Type Here to Get Search Results !

Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information!

Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information!

पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती !


पतेती, हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस. त्यानिमित्ताने या अग्निपूजक शांतीप्रिय ख-याखु-या अल्पसंख्य समाजाच्या बहुआयामी वैशिष्ट्यांची ओळख करून घेवूया.

 पतेती…. पतेती म्हणजे पारशी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात. पारशी वर्षारंभ दिनाला ‘नवरोज’ म्हणतात.

पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस ‘पतेती’ म्हणून साजरा केला जातो.

वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात
नवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. पंचमहाभूतांची देखील पूजा होते

पारशी समाजाचे दैवत म्हणजे ‘अग्निदेव’ व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत (दत्ता खेडेकर)

चैत्रातला जमशेदजी नवरोज हा ‘चैत्रगौरी’प्रमाणे साजरा केला जातो (दत्ता खेडेकर)

पारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता पाळले जातात (दत्ता खेडेकर)

या दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फुले किंवा फुलदाणी वाहिली जाते(दत्ता खेडेकर)

गेलेल्या वर्षात काय केले, याचा आढावा घेत, नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते (दत्ता खेडेकर)

आजच्या दिवशी शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात (दत्ता खेडेकर)

सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान केले जातात (दत्ता खेडेकर)

 यावर्षी शुक्रवारपासून पारशी नववर्षाचा पहिला फरवर्दिन महिना सुरू होऊन नूतन वर्ष सन १३८७ प्रारंभ झाला.

हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% असला तरी त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यलढय़ामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये पारसी समाजाचे योगदान मोलाचे आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला'नवरोज' म्हटले जाते. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

पारसी समुदायाची ओळख

पारसी लोकांचे पूर्वज प्राचीन इराणी लोक हे इंडो-युरोपिअन भाषिक समूहाच्या इंडो-इराणीयन शाखेचा एक भाग होते आणि प्राचीन इंडो-आर्यन (वैदिक आर्य) लोकांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता.पारसी लोक हे सामान्यत: उंच, गोरे, बळकट बांध्याचे, मोठे कपाळ, सरळ व मोठे नाक, मोठे डोळे असे दिसतात.

पारसी खाना

पारशी लोकांचे पदार्थ आवडीने हॉटेल्स मधून खाल्ले जातात. पारसी खान्यात मुख्य भात आणि घट्ट डाळीचा समावेश आहे. पारशी लोकं मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात.

पारशी विवाह

पारश्यांसाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाची असून लग्न गाठी देवानेच बांधलेल्या असतात असा त्यांचा समज आहे. विवाहासाठीचा त्यांचा पारशी लग्न आणि फारकतीचा कायदा आहे. विवाहाच्या आधी दोन्ही घरात दिवे लावले जातात. त्यांनंतर दोन्हीकडचे व्याही एकमेकांना भेटायला जातात तेव्हा चांदीची नाणी शकून म्हणून देतात. विवाहचा पोशाख पांढरा असून, विधी दरम्यान कूंकू लावणे, मॉंग भरणे, अक्षदा आणि ओटी भरणे प्रथा आहेत.

पारशी अंत्यविधी

पारशी अंत्यविधी इतर धर्मांपेक्षा वेगळा असल्यामुळे कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्यात मृतदेहाचा संपूर्ण नाश स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाते. एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिला स्पर्श करण्यास बाकीच्यांना मनाई करण्यात येते. मृतदेहाला स्नान घालून पांढरे वस्त्र परिधान करण्यात येते. पारंपारिक धार्मिक मंत्र म्हणून झाल्यावर मृतदेहाला पारशी स्मशान किंवा विहीरीपाशी नेण्यात येते. तेथे मृतदेहाचे संपूर्ण वस्त्र काढण्यात येतात व मृतदेहाला पक्षी व प्राण्यांनी भक्षण करण्याकरिता सोडून देण्यात येते. घर संपूर्ण गोमूत्राने साफ करुन, पवित्र धूप, दिप लावला जातो व मृतातम्यास शांती वाहिली जाते.

खोरदाद साल

खोरदाद हा दिवस पारशांचा देव झोरोस्टार ह्यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नवरोज (पतेती) नंतर सहाव्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन त्यांच्या दैवताची प्रार्थना करतात. त्या दिवशी घराघरात गोड पदार्थ केले जातात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. ' चांगले विचार, आचार आणि सतकर्म ' हा ह्या पवित्र दिवसाचा संदेश आहे.

पारसी समाजाचे भारताला योगदान

२००१ च्या जनगणने प्रमाणे भारतात पारसींची संख्या सत्तर हजारापेक्षा कमी आहे. एकंदर लोकसंख्येच्या ०.१ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या समाजाचे भारताच्या विविध क्षेत्रातील योगदान डोळे दिपवणारे आहे.

१. पारसींनी कधीच अल्पसंख्यांकाचा दर्जा आणि हक्क मागितले नाहीत.

२. पारसींनी कधीच नोकऱ्यामध्ये आरक्षण मागितले नाही.

३. पारसींनी कोणत्याही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन कधीच केले नाही.

४. पारसींना बहुसंख्यांक हिंदुंची कधीच भिती वाटली नाही.

५. पारसी समाजाने कधीच हिंसक निषेध केला नाही, दगडफेक बाॅंम्बफेक केली नाही. सार्वजनिक मालमत्तेची नासधुस केली नाही.

६.कोणा पारसी माणसाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भाग धेतला नाही किवा गुंडांची टोळी चालवली नाही.

भारताच्या प्रगतीमध्ये कोणत्याही समाजापेक्षा पारसी समाजाचे योगदान प्रचंड आहे. भारतासाठी त्यांनी खुप खुप केलं आहे. काही नावे फक्त उदाहरणासाठी.

उद्योग आणि व्यवसाय - रतन टाटा, जे आर डी टाटा, आदी गोदरेज, शापुरजी पालनजी, सायरस मिस्त्री. रुसी मोदी.

राजकारण आणि सामाजिक सुधारणा - दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, भिकाजी कामा, दिनशाॅ पेटीट.

विज्ञान आणि तंत्रज्ञान - होमी भाभा, होमी सेठना.

संगीत - झुबीन मेहता. फ्रेडी मर्क्युरी.

क्रिकेट - नरी काॅंट्रॅक्टर, फारुख इंजीनीयर, बाॅबी तल्यारखान.

कायदेतज्ञ - नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरीमन. जमशेद कामा.

अभिनय - सोहराब मोदी, पर्सिस खंबाटा, बोमन इराणी, जाॅन अब्राहॅम,डेझी इराणी, आदी मर्झबान, पेरीजाद झोराबियन, सायरस भरुचा, भक्तियार आराणी, दिनशा दाजी, पिलु वाडीया. शेहनाज ट्रेझरीवाला, शेहनाज पटेल, बरजोर आणि रुबी पटेल.

लेखन - रोहींग्टन मिस्त्री, फिर्दोस कांगा,.फारुख धोडी, बाप्सी सिधवा.

पत्रकारिता -रुसी करंजिया, बेहराम काॅट्रॅक्टर, बाची करकरीया, केकी दारुवाला. रेसींग - सायरस पुनावाला. नृत्य - शामक डावर,ज्योतीष्य - बेजान दारुवाला.सैन्य - फिल्ड मार्शल सॅम मानेकशाॅ, जनरल एफ एन बिलीमोरीया., मेजर जनरल सायरस पिठावाला, जनरल खंबाटा. आणि केकी मिस्त्री, डाॅ सिलु पोचखानवाला, फिजा शाह, मेहरबुन इराणी, मिकी काॅंट्रॅक्टर, अर्झबान खंबाटा, कावसजी जहांगीर, होमी वाडीया, अर्देशीर इराणी, ही यादी मोठी आहे इतर अनेक अनेक आणि अनेकांचा उल्लेख करता येवू शकेल.

पारसी म्हणजे सुसंस्कृत, गुणवत्ता,नितीमत्ता आणि व्यवसायाशी प्रामाणिक असणारा, सर्वांशी मिळुन मिसळुन वागणारा स्वाभीमानी तसाच शांतताप्रिय समाज.समाजात मिळुन मिसळुन कसं वागावं आणि आपली त्याचबरोबर साऱ्या समाजाची प्रगती कशी करावी हे इतर अल्पसंख्यांक समाजांनाच नाही, तर बहुसंख्यांकाना त्यांच्याकडुन शिकायची गरज आहे.


पारसी नववर्ष नवरोझच्या शुभेच्छा !!!

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Thanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.

    ReplyDelete
  2. You have provided very proper information. Hope this information will be beneficial for allCheck Price & Specifications Realme 9i

    ReplyDelete
  3. इस आर्टिकल से आपने पूरे फेस्टिवल को अच्छी तरह से कवर किया है। आशा करता हु की इस से पाठको को काफी अच्छी जानकारी प्राप्त होंगी।...Please Click Here To All News Update

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad