Type Here to Get Search Results !

11 जुलै लोकसंख्या दिन ,वाढीचे दुष्परिणाम, समस्या, फायदे – निबंध, भाषण मराठी मध्ये

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, समस्या, फायदे – निबंध, भाषण मराठी मध्ये


प्रस्तावना – जागतिक लोकसंख्या वाढ

पृथ्वीची निर्मिती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती आणि सूक्ष्मजीवांच्या रूपात जीवनाच्या अस्तित्वाची सुरुवात ही सुमारे ४.१ अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्यातूनच त्याच्या उत्क्रांतीची यात्रा सुरु झाली. आपले वंशज आग पेटवायला शिकले, गट तयार करणे आणि एकत्र राहणे सुरु केले. अशा प्रकारे हजारो वर्ष्याच्या प्रगती नंतर समाजाची संकल्पना जन्माला आली. मग हे समाज वाढू लागले, एकोप्या मुळे दीर्घ काळ जगू लागले, जगाची लोकसंख्या वाढायला लागली. पण अनेक महाभयंकर आजाराने प्रचंड प्रमाणात लोक मरत हि असत, जसे प्लेग आदी रोग.
जगाच्या लोकसंख्या वाढीमध्ये १९२० नंतर खूप मोठा बदल दिसला. इथे आपण समजण्याचा प्रयत्न करू की १९२० नंतर असे काय झाले? २० व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली, माणसाची अवजड कामे मशीन्स करू लागली, नाना प्रकारचे शोध याच काळात लागले, गाड्या आल्या, मग टेलिग्राफ आले. विविध प्रकारच्या रोगांवर उपचार आले, व्यवसाय वाढले, जागतिक संपर्क वाढले. या सर्वांच्या फलस्वरूप माणसाचा जीवनकाळ वाढला, मृत्यु दर कमी झाले. वाढत्या समाजाला सपोर्ट करण्यासाठी वाढीव लोकसंख्येची गरज भासू लागली, म्हणून खूप साऱ्या देशांनी “बेबी बूमर्स” जनरेशन ला पाठिंबा दिला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, जगाची लोकसंख्या अभूतपूर्व दराने वाढू लागली.


लोकसंख्या वाढीची तुलना

आज जगाची लोकसंख्या जवळपास ७ बिलियन म्हणजे ७०० करोड पेक्षा जास्त आहे, आणि ती १.११% च्या वार्षिक दराने वाढत आहे. २०व्या शतकाच्या सुरवातीला जागतिक लोकसंख्या फक्त १.६ बिलियन होती. जुलै १९७४ मध्ये ती वाढून ४ बिलियन झाली, सन २००० मध्ये लोकसंख्या वाढून ६ बिलियन झाली आणि आज २०१७ मध्ये ६,५१५,२८४,१५३ म्हणजे जवळपास ७.५ बिलियन झाली आहे. असा अंदाज वर्तवला जातोय की २०४० मध्ये ९ बिलियन तर २०६० मध्ये लोकसंख्या १० बिलियन म्हणजे १००० करोड होऊ शकते.
लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम / अडचणी / तोटे
(या भागामध्ये आपण भारताच्या लोकसंख्ये बद्दल बोलूयात)
जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या त्याच्या इष्टतम स्तरापेक्षाही वाढते, तेव्हा ती गंभीर समस्या बनते. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे खालील समस्या निर्माण झाल्या आहेत.

1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

सुविधांचा अभाव

वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य व वैद्यकीय, स्वच्छता, अन्न आणि इतर अनेक सुविधा जनतेला पुरवताना सरकारला अडचण येते. सरकारी यंत्रने मधला भ्रष्टाचार हा सुद्धा मोठा भाग आहेच, पण एवढ्या प्रचंड जनतेला मूलभूत सुख-सुविधा पोहचवणे सोपे काम नाही आहे. युरोपिअन किंवा अमेरिका देश त्यांच्या नागरिकांना मूलभूत सोयी खूप व्यवस्थित पुरवतात कारण भारताच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे. स्वीडन आणि डेन्मार्क या देशातील नागरिक जगातले सगळ्यात आनंदी मानले जातात, या देशांची लोकसंख्या क्रमशः ९९ लाख आणि ५७ लाख इतकीच आहे. अमेरिका देश लोकसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर येतो पण त्यांची लोकसंख्या ही फक्त ३२.६ करोड आहे, जी भारताच्या लोकसंख्या १/४ च आहे.

शिक्षण, बेरोजगारी आणि गरीबी

भारतातील वाढती लोकसंख्या ही भारतातील प्रचंड बेरोजगारीला कारणीभूत आहे. चांगल्या प्रतीचे शिक्षण सर्व भारतीयांना मिळत नाही, आणी जे कोणी शिकतात त्यांना नोकरी ही मिळत नाही. भारतात जेवढे लोक आहेत तेवढ्या नोकऱ्या भारतात तयार होतच नाही, आणि बिसिनेस साठी ही तेवढेसे अनुकूल वातावरण नाही.

प्रचंड गर्दी / शहरी स्थलांतरण

गावाकडे पुरेश्या करिअर साठी संधी नसल्याने तरुण शहराकडे धावतात. यामुळे शहरात गर्दी होत आहे, शहरातील जागा, वाहतूक, पाणी पुरवठा यंत्रणा कमी पडते, स्थलांतरित लोक अनधिकृत झोपड्यांमध्ये खूप दयनीय परिस्थितीत राहतात, त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा, शिक्षणही परवडत नाही आणि हे चक्र असेच चालू राहते.

पर्यावरण समस्या

एका लहान क्षेत्रात राहणा-या या प्रचंड लोकसंख्येने सभोवतालच्या वातावरणावर परिणाम नक्कीच होतो. इमारती, रस्ते बांधण्यासाठी डोंगर, झाडे कापली जातात. पाणी, माती, हवा प्रदूषित होत आहे. जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. जंगली प्राणी शहरांत घुसून भयाचे वातावरण निर्माण करतात. अजूनही ग्रामीण भागात शेकडो वर्ष जुन्या प्रकारे शेती केली जाते, त्यामध्ये खूप सारी झाडे तोडली जातात, मातीची झीज होते; सुपीक मातीचा थर निघून गेल्याने पीकही योग्य प्रमाणात येत नाही. जाळासाठीही खूप प्रमाणात लाकूडतोड होत आहे.

वाढती लोकसंख्या लाभ / फायदे

वाढत्या लोकसंख्येचे फायदेही असू शकतात, हे तसे ऐकायला विचित्र वाटते पण असं होऊ शकते. प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतासाठी एक गंभीर समस्या बनली असती तरी ती एका चांगल्या संधीमध्ये बदलली जाऊ शकते. चला लोकसंख्येचे फायदे किंवा सकारात्मक परिणाम काय आहेत ते जाणून घेयूवात.
भारतात ५०% पेक्षा जास्त जनता वयोवर्ष ३५ खाली आहे, म्हणून भारताला एक तरुण देश ही संबोधलं जात आणी ही एक उत्तम गोष्ट आहे. जपान आणी काही युरोपिअन विकसित देशांमध्ये जवान नागरिक खूप कमी आहेत, कुठलाही देश चालवण्यासाठी तरुण कामगार, नोकरवर्ग, प्रशासन अधिकारी खूप गरजेचे असतात. भारताकडे ते भरभरून आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर अश्या देशांमध्ये खूप चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही गोष्ट जाणली आहे, त्यांनी “स्किल इंडिया”, “स्टार्टअप इंडिया”, “मेक इन इंडिया” सारख्या योजना राबवल्या आहेत, यातून भारतीय जनतेला जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे.

निष्कर्ष

वाढत्या लोकसंख्येमुळे भारता समोर खूप अचडणी आहेत, आणी नवीन येत ही राहतील. पण याला अडचण, समस्या या मानता लोकसंख्येकडे एक संधी म्हणून पाहावे लागेल. या प्रचंड जनतेला शिक्षण, प्रशिक्षण आणी सगळ्यात महत्वाचे, प्रोत्साहन देण्याची गरज आहे, आणी मग हीच प्रचंड लोकसंख्या भारताची ताकत म्हणून उभी राहील.

जागतिक लोकसंख्या दिन पुढील उपक्रम व कृतीने आपल्या विद्यालयांमध्ये साजरा करता येईल .

१)लोकसंख्या नियंत्रणासाठी घोशवाक्यांची स्पर्धा आयोजित करणे.
२)लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम या विषयावर तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करणे.
३)लोकसंख्या नियंत्रण एक पर्यावरणीय गरज या विषयावर चर्चा सत्र ,निबंध स्पर्धा भरविणे.
४)कुटुंब छोटे-सुख मोठे या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे.
५)लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करणे.
६)भित्तीपत्रके,भित्तीचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावणे.
७)लोकसंख्या वाढीमुळे पायाभूत सेवा सुविधा वर पडणारा ताण याबाबतची माहिती संकलन करणे.

लोकसंख्या दिनानिमित्त फेरी काढण्यासाठी काही उपयुक्त घोषवाक्ये!

१)कुटुंब लहान ,सुख महान.
२)करूया लोकसंख्येचे नियंत्रण,अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.
३)विचार करा एकाचा,मार्ग कुटुंब कल्याणाचा.
४)प्रश्न वाढता लोकसंख्येचा,उपाय कुटुंब नियोजनाचा.
५)एकाच मुल,सुगंधी फुल.
६)आजचे प्रयोजन,कुटुंब नियोजन.
७)कुटुंब नियोजनात कसूर,लोकसंख्येचा प्रश्न भेसूर.
८)कुटुंबाचा लहान आकार,करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार.
९)सुखी संसाराचे सूत्र,कन्येला मना पुत्र.
१०)कुटुंब असेल लहान.मेरा भारत महान.
११)खूपच वाढता महागाई,एकच मुल पुरे बाई.
१२)धरू नका,मुलीची अशा,डोळ्यासमोर ठेवा पी.टी.उषा.
१३)बालिका अथवा बालक,संपत्तीला एकच मालक.
१४)मुलगा असो व मुलगी,दोघानाही समान संधी.
१५)त्रिकोणातील तीन कोन,संतती एकच पालक दोन.
१६)एक कुटुंब एकच वारस,एकच अपत्य सरस.
१७)हिंदू हो या मुसलमान,एक परिवार एक संतान.
१८)नव्या युगाचा संदेश नवा,हट्ट नको मुलगा हवा.
१९)वेवाहिक सुखात न होई बाधा,पुरुष नसबंदीने कुटुंबाचे कल्याण साधा.
२०)करा कुटुंब नियोजनाचा स्वीकार,अन्यथा होईल हाहाकार.
21)  ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे

मुले आणि मुलींचे (दोन्ही लिंगांच्या) तरुणाईचे समान संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.
तरुण-तरुणींना आपल्या जबाबदार्‍या समजून घेण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना लैंगिकता आणि उशिरा लग्न करण्यासंबंधीची तपशीलवार माहिती देणे.
संततीनियमनविषयक योग्य साधने वापरून आणि उपाययोजना योजून अनैच्छिक गर्भारपण टाळण्यासाठी तरुणाईला शिक्षित करणे.
समाजातून लिंगनिहाय तेच ते (स्टिरिओटाईप) दृष्टिकोन हद्दपार करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे.
कमी वयातील प्रसूतीच्या धोक्यांविषयी जागृती करण्यासाठी गर्भारपणाशी संबंधित आजारांविषयी शिक्षित करणे.
लैंगिक संबंधातून संक्रमित होणार्‍या आजारांविषयी शिक्षित करणे.
मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.
मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.