Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध!

मराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध!

Marathwada mukti sangram din

‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा
लववी ना मान
अशा आमच्या मराठवाड्याचा
आम्हास अभिमान’’

असंख्य हुमात्म्यांच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून सरसेनानी स्वामी रामानंद तीर्थ, माणिकचंद पहाडे, गोविंदभाई श्रॉफ, विजयेेंद्र काबरा यांसारख्या समर्थ नेत्यांच्या निकरांच्या लढ्यातून निर्माण झालेला हा एक कोटी लोकसंख्येचा मराठवाडा 17 सष्टेंबर रोजी सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हैद्रराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत.

"समोर होता एकच तारा
अन पायतळी अंगार !"

अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी ,वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....

'स्वप्ने पडली उष:काळाची
हाती मात्र अंध:कार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात'


🔜 मराठवाडा मुक्ति संग्राम दिन भाषण सूत्रसंचालन ! 🔙


दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नवते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल?. हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कानड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. जामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे  पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.

'रण  पेटले पेटले रण
अग्निज्वाला सर्वदूर
अंगार मनामनात
झुगारु हा अंकुश'

जनमताचा प्रक्षोभ उसळला . खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.१९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट कोग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या .आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक र्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली अंतर्गत निजाम सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.

'मुक्तीचा आक्रोश आमुचा
स्वातंत्र्य आम्हा पाहिजे
ध्यास एक श्वास एक
हेच आमुचे ध्येय असे'

भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८   रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली .इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. 17 सप्टेंबर १९४८   ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.
-------------------------------------------------------------------

Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad