Type Here to Get Search Results !

15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,भाषण.

🎤 शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,शाळा पहिला दिवस भाषण सूत्रसंचालन !


💐 स्वागतम स्वागतम स्वागतम..... 💐 



घरात अंकुरणाऱ्या विजांना देऊया प्रकाश नवा,
आशीर्वादासह आत्मविश्वास ही हवा ,
स्वागत करतो मुलांनो तुमचे
शाळेचा पहिला दिवस हा नवा !

     मी ............. सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरूवात करतो.!

आज भारावली आहे ती वास्तू कारण आज तिचा आत्मा परतला आहे ,किलबिलाटाने तुमचा वर्गही गहिवरला आहे मोडक्या फळीचा बेंच सुद्धा पहा कसा सावरून बसला आहे मुलांनो येण्याने तुमचा इथला  कण आणि कण आनंदला आहे कारण आनंदाचा ठेवा व सुट्टीचा मेवा खाऊन तुम्ही आनंदाने शाळेत परतले आहात।

🌹 या स्वागत तुमचे या प्रथम दिनी गुलाबपुष्प देऊ हाती एक करूया गती माती ! 🌹

🎎 स्थानापन्न करणे :-

पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते!
 चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते !
असेच प्रेम आपुलकी जिव्हाळा जपणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे *श्री ......* कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो !

🤵🏻 कार्यक्रमाचे अध्यक्ष:- .........

ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते...!
 म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे अशा गुरुकिल्ली लिहिणारे आपले मार्गदर्शन  *श्री ......* हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो !

👨🏻‍🏫 प्रमुख पाहुणे :-

 कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी प्रथम प्रधान संस्कृतीत आपल्या कार्य कार्यामुळे वेगळेपण जोपासलेल्या ...

 आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून *श्री......* हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

🔥 पूजन व दीपप्रज्वलन :-


जीवनाला हवी प्रकाशाची  वात,
 दिव्यामध्ये जळते छोटीसी वात,
 तरीही तिला हे मानाचे स्थान ,
हे आपणासही आहे ज्ञान.
तेव्हा दीपप्रज्वलनाने करू 
या कार्यक्रमाची सुरुवात!
🕯

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन व अंधाराचा नाश करण्यासाठी दीपप्रज्वलन करावे!

💐 स्वागत (पुष्पगुच्छ) :-


एक-एक पाऊल उचलतांना करावा विचार ,
शुद्ध अंतकरण आणि साजेसा आचार ,
शाळेला येऊन मुलांनो करा आयुष्याचे साकार ,
म्हणूनच स्वागत तुमच्यातील अस्मितेचे ,
सुंदर भारत माता ब्रीद गर्वितेचे,
स्वागत तेजाचे स्वागत मांगल्याचे,
स्वागत नवनिर्मितीचे ,स्वागत उत्सुकतेचे ,
स्वागत राष्ट्रनिष्ठेची, स्वागत गणवेशाचे गणवेशातील
 समानतेचे,
 स्वागत तुमच्या मनातील शाळा प्रेमाचे !


( विद्यार्थी स्वागत प्रत्येक विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करणे !)


आतुरली गुलाबपुष्पे स्वागत करण्या तुमचे..
 मुलांनो तुम्हीच आहात भविष्य देशाचे!`

निर्मिती:-
श्री. आशिष देशपांडे सर


🎤 *संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खालील "सूत्रसंचालन अँप" डाऊनलोड करा व अजून बरेच सूत्रसंचालन वाचा!*

https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आवडल्यास आपल्या ग्रुप वर शेअर करा !*👍

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad