🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी सूत्रसंचालन चाहिये ?हमारा "सूत्रसंचालन आणि भाषण" यह
Android Application डाउनलोड
करे .[ Click Here to Download ]


Monday, November 5, 2018

दिवाळी - वसुबारस मराठी माहिती _दिवाळी पहिला दिवस .

दिवाळी वसुबारस मराठी माहिती पहिला दिवस : 


भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.


वसुबारस इतिहास : 


    समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. 

हे पण वाचा 🔜 वसुबारस व्रताची कथा अशी –एक म्हातारी होती. तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी-मुगाळी वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले, की गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते, की गहू-मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ घेतला आणि गोठ्यातील गव्हाळी-मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा! कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई-वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली.

या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते..या दिवशी
गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.


वसुबारस पूजा कशी केली जाते : 


 ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,
अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.
निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. 

पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||


अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.
पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात
नाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या
दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया
बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या
मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.


वसुबारस असे का म्हणतात ?


काही ठिकाणी या दिवशी  कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात
तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन
केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त
होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.
यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी
होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी
लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा. 


वसुबारस साजरा करण्यामागे गंमतशीर माहिती :


वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गाऊमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना आहे.

गुजरातमध्ये आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला ‘वाधवारान’ असे म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात.

No comments:

Post a Comment

हमारा "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .[ Click Here to Download ]

विठ्ठल दर्शन live, Vitthal Darshan Live darshan pandurang..live_darshan_vitthal_pandurang_pandharput

विठ्ठल दर्शन live, Vitthal Darshan Live darshan pandurang.. Clik here ➡️     विठ्ठल दर्शन live Clik here ➡️     विठ्ठल दर्शन live Clik here ...

Adbox