Type Here to Get Search Results !

शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी.

शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन मराठी माहिती, भाषण .


आगतम - स्वागतम - सुस्वागतम !

```हिरे माणिक सोने उधळा जय जय कर करा```
```सुख दुःखाच्या वादळात हा गरीबाचा वाली```
```महाराष्ट्राचा उद्धारक तू जनतेचा राजा तू```
```जय राजश्री शाहू राजा तुला हा मानाचा मुजरा```

मी ........... सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो !

राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे गावात घराण्यात झाला महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला . त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली, अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांचा वेगळ्या शाळा भरण्याची दृष्टी पद्धत 1919 मध्ये बंद केली. अशा या जाणत्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण जमलो आहोत .

स्थानापन्न करणे :-

```पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते !```
```चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !```
```म्हणूनच तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते!```

असेच प्रेम आपुलकी जिव्हाळा जपणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे *श्री ------------* कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो !

खालील बटनावर क्लिक करून सूत्रसंचालन अँप सुद्धा डाऊनलोड करू शकता !



किंवा खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता !



धन्यवाद !
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-

 ज्या माणसाला सतत शुभ  आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन आनंदाने उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते!
म्हणून सकारात्मक आशावादी आणि विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. अशा गुरुकिल्ली लिहिणारे आपले मार्गदर्शक *श्री.....................*  हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो !

प्रमुख पाहुणे :-

तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी पुरुष प्रधान संस्कृती आपल्या कार्यामुळे वेगळेपण जोपासलेल्या............... आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून *श्री..............* हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो!

पूजन व दीपप्रज्वलन :-

```जीवनाला हवी प्रकाशाची वाट```
```दिवा मध्ये जळते छोटीशी वात```
```तरीही तिला हे मानाचे स्थान```
```हे आपणास आहे ज्ञान```

 तेव्हा दीपप्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात !

स्वागत / पुष्पगुच्छ :-

```अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा```
```धन्य धन्य होऊन करितो हा स्वागताचा सोहळा```

कार्यक्रमाचे प्रास्ताविक :-

हसून काही तरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा !!
खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही,
पण काही निर्णय काळावर सोडून देत जा !
कोणास ठाऊक द्या कुणी हसवणारा भेटेल भेटेल ,
म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा ,
आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घेत जा !

व आपण आपल्या कार्यक्रमाचा उद्देश लक्षात घेण्यासाठी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समजून घेऊ या ,

 आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे *श्री..............* सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो !

प्रास्‍ताविक :-

काही शब्द असतातच असे की ते नेहमीच ऐकावेसे असंच वाटतं...
काही नाती असतात एवढी गोड
कि ती कधी संपूच नये असच वाटत
आणि काही माणसं असतात एवढी आपली  कि ती नेहमी आपलीच असावीत असं वाटतं !

मार्गदर्शन :-

```डोंगर कोपऱ्यात वाढणाऱ्या गवताला```
```गरज असते ती पाण्याची```
```बोलके करण्यास हवे असते संभाषण```
```आधारासाठी हवे असते ते आश्वासन```
```आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक असते ते मार्गदर्शन```

 प्रमुख कार्यक्रमाचे पाहुणे आपले विचार व्यक्त करतील...

अध्यक्षीय भाषण :-

जीवनात आपला मार्गदर्शक कोण आहे हे फार महत्त्वाचे आहे
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचा झाला
कारण दुर्योधन शकुनीचा मार्गदर्शन घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा

म्हणूनच आपणही श्रीकृष्णा सारख्या उच्च विचारांचे आपले अध्यक्ष हे अध्यक्षीय भाषण करतील व सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो

आभार प्रदर्शन :-

जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसु नका...
एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका ....
सगळं मनासारखं होत असं नाही...
पण मनासारखं झालेलं विसरू नका ...
सुटतो काही जणांचा हात नकळत ...
पण धरलेला हात सोडु नका ..
मन ओळखणारा पेक्षा मन जपणारी माणसं हवी ...
कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी ...!

म्हणुन अशांचे मानले पाहिजेत आभार !

सदरील फाईल्स ही श्री आशिष देशपांडे यांच्या pdf चा आधार घेऊन बनवली आहे !
त्यांच्या पेड व्हाट्सअप्प ग्रुप वर ऍड व्हायचे असेल तर व्हाट्सअप्प करा ➡️ 9067101359

खालील बटनावर क्लिक करून सूत्रसंचालन अँप डाऊनलोड करू शकता !



किंवा खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता !



धन्यवाद !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad