर्व भारतीयांना माहीत असलेला छावा छ. संभाजीराजे यांच्या चरणी प्रथम दंडवत. 👏🏻 सर्व प्रथम जयंती आयोजकांचे मनापासून आभार. जयंती ही असामान्य व्यक्तींची साजरी केली जाते हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ज्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी केलेल्या कार्याचा अंत होत नाही अशाच व्यक्ती असामान्य असतात. छत्रपती शिवाजी महाराज अशा व्यक्तींच्या पंक्तीत माझ्या मते प्रथम क्रमांकावर आहेत. उगाचच त्यांच्या मृत्यूनंतर एवढी वर्षे झाली तरी लोकांना त्यांच्या स्वराज्याचे आकर्षण आहे. शिवजन्मपूर्वीचा काळ अंत्यत भयानक होता. जनता तत्कालीन अन्यायी सत्ताधिशांच्या राजवटीत भिरडली जात होती. एतद्देशीय उच्च वर्णीय अशा शासकांची चाकरी करण्यात व सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करण्यात शासकांची मदत करीत होता. सरदार वर्गही अशा अन्यायी सुलतान शासकांसाठी वेळप्रसंगी स्वबांधवांनाही ठार करण्यास मागेपुढे पाहत नसत. त्यात काही अपवाद ही होते परंतु त्यांची संख्या कमी होती. यादव काळातील हेमाद्री पंडिताने लिहिलेल्या चतुरंगचिंतामनी ग्रंथात लिहिल्याप्रमाणे जनता व्रत, वैकल्य , कर्मकांड, जात पात व धर्मभोळेपणात गुरफटलेली होती. समाज बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा या संकल्पना या गोष्टी दूरपर्यंत दिसत नव्हत्या. नंतरच्या काळात महानुभाव पंथ व वारकरी संप्रदायाने समाजातील अनिष्ट प्रथा संपविण्याचा प्रयत्न केला. त्या समाज व धर्मसुधारकांना येथील मनुवाद्यांनी खूप छळले हा इतिहास लक्षात घ्या...... अशा परिस्थितीत19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा ठरला आहे. शिवाजी राजांना त्यांचे वडील शहाजीराजे यांच्याकडून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. राष्ट्रमाता जिजाऊकंडून सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठीचे संस्कार मिळाले व शस्त्रास्त्र चालविण्याचे शिक्षण बाजी पासलकरांकडून मिळाले. ज्यांच्याकडून जे जे चांगले शिक्षण मिळाले त्यांना शिवरायांनी गुरू मानले. त्यात संत तुकाराम महाराज, बाबा याकूतखान इत्यादींचा समावेश आहे. अशाप्रकारे परिपूर्ण बनलेले शिवरायांचे व्यक्तीमत्व सूर्याच्या प्रकाशासारखे सर्वांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत व प्रेरणादायी ठरले आहे. ......शिवरायांनी स्वराज्याची स्थापना फक्त अन्यायी शासकांविरूदध व अन्यायी लोकांविरूदध केली होती. त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी स्वराज्याची निर्मिती केली नसून रयतेच्या कल्याणासाठी केली होती. सर्वधर्मीयांचे व सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठीचे राज्य कसे असावे याचा आदर्श शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून व तसे कार्य प्रत्यक्ष करून दाखविले. त्यांच्या कार्याला दैवाच्या कृपेची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न अंत्यत कुशलतेने मनुवाद्यांनी केला आहे. कारण असे अचाट कार्य सर्वसामान्यांनी करणे व त्यांच्यामुळे आपले महत्त्व कमी होणे हे मान्य होईनासे झाले होते. अफझलखान भेटीप्रसंगी खानच्या मनातील हेतूची जाणिव छ. शिवाजी महाराजांना होती त्याच्याशी ते त्या न्यायाने वागलेही . खनाचा त्यांनी वध केला पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बाधूंन घेतली. आसे होते त्या काळातील शत्रुत्व, का आजच्या सारखे. परंतु त्या प्रसंगादरम्यान कृष्णाजी भट्टाने शिवरायांनवर केलेला वार कधीही न विसरण्यासारखा आहे. शिवरायांना स्वजातीय व स्वधर्मीयांनीच जास्त विरोध केला हे दुर्दैव .नेमके हेच कोणी कधी सांगत नाही हे आमचे दुर्भाग्य. खोटा इतिहास आमच्या पुढे या मनुवाद्यांनी ठेवला व समाज व धर्मामध्ये तेढ आणि अलगपणा निर्माण केला , संपूर्ण समाज विभागून टाकला. सर्वसामान्यांचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतीचे ध्येय फक्त जनकल्याण हेच होते. औरंगजेबाच्या आग्रा भेटीदरम्यानचा प्रसंग येथे सांगावसा वाटतो. राजा रामसिंग बरोबर आग्रा दर्शन करीत असताना, ताजमहाल पाहून शंभूराजानी शिवरायांना विचारले आबासाहेब आपल्या स्वराज्यात आशा भव्य दिव्य इमारती का नाहीत? तेव्हा एका कल्याणकारी व जाणत्या पित्याने म्हटले की शंभूराजे आसल्या जनतेच्या पिळवणूकीतून बांधलेल्या थडगयापेक्षा आशी कीर्ती करून दाखवा की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तुमचे नाव जनतेच्या र्‍हदयात रहावे. औरंगजेबाच्या दरबारात सर्व राजे, मनसबदार , जहागीरदार व मोठमोठे सरदार खाली माना घालून उभे राहिले होते. छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे फक्त औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून ताठ मानेने उभे होते. हा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना एक आदर्श म्हणुन ठेवला हे विसरता कामा नये...........
त्या काळातील अनेक राजकीय अडचणी दूर करण्यासाठी व सर्वसामान्य रयतेच्या ईच्छेसाठी शिवरायांनी जेव्हा राज्याभिषेक करण्याचे ठरविले तेव्हा महाराष्ट्रातील त्याकाळातील भट्टांनी राज्याभिषेकास विरोध केला. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार शुद्राला राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही. यामागील त्यांचा उद्देश स्वार्थी होता, इस्लाम राजवटीत धार्मिक अधिकार आपल्याला भोगायला मिळतात पंरतु शिवाजी महाराजांनी जर राज्याभिषेक केला तर राजकीय व धार्मिक दोन्ही अधिकांरापासून वंचित राहावे लागले. असे झाल्यास कष्ट न करता आपल्याला जीवन कसे जगता येईल आणि कष्ट केले तर आपणच पुढील काळात शुद्र ठरू शकतोत. या अडचणी दुर करण्यासाठी गागाभट्टांनी प्रचंड द्रव्य घेऊन शिवरायांची क्षत्रिय वंशावळ बनविली. आश्चर्य म्हणजे राज्याभिषेक प्रसंगी ज्या भट्टांनी विरोध केला त्यांनी तडसासारखे पोट फुटेपर्यंत मिष्टान्न खाल्ले भरपूर दक्षिणा हडपली व सर्वसामान्यांच्या शिवरायांनी सुरक्षित ठेवलेल्या तिजोरीवर तान आणला. आजही कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे हे डोळे उघडे ठेऊन पहाने आपले कर्तव्य आहे. त्या विरोधात आवाज उठविणे व कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल असे मला वाटते
जय भवानी जय शिवाजी 
💐💐💐
शिक्षक विचार मंथन गृप
source : https://zpschoolpendubk.blogspot.in

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | भाषण लेख |3


शिवजयंती निमित्त शिवरायांवर एक भाषण येथे लिहित आहे.


गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या

शिवरायांना स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या 
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार



छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,

मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर


छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.

शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.

शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात !
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल

श्री छत्रपती शिवाजी महाराज

"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"

- समर्थ रामदास

भिडस्त भारी | साबडा घरी ||

प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥

- महात्मा फुले!

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो,ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष  म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज.

"शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ...भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन आपणा सर्वांना करत आहे.

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !

अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !

खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड,शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे.लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची,डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही,त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो.अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून,आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती,भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,

शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!

शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला,जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!


जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

source : ashachine.blogspot.in


छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | भाषण लेख |4




“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”
हि ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच. हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यच प्रतीक आहे. हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थ हि आहे, तो असा,
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…
एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्टीत अशा मराठा साम्राज्याला. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जगातील महान अशा मराठा साम्राज्याचे अधिपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणार आहोत. दरवर्षी १९ फेब्रुवारी ला आपण शिव जयंती साजरी करतो. शाळा आणि कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर निबंध अथवा भाषण द्यावे लागते. ह्या आर्टिकल द्वारे तुम्हाला शिवाजी महाराज्यांसारख्या थोर राजाबद्दल माहित मिळेल आणि हि माहिती तुम्हाला तुमच्या निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेत नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.
छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योध्या आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात. शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे, सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.

शिवाजी महाराजांचे बालपण

शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे मुघलांनी त्रासलेल्या जनतेसाठी एक शुभ शकुनच होता. त्रस्त जनतेला शिवरायांच्या जन्मानंतर एक आशेचा किरण दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुलिअन दिनदर्शिकेनुसार १९ फेब्रुवारी १६३०, हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन कृष्ण तृतीयेला पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा हि म्हणत. शहाजी महाराज विजापूर च्या राजाच्या सेवेत होते आणि पुण्यातही काही भागाचे ते जहागीरदार होते. शिवरायांची आई जिजाबाई ह्या सिंदखेड च्या लाखोजी जाधवांची कन्या. त्या अतिशय धार्मिक आणि महत्वाकांक्षी होत्या. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्यांना पटवून दिले. मोठे होत असताना आई जिजाऊंची हि शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती आणि त्याचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता.
शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सह्याद्रीच्या कडेकपार्या फिरून काढल्या आणि आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. हेच मावळे त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते. हे मावळे स्वराज्य भावनेने प्रेरित होते आणि स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला हि तयार होते. १६४० मध्ये शिवरायांच्या विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला.

अस्सल राजा आणि नेता म्हणून शिवाजी महाराजांची कामगिरी

१६४५ पर्यंत शिवाजी महाराजांनी आदिल शहा च्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूच्या चाकण, कोंढाणा, तोरणा, तसेच सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. शिवाजी महाराजांच्या ह्या यशस्वी लढायांमुळे आदिल शहा अस्वस्थ होऊ लागला आणि त्याला शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे ह्याची जाणीव झाली. आदिल शहा ने शिवरायांचे वडील शहाजीना कैद केले आणि एकाच अटीवर मुक्त केले कि शिवाजी महाराज यापुढे आदिल शहा च्या प्रदेशावर चढाई करणार नाही. काही वर्षांनी शहाजी राजेंचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड पुन्हा सुरु करून जावळी च्या दरीखोऱ्यातला प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूर चा जहागीरदार होता त्याकडून जिंकुण घेतला. ह्या घटनेने आदिल शहा चा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या शक्तिशाली सरदारांपैकी एक सरदार अफजल खान ह्याला शिवरायांना पराभूत करण्यात धाडले.
अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी षडयंत्र रचले आणि त्यांना भेटीसाठी प्रतापगडावर बोलवले. पण अफजल खानाला माहित नव्हते कि शिवाजी महाराज त्याच्या एक पाऊल पुढे आहेत. महाराजांनी खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गनिमी काव्याचा डाव रचला. जेव्हा ते प्रतापगडावर भेटले तेव्हा खानाने शिवरायांना आलिंगन देण्यासाठी जवळ बोलावले आणि जवळ येताच शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्यावरच उलटा पडला. शिवरायांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले होते. राजेंनी चपळाईने लपवलेला वाघनख्या बाहेर काढल्या आणि खानाच्या पोटात खुपसल्या. खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान कोसळला. शिवाजी महाराजांवर हल्ला झाला हे समजताच जंगलात लपलेल्या मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे खानाचं सैन्य बिथरले आणि मारले गेले. ह्याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. गनिमी कावा हि पद्धत ज्याला इंग्रजी मध्ये गुरिल्ला वॉरफेर असं म्हणतात हि आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये वापरली जाते. प्रतापगडाच्या घटनेवरून शिवाजी महाराजांची चपळाई, दूरदृष्टी आणि शोर्य दिसून येते.

जेव्हा शिवाजीराजे छत्रपती झाले | शिवराज्याभिषेक सोहळा

समर्थशाली असे मराठा साम्राज्य दूरवर पसरवल्यांनतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. जुन ६, १६७४ रोजी रायगडवर आयोजीत राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरव करण्यात आला. ह्या राज्याभिषेक सोहळ्यात सुमारे ५०००० लोक हजर होते आणि पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. ह्या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, शककर्ते, क्षत्रिय कुलावतंस आणि हिंदू धर्मोद्धारक अशा नावांनी गौरव करण्यात आला.

एक कुशल राज्यकर्ता, एक धर्मनिरपेक्ष नेता आणि लष्करी दूरदृष्टी असणारा राजा

शिवाजी महाराजांची एक कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती होती. त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरु केले ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीस एक ठराविक जबाबदारी देण्यात आलेली. पेशवा, मजुमदार, डबीर, पंडितराव,सेनापती, सचिव, मंत्री, न्यायाधीश अशी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे असत.
शिवाजी महाराजांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल आणि मानवी होती. त्यांनी चौथ आणि सरदेशमुखी ह्या दोन प्रकारच्या कर पद्धतींची सुरुवात केली. त्यांनी राज्याची ४ विभागांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख मामलतदार असे. त्यांनी कायम स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि ते कायम स्त्रियांचा आदर करत. त्यांनी त्य्यांच्या मावळ्यांना देखील कोणत्याही स्त्री ला इजा किंवा अनादर होईल असं ना वागण्यास सक्त ताकीद दिली होती. शिवाजी महाराक हिंदुत्व, मराठी आणि संस्कृत भाषेचे समर्थक होते परंतु त्यांनी नेहमी दुसऱ्या धर्मांचा आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे सैनिक होते.
शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल खूप सावध होते. त्यांना गड किल्ल्यांची ची ताकद माहित होती आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये खूप किल्ले उभारले. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रू पासून सुरक्षा करण्यासाठी महाराजांनी समुद्री किल्ले आणि आरमार हि उभारले.

शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि त्यांचा वारसा

४ दशके स्वराज्यासाठी लढल्यांनतर एप्रिल ३, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली. शिवाजी महाराज्यांनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजेंनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली. पण दुर्दैवाने मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांचे चरित्र सभासद बखर मध्ये लिहले गेले.
आज एकविसाव्या शतकात हि लोक शिवाजी महाराजांचा तेवढाच आदर करतात. शिवरायांच्या जीवनावर खूप चित्रपट, पोवाडे, नाटके, गाणी, बनवली गेली. खूप अशी ठिकाणे, संग्रहालये, स्टेडियम्स, शिवाजी राजांच्या नावाने नावाजली गेली. मुंबई मधील विमानतळाला देखील शिवाजी महाजारांचं नाव देण्यात आलं. शिवजयंती आपण खूप खूप उत्साहात साजरी करतो. लेझीम च्या तालावर शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक निघते, एकमेकांना शिवाजी महाराजांचे फोटोस, व्हिडिओस सोसिअल मीडिया वर पाठवले जातात.
मुंबई मध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम जोमात सुरु आहे. शिवाजी महाराजांचा  २१० फुटांचा हा पुतळा जगातील सर्वाधिक उंच पुतळा असेल. हे स्मारक बांधण्यासाठी ४००० करोड इतका खर्च येणार आहे. म्हणून काही लोक ह्यास विरोध हि करत आहेत. जर जे पैसे शिवाजी महाराजांनी बनवलेल्या किल्ल्याचा नूतनीकरण व डागडुजीसाठी वापरले तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा सन्मान होईल असं त्यांचं म्हणणं आहे.

सारांश

शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते. राजेंबद्दलचा मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो. जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ह्या जनतेचं त्याच्याबद्दलच प्रेम बघून भारावून गेले असते. पण त्याचबरोबर देशात चाललेल्या भ्रष्टाचार, गुन्हे, दंगली बघून उदास हि झाले असते. अशा ह्या थोर राज्याला माझं शत शत नमन.

शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती प्रा. शिवाजीराव चव्हाण



आज शिवजयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शेती, शेतकरी जीवन, महसुली व्यवस्थेची माहिती देणारा हा विशेष लेख दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य स्वतः डोळ्यांनी पाहणारा बखरकार कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, "राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्‍वरीपर्यंत द्वाही फिरविसी देश काबीज केला. आदिलशाहीस कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही या चारी परकीय पातशाह्या व समुद्रातील बेविस पातशहा फिरंगे असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून हिंदवी स्वराज्य स्थापिले, सिंहासनाधीश छत्रपती जहाले. शककर्ते झाले, ए जातीचा कोणी मागे झाला नाही. पुढेही होणे नाही.' या बखरकाराप्रमाणे देशी-परदेशी इतिहासकारांनी शिवरायांची अलौकिकता जागतिक युगपुरुषांमध्ये अशीच गणना केलेली आहे.

शिवकालीन लष्करी शासनव्यवस्था, मुलकी प्रशासनव्यवस्था, शासकीय न्यायव्यवस्था वर्तमानकाळातही मार्गदर्शक अशीच आहे. कोणत्याही राज्याचा गावगाडा, त्या राज्याच्या शेतीच्या चाकावर चालत असतो. वास्तविक शिवकालीन गावगाड्यापासून शिवकालीन कृषी व्यवस्था बाजूला काढता येणार नाही. कारण कृषी व्यवस्था त्या गावगाड्याचे एक अविभाज्य अंग होते.

"रयत सुखी, राजा सुखी', "शेतकरी सुखी तर राजा सुखी' हे शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ्यांच्या, रयतेच्या कल्याणासाठी आहे, ही त्यांची भावना, त्यांच्या अनेक आज्ञापत्रातून व्यक्त झालेली आहे. म्हणूनच त्यांचे वर्णन अनेक इतिहासकारांनी ""शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा'' असे केलेले आहे.

शिवकालीन शेतीचे स्वरूप ः शिवकालीन शेतीचे गावात "पांढरी' आणि "काळी' असे दोन भाग पडले होते. गावाची वसाहत पांढऱ्या मातीच्या जमीनीवर केली जात असे. ज्या जमिनीमध्ये पीक घेतले जात असे त्या जमिनीस "काळी आई' असे, तर ज्या शेतीवर वसाहत केली जात असे त्या शेतीस "पांढरी आई' असे म्हणत असत. शिवकालीन समाजात शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने या "काळी आईस' सर्वांत महत्त्वाचे उत्पादनाचे साधन मानले गेले. या "काळ्या आईचे' प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष लागवडीखाली असणारी पिकाची जमीन आणि नापीक पडीक जमीन. अशा पडीक जमिनीचा वापर गावकरी गुराढोरांना चराऊ रान म्हणून वापरत. अशा रानास "गायरान' असे म्हणत असत. एकूण सर्व जमिनीचे मालक सरकार असले, तरी सरकार काही प्रत्यक्ष जमीन कसू शकत नाही. त्या करिता सरकारला जमीन शेतकऱ्याला मुदत मालकीहक्काने द्यावी लागत असे. शेतकरी त्या जमिनीचा सरकारात मोबदला "खंड' म्हणून भरत असे. म्हणजे रयत "सारा' सरकारला भरत असे. शासन काही जमीन धार्मिक संस्थाना इनाम म्हणून देत असे. त्यावर सारा माफ असे. गावच्या जमिनीपैकी २० टक्के जमीन अशा पद्धतीने काही धार्मिक संस्थांना इनाम म्हणून दिली जात असे. सरकारच्या धोरणानुसार कसण्याची जबाबदारी त्या शेतकऱ्यावर असे. सरकारच्या विरोधात वर्तन केल्यास ती इनामी जमीन काढून घेतली जात असे.

शेतकरी जीवन ः शिवरायांच्या प्रशासनामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुखी, समृद्ध होते. शेतकऱ्यांस रयत, कुणबी, कुळवाडी अशा विविध नावांनी संबोधले आहे. प्रत्यक्ष शेतावर कष्ट करणारा, राबणारा शेतकरी हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता; पण त्याचा व्यवसाय हा समाजातील प्रमुख व महत्त्वाचा मानला जात होता. कारण त्याचे उत्पन्न हेच खरे राज्याचे उत्पन्न होते, म्हणून सरकारसुद्धा शेतीच्या प्रश्‍नांविषयी जागृत होते. पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने जमिनीचे "बागायत' व "जिरायत' असे दोन प्रकार केले जात. छोट्या छोट्या ओढ्या-नाल्यांवर किंवा नद्यांवर लहान लहान बंधारे घालून त्यातील पाणी पाटांनी शेतीस पुरवले जाई. अशा जमिनीस "पाटस्थल' असे म्हणत. काही ठिकाणी विहिरीच्या पाण्यावर काही जमीन पिकविली जात असे. अशा जमिनीस "मोटस्थल' जमीन असे म्हणत. काही जमिनींना छोट्या ओढ्यांना बंधारा घालून जमिनीच्या उंचीचा फायदा घेऊन पाणी पुरविले जात असे. अशा जमिनीस फुग्याखालील जमीन म्हटले जात असे. शेतीसाठी अधिक मनुष्यबळाची गरज असे. शेतकरी आपल्या बायका-मुलांसह शेतावर राबत असे. उत्पन्न चांगले काढत असे. जीवनावश्‍यक धान्याचा तुटवडा पडत नसे, खाऊन पिऊन शेतकरी सुखी होता.

शेतजमिनीची मोजणी ः शिवकाळात शेतीची मोजणी हा महत्त्वाचा घटक मानला होता. जमीन मोजणीसाठी "काठी'चा वापर केला जात होता. या काठीला "शिवशाहीकाठी' असे म्हणतात. ही काठी पाच हात व पाच मुठी इतक्‍या लांबीची असे. एक हात सात मुठींचा व एक मूठ दोन तसूंची असे. याप्रमाणे प्रमाण मानले जाई. एक मूठ म्हणजे अंगठ्याजवळचे बोट व करंगळीमधील अंतर व एक तसू म्हणजे दोन बोटांच्या सांध्यातील अंतर मानले जाई. अशा प्रकारे पाच हात व पाच मुठी यांनी बनलेल्या वीस चौरस काठ्यांना मिळून एक "पांड' होई आणि अशा वीस पांडांचा मिळून एक "बिघा' होई. एकशेवीस चौरस बिघे मिळून एक "चावर' होई. कोकणात वीस औरस-चौरस पांडांऐवजी तेवीस औरस-चौरस पांडांचा एक बिघा मानला जाई. सरकारी अधिकाऱ्यांच्याबरोबर जमीन मोजणीचे काम वतनदार, तराळ करीत असे. त्याच्या हाती ही मोजणीची काठी असे व तो जमीन मोजत असता काठी उडवीत असे. म्हणजे एक काठी जमीन मोजल्यावर दुसरी काठी टाकताना ती काठी उडी घेत असे. त्यामुळे या काठीस त्या काळी "चलती काठी' असे म्हणत. अशा प्रकारे काठी उडी घेत असल्यामुळे बिघ्यातील काठ्यांची संख्या सर्वत्र सारखीच राहते, असे नाही. तेव्हा लांब दोर धरून अंतर सारखे केले जात असे. शेतीची मोजणी अधिकात अधिक बरोबर रास्त केली जात असे.

(लेखक इतिहास विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.) 

संकलन:प्रवीण कुलकर्णी

source  : http://pkquiettime.blogspot.in/2010/03/blog-post_5217.html


CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ : THE GREAT WARRIOR


19th February is the day of Shivjayanti as Chhatrapati Shivaji was born on this date in 1627. We have a lot to learn from the life of this great King , leader and a true warrior . The history is incomplete without the history of Shivaji. He has been a source of inspiration and pride to the past generations and will continue to inspire the future generations as well.

He founded the Hindu Kingdom against all odds fighting the mighty Moghuls thus teaching us to be brave and face the toughest of challenges. He inspired and united the common man to fight against the tyranny of Mughal Ruler Aurangjeb .

His military skills could be compared to those of Napolean – using guerilla warfare tactics and had developed a strong intelligence network and gave equal treatment to the people from all religions and castes .

He always thought ahead of time and was true visionary. His moral virtues were exceptionally high.

Even today he is venerated in India and especially in Maharashtra with awe and admiration and is viewed as a hero of epic proportions.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad